वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९५ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९५
आमची राज्य सेवा—१९९५
km ६/९५ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता

जून: लाईफ—हाऊ डीड इट गेट हियर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. प्रादेशिक भाषेतील कोणतीही १९२ पृष्ठांची नवी पुस्तके १५.०० रुपयांच्या नियमित दरात सादर केली जाऊ शकतात.

जुलै आणि ऑगस्ट: पुढीलपैकी कोणतीही ३२-पृष्ठांची माहितीपत्रके ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व काही नवे करतो,” आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्यूर फॉर एव्हर, नंदनवन आणविणारे सरकार, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, आणि व्हेन समवन यू लव डाईझ.

सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना). गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी प्रायत्न केले पाहिजेत.

◼ पुष्कळ मंडळ्या पोस्टाबद्दल तक्रार करत असल्यामुळे, वडील स्थानिकरित्या त्यांच्या परिस्थितीची उजळणी करू शकतात. एका मंडळीला मिळणाऱ्‍या पोस्टाचे असामान्य प्रामाण तसेच नियतकालिकांचे गठ्ठे लक्षात घेता, स्थानिक पोस्ट कचेरी व पोस्टमनशी चांगले नातेसंबंध राखले जातात याची खात्री वडिलांनी केली पाहिजे. यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक योग्य बांधवांना पोस्टाच्या अधिकाऱ्‍यांशी नियमितपणे दळणवळण व स्नेहसंबंध राखण्यास नियुक्‍त करण्याचा, समावेश होऊ शकतो. त्याचप्रामाणे स्थानिकरित्या योग्य मानले जाते त्यानुसार हे जादा टपाल हाताळण्याबद्दल व आणण्याबद्दल कृतज्ञतेपोटी पोस्टमन यांना बक्षिसी देण्याचा देखील समावेश होऊ शकतो.

◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने, जून १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीत त्याची घोषणा करा.

◼ गोव्यासाठी “आनंदी स्तुतीकर्ते” प्रांतीय अधिवेशनाचे मारगाव येथील ठिकाण बदलून माप्सा येथे आयोजण्यात आले आहे.

◼ येथून पुढे, प्रांतीय अधिवेशने, विभागीय संमेलने व खास संमेलन दिवशी केवळ अल्पोपहार उपलब्ध करून दिला जाईल. कॅफेटेरिया पद्धतीने जेवण दिले जाणार नाही. उपस्थित असणारे लोक, इच्छा असल्यास आपआपले जेवण, अल्पोपहाराच्या स्टॉलमध्ये उपलब्ध असणाऱ्‍या गोष्टींसोबत खाण्यासाठी घेऊन येऊ शकतात.

◼ ज्या मंडळ्यांनी अद्याप १९९५ चे अधिवेशन बॅज कार्ड, परीक्षण करणे १९९६, १९९६ च्या दिनदर्शिका, १९९६ चे ईयरबुक्स आणि १९९६ च्या स्मारक विधीच्या निमंत्रण पत्रिकांसाठी मागणी केली नाही त्यांनी तत्काळ करावी. यासाठी, कृपया एप्रिलच्या आमची राज्य सेवा यातील घोषणेची उजळणी करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा