वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९६ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९६
आमची राज्य सेवा—१९९६
km २/९६ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता

फेब्रुवारी: तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांसाठी). पर्याय म्हणून, तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. या पुस्तकाची तेलगू आवृत्ती ८.०० रुपयांच्या खास दरात सादर केली जाऊ शकते याची कृपया नोंद घ्या.

मार्च: सार्वकालिक जीवनाप्रत नेणारे ज्ञान पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात. हे मंडळीत अद्याप उपलब्ध नसल्यास, तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना).

एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! (इंग्रजी) यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एक वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये असेल. मासिक आवृत्तींची एक वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये असेल. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात. उचित ठिकाणी, कौटुंबिक जीवन पुस्तकही सादर केले जाऊ शकते.

सूचना: कागदाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या तसेच वर्गण्यांच्या दरात मार्च १, १९९६ पासून वाढ होईल. नवीन दर असे आहेत:

किरकोळ प्रती: पायनियर: २.५० रुपये; प्रचारक आणि जनतेला: ४.०० रुपये.

एक वर्षाच्या पाक्षिक वर्गण्या: पायनियर: ६०.०० रुपये; प्रचारक आणि जनतेला: ९०.०० रुपये

एक वर्षाच्या मासिक आणि सहा महिन्याच्या पाक्षिक वर्गण्या: पायनियर ३०.०० रुपये; प्रचारक आणि जनतेला: ४५.०० रुपये.

▪ सचिव आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्यहालचालीची उजळणी करावी. कोणालाही अपेक्षित तास पूर्ण करण्यात अडचण असल्यास, वडिलांनी साहाय्य देण्याची योजना करावी. ऑक्टोबर १९८६ आमची राज्य सेवा यातील पुरवणीच्या परिच्छेद १२-२० मधील मुद्यांची उजळणी करा.

▪ स्मारक विधी समारंभ मंगळवार, एप्रिल २, १९९६ रोजी केला जाईल. भाषण लवकर सुरू होत असले, तरी स्मारक विधीची भाकर आणि द्राक्षारस यांना सूर्यास्ताआधी फिरवण्यात येऊ नये हे कृपया लक्षात ठेवा. तुमच्या भागात सूर्यास्त कधी होतो हे पाहण्यासाठी स्थानिक अधिकारांकडे विचारपूस करा. त्या तारखेला क्षेत्र सेवेच्या सभांशिवाय इतर कोणत्याही सभा घेतल्या जाऊ नयेत. तुमच्या मंडळीच्या सभा सहसा मंगळवारी असतील, तर राज्य सभागृह उपलब्ध असल्यास आठवड्याच्या इतर दिवशी सभा भरवू शकता.

▪ मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान साहाय्यक पायनियरींग करण्याची इच्छा असणाऱ्‍या प्रचारकांनी त्यांच्या योजना आताच आखाव्यात आणि लवकरात लवकर त्यांचे अर्ज द्यावेत. हे वडिलांना क्षेत्र सेवेसाठी आवश्‍यक व्यवस्था करण्यास आणि पुरेशी नियतकालिके आणि इतर साहित्याचा साठा ठेवण्यास मदत करील.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी)—इंग्रजी

“आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित झालेले हे नवीन माहितीपत्रक पायनियरांना ३.०० रुपयांसाठी व प्रचारकांना आणि जनतेला ५.०० रुपयांसाठी आहे. ते इंग्रजीतील ब्रेलमध्ये देखील एका खंडात उपलब्ध आहे.

सार्वकालिक जीवनाप्रत नेणारे ज्ञान —इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मल्याळम, मराठी, हिंदी

“आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित झालेले हे नवीन पुस्तक पायनियरांना ८.०० रुपयांसाठी व प्रचारकांना आणि जनतेला १५.०० रुपयांसाठी आहे. ते इंग्रजीतील ब्रेलमध्ये देखील दोन खंडात उपलब्ध आहे.

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक —तामीळ

जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? —नेपाळी

मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? पत्रिका क्र. १६ —उर्दू

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? पत्रिका क्र. १४ —उर्दू

शांतीदायक नवीन जगातील जीवन, पत्रिका क्र. १५ —उर्दू

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल (लहान) —तामीळ

थोर शिक्षकाचे ऐका —तामीळ, मल्याळम

“पहा! मी सर्व काही नवे करतो” —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, नेपाळी, मल्याळम, हिंदी

▪ उपलब्ध असलेले नवीन व्हिडिओ कॅसेट:

बायबल—वास्तविकता आणि भविष्यवाद यांचे पुस्तक खंड १: बायबल—अचूक इतिहास, विश्‍वसनीय भविष्यवाद —इंग्रजी

बायबल—वास्तविकता आणि भविष्यवाद यांचे पुस्तक खंड २: बायबल—मानवजातीचे सर्वात जुने आधुनिक पुस्तक —इंग्रजी

ईश्‍वरी शिक्षणाने एकत्रित केलेले —इंग्रजी

या व्हिडिओ कॅसेट्‌सची मागणी, नेहमीच्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) यावर केली जाऊ शकते. प्रत्येकाचे, पायनियरांसाठी १५०.०० रुपये अनुदान आणि प्रचारक व जनतेसाठी २००.०० रुपये अनुदान.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा