तुमच्या वेळेचा सदुपयोग करा
१ यहोवा वेळेची जाणीव राखणारा आहे. आपणही वेळेची जाणीव राखावी असे तो इच्छितो. त्याच्या संस्थेद्वारे तो आपल्याला वेळेची जाणीव राखण्यासाठी मदत करतो. ‘प्राभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असण्यास’ आपल्याला आर्जवण्यात येते. (१ करिंथ. १५:५८) अशाप्राकारे, आपण यहोवाच्या सेवेमध्ये अधिक परिणामकारक होऊ शकतो.
२ आपल्यापैकी सर्वांकडे प्रात्येक आठवड्याचा तितकाच वेळ असतो—१६८ तास. आपण आपल्या वेळेचा किती चांगल्या रीतीने उपयोग करतो? यहोवाच्या दृष्टिकोनातून हा कोणता काळ आहे हे आपल्याला खरोखर ठाऊक असल्याचे आपण दाखवतो का? अनावश्यक कार्यहालचालींमुळे आपण विचलित होतो का?
३ आपण सुव्यवस्थित असावे हे महत्त्वाचे आहे. पुष्कळ जण प्राधान्य द्याव्या लागणाऱ्या गोष्टींची यादी राखण्याचा प्रायत्न करतात. प्रात्येक गोष्टीची तिच्या महत्त्वाप्रामाणे यादीत भर टाकली जाते. हे कसे ठरवले जाऊ शकते? बायबल म्हणते, की एखाद्या मनुष्याने “आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे.” (उप. ३:१३) काही गोष्टींना इतर गोष्टींपेक्षा चांगले परिणाम मिळतात. प्रात्येक कामामुळे जे परिणाम मिळतील त्यांचा विचार करा. एखादे काम संपवल्याने अर्थपूर्ण लाभ मिळतील का? तुमच्या कठीण परिश्रमाचे तुम्हाला ‘सुख मिळेल’ का? तसे नसल्यास, ते अधिक प्राधान्य देण्याजोगे कार्य नसेल.
४ आपल्या सेवेत: इतरजण सेवेच्या सभांकरता वेळेवर येतात, सूचनांना लक्ष देऊन ऐकतात व तत्काळ क्षेत्रात जातात तेव्हा आपण त्या गोष्टींची प्राशंसा करतो. थांबून राहण्याऐवजी आपल्याला प्राचार करण्यात व्यग्र राहावयास आवडेल. “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या,” असे पौलाने लिहिले तेव्हा स्पष्टतः, त्याला चांगली व्यवस्था राखण्याची गरज खूप जाणवली.—१ करिंथ. १४:४०.
५ क्षेत्र सेवेत असताना, चहापाणी घेण्यात आपला मूल्यवान वेळ घालवला जाऊ शकतो. तथापि, त्रासदायक हवामान असल्यास, थोडी सुटी घेतल्याने आपण ताजेतवाने होऊ आणि त्यामुळे आपल्याला कार्य करत राहण्यास मदत मिळेल. तथापि, पुष्कळ जण सेवेसाठी राखलेल्या वेळेत चहापाणी घेण्याद्वारे बांधवांसोबत सहवास राखण्याचे टाळतात आणि लोकांना साक्ष देण्यामध्ये व्यग्र राहण्याचे पसंत करतात. यामध्ये समतोल असण्याची गरज आहे.
६ स्थलांतर करण्यासाठी “करकोची आपला नेमिलेला समय जाणतो” आणि मुंगी हिवाळ्याची तयारी करण्यासाठी “उन्हाळ्यात आपले अन्ना मिळवते,” असे बायबल म्हणते. (यिर्म. ८:७; नीती. ६:६-८) त्यातच वेळेचा सदुपयोग करण्याचे रहस्य आहे. आपण देखील आपला ‘नेमलेला समय जाणला पाहिजे.’ वेळेबद्दल प्रामाणापेक्षा जास्त कडक न राहता, आपणही वेळेची जाणीव राखली पाहिजे. आपल्याला काय करावयाचे आहे एवढेच नव्हे तर ते केव्हा करायचे आहे हे देखील माहीत असले पाहिजे. पुढचा विचार करण्याची व संभवनीय दिरंगाईसाठी विशिष्ट वेळ राखण्याची सवय आपण करून घेतली पाहिजे. त्याचप्रामाणे, सभांची तयारी, क्षेत्र सेवा व इतर ईश्वारशासित कार्यहालचाली, या सारख्या गोष्टींसाठी इतर गोष्टी टाळण्यास देखील आपण इच्छुक असले पाहिजे.
७ आपण आपला स्वर्गीय पिता यहोवा देव, याच्यासारखे बनले पाहिजे. “प्रात्येक कार्याला समय असतो,” असे तो शिकवतो. (उप. ३:१) आपल्या वेळेचा सदुपयोग करून आपण ‘आपल्याला सोपविलेली सेवा पूर्ण करू शकतो.’—२ तीम. ४:५.