वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९५ पृ. १
  • आपली राज्य एकता राखणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपली राज्य एकता राखणे
  • आमची राज्य सेवा—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • खरे ख्रिस्ती ऐक्य—कसे?
    आमची राज्य सेवा—२००३
  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • या शेवटल्या दिवसांमध्ये ऐक्य टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९५
km ४/९५ पृ. १

आपली राज्य एकता राखणे

१ देवाचे राज्य हे संपूर्ण सत्ता व अधिकार असलेले खरे सरकार आहे. ते येशूच्या प्राचाराचे शीर्षक होते. (मत्त. ४:१७) इतरांना शिकवणे व राज्याच्या सत्याची साक्ष देणे हा येशूच्या सेवेचा प्रामुख भाग होता. त्याने आपल्याला राज्यासाठी प्रार्थना करावयास व प्राथम त्याचा शोध करण्यास शिकवले. (मत्त. ६:९, १०, ३३) यहोवा आणि त्याच्या संघटनेच्या निकट सहवासात असणे, आपल्या प्राचाराची कामगिरी पूर्ण करणे आणि जगापासून अलिप्त राहणे या गोष्टी आपल्याला राज्य एकता टिकवून ठेवण्यास बळकट करतील. आपल्या कृती आणि शब्दांद्वारे, आपण राज्याच्या बाजूचे आहोत हे दाखवून देतो.—योहा. १८:३७.

२ सन १९१४ पासून हे राज्य, लाखोंच्या प्राजेसाठी वास्तविकता बनले आहे. राज्याच्या या प्राजेद्वारे प्रादर्शित होणारी एकता, विभाजित जगाच्या अगदीच विरुद्धतेत आहे. राज्य ही एकात्मतेची शक्‍ती असण्यासाठी आपण त्यास आपल्या जीवनात वास्तविक बनवले पाहिजे. ते आपल्यासाठी वास्तविक कशाने बनते?

३ इतर सरकारांप्रामाणे, राज्याची काही नियमावली आहे. तरीसुद्धा, त्याचे नियम बायबलमध्ये आढळत असल्यामुळे ते भिन्‍ना आहे. राज्याची प्राजा या नात्याने आपल्याकडून जे अपेक्षिले जाते त्याविषयी आवश्‍यक स्मरणिका देवाच्या वचनाचे नियमितपणे वाचन केल्याने प्राप्त होतात. आपल्या प्राकाशनांचा व्यक्‍तिगत अभ्यास आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ यांच्याकडील निर्देशन आपल्याला दररोजच्या जीवनात देवाच्या नियमांचा अवलंब करण्यास मदत करतात. (मत्त. २४:४५) अशाप्राकारचा व्यक्‍तिगत अवलंब केल्याने, राज्य आपल्यासाठी अधिकाधिक वास्तविक बनते, जागतिक बंधुत्वात आपणास अधिक जवळ आणते व येशूच्या अधिपत्याखाली आपल्याला उपासकांचे अविभक्‍त कुटुंब बनवते.

४ राज्य प्राचाराद्वारे एकता: “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” राज्याच्या सुवार्तेचा प्राचार करणे ही आपली कामगिरी आहे. (प्रो. कृत्ये १:८) यहोवाचे “गौरव” करण्याचा आपण प्रायत्न करतो तसे “एकमताने” केलेला प्राचार आपणास एक करतो. (रोम. १५:५, ६) सबंध पृथ्वीवरील आपल्या सहकाऱ्‍यांसोबत आवेशाने सहभाग घेतल्याने, आपला विश्‍वास बळकट केला जातो व यहोवाची इच्छा पूर्ण करण्यात आपल्याद्वारे त्याच्या आत्म्याचे कार्य होण्यास अनुमती मिळते. “प्राभुच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करावयास असल्यामुळे आपण “स्थिर व अढळ” होतो.—१ करिंथ. १५:५८.

५ पुष्कळ देशांमध्ये, आपल्या प्राचार कार्यात विघ्न उत्पन्‍ना करून सैतान आपली एकता तोडण्याचा प्रायत्न करतो. मतभेद होण्यास फूस लावून व गैरसमज निर्माण करून भांडणतंटे आणि झगडे उत्पन्‍ना करण्याचा प्रायत्न करण्यासाठी तो त्याच्याजवळील प्रात्येक साधनाचा उपयोग करतो. (नीती. ६:१९; गलती. ५:१९-२१, २६) जगिक वादविषयांमध्ये आपण गोवले जावे तसेच राजनैतिक व सामाजिक बाबींची बाजू घ्यावी असे तो इच्छितो. (याको. ३:१४-१६) त्याच्या प्राभावाचा प्रातिकार करण्यास शास्त्रवचने आपणास आर्जवतात; नाहीतर त्याचे भक्ष्य बनवून तो आपणास गिळंकृत करील. (१ पेत्र ५:८, ९) राज्याच्या वास्तविकतेला आपल्या अंतःकरणातून किंवा मनातून निस्तेज होण्यास वाव दिला जाऊ नये.

६ आपली एकता राखण्याकरता मनाचा संयम आणि वरील बुद्धी यांची आवश्‍यकता आहे. समस्या उद्‌भवतात व विशेषतः आपले बांधव गोवलेले असतात, तेव्हा शांती टिकवण्याकरता आपण आत्म्याची फळे प्रादर्शित केली पाहिजेत. घमंड, मत्सर आणि स्वार्थ यासारखे जगिक गुण फूट पाडणारे आहेत आणि त्यांच्यावर मात केली पाहिजे. (इफिस. ४:१-३; कलस्सै. ३:५-१०, १२-१४) आपली मने सकारात्मक, उभारणीकारक विचारांनी भरवण्याची आवश्‍यकता आहे. राज्य आपल्या जीवनातील वास्तविकता आहे! परंतु ती तशीच ठेवण्याकरता आपल्याला जागरूक राहण्याची गरज आहे!—इफिस. ६:११, १३.

७ आपल्या अद्‌भुत राज्य आशेची वास्तविकता आपणास एकतेच्या आत्म्यात एकवटते व त्याचा कधीही अंत होणार नाही.—स्तोत्र १३३:१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा