फेब्रुवारीसाठी सेवा सभा
फेब्रुवारी ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ९६ (७२)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मार्च १, १९९६ पासून नियतकालिक दरांमध्ये झालेल्या वाढीकडे लक्ष वेधवा.
१५ मि:“येशूप्रमाणे दररोज सत्याची घोषणा करणे.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ५ वाचा.
२० मि:“खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली.” सुचवलेल्या सादरतांची चर्चा करा आणि एक किंवा दोन प्रात्यक्षिके करा. प्रचारकांनी त्यांच्यासोबत नेहमी अनंतकाल जगू शकाल आणि कौटुंबिक जीवन पुस्तके ठेवावीत असे सुचवा कारण ती फारच व्यावहारिक आणि सादर करण्यास सोपी आहेत.
गीत १४ (६) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १९१ (९८)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१३ मि:“एप्रिलमध्ये नियतकालिक कार्यासाठी तयारी करा.” सुवार्ता जाहीर करण्यासाठी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचे मूल्य ठळकपणे मांडा. दोन-परिच्छेदांचा तो लेख वाचा आणि एप्रिल हा महिना नियतकालिक वितरणाचा एक खास महिना करण्यासाठी स्थानिक मंडळी काय करील हे सांगा. मंडळीतील सर्वांना एप्रिल, मे किंवा दोन्ही महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी उत्तेजन द्या.
२२ मि:“ऐकणारी व्यक्ती मला कशी मिळू शकते?” प्रश्नोत्तरे. प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे १६५-७, परिच्छेद १०-२१ मध्ये दिलेल्या काही सूचनांचा उपयोग करून दारावर बोलत असताना अधिक मित्रभाव दाखवण्याचा प्रयत्न कसा केला जाईल याची चर्चा करण्यास दोन प्रचारकांना सांगा. क्षेत्रात विरोधाला तोंड द्यावे लागते, तेव्हा चतुर असण्याच्या गरजेवर जोर द्या.
गीत १३३ (६८) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७२ (५८)
१० मि:स्थानिक घोषणा.
१५ मि:“१९९६ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवा—भाग २.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. देवाचे वचन दररोज वाचण्याच्या गरजेवर जोर द्या.
२० मि:“त्यांना समजण्यास मदत करा.” पुनर्भेटी करण्यासाठी सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. अनंतकाल जगू शकाल आणि कौटुंबिक जीवन पुस्तकांची वैशिष्ट्ये आणि तुम्हाला ती ठळकपणे कशी मांडू शकता येतील याची चर्चा वडील दोन किंवा तीन प्रचारकांशी करतात. एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. बायबल अभ्यासाची सुरवात करण्यापर्यंत आस्था कशी निर्माण करावी यावर सूचना सादर करा.
गीत ५३ (२७) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २८ (५)
१० मि:स्थानिक घोषणा.
१५ मि:अपीलकारक सादरता तयार करणे. सेवा पर्यवेक्षक किंवा दुसरे वडील दोन किंवा तीन प्रचारकांसोबत स्थानिकरित्या अपीलकारक असणारे असे काहीतरी सादर करणाऱ्या दारोदारच्या सादरता करण्याच्या लाभांची चर्चा करतात. उदाहरणार्थ, राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी केल्या जाणाऱ्या सध्याच्या प्रयत्नांविषयी स्थानिक बातम्यांचे वृत्त; वैवाहिक समस्या, अपराधी मुलांचा वाढता प्रघात, किंवा नोकरी मिळवण्याच्या अडचणी; किंवा राजनैतिक व्यक्ती अथवा पाळक देत असलेल्या उपायांबद्दल लोक अधिकाधिक संशयखोर होत असल्याचे दाखवणाऱ्या बातम्या. तुमच्या समाजातील एखाद्या अलीकडील वृत्ताचा उल्लेख करा आणि संभाषण सुरू करण्यासाठी त्यांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याची चर्चा करा.
२० मि:मार्च दरम्यान सार्वकालिक जीवनाप्रत नेणारे ज्ञान हे पुस्तक सादर करणे. संभाषणे सुरू करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकतात अशी पुस्तकातील मनोवेधक वैशिष्ट्ये दाखवा. (१) उल्लेखनीय चित्रांकडे लक्ष वेधवा, जसे पृष्ठे ४-५, ८६, १२४-५, १८८-९ वर दाखवली आहेत. (२) प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उजळणी प्रश्नांची यादी कशी आहे हे दाखवा आणि सादरतांच्या आधारास्तव त्यांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ते स्पष्ट करा. घरमालकाला उत्तरे जाणण्यास आवडेल का असे विचारले जाऊ शकते. पृष्ठे ११, २२, ६१, १४९ वर दिलेल्यांपैकी काही प्रश्न निवडा. (३) पृष्ठ १०२ वरील पेटीचा संदर्भ द्या, आणि “शेवटल्या काळाची काही वैशिष्ट्ये” याचा उपयोग आस्था निर्माण करण्यास कसा केला जाऊ शकतो हे दाखवणाऱ्या काही सूचना द्या. (४) प्रगतीशील अभ्यास चालवण्यासाठी हे पुस्तक खासरित्या कसे तयार करण्यात आले आहे यावर जोर द्या. अध्याय लहान आहेत, साहित्य समजण्यास सोपे आहे, जोरदार वचने दिलेली आहेत आणि वेधक प्रश्न मुख्य मुद्यांवर लक्ष आकर्षित करतात. सर्वांना, अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयाने पुस्तक सादर करण्यास आर्जवा. तुमच्या मंडळीत, तुमच्या भाषेत हे पुस्तक अद्याप उपलब्ध नसल्यास, अनंतकाल जगू शकाल पुस्तक सादर करण्यासाठी या भागात आवश्यक फेरबदल करा. प्रचारकांना नेहमी त्यांच्यासोबत कौटुंबिक जीवन पुस्तक ठेवण्यास तसेच उचित वेळी सादर करण्यास देखील प्रोत्साहन द्या.
गीत १५१ (२५) व समाप्तीची प्रार्थना.