घोषणा
▪ साहित्य सादरता
ऑक्टोबर: सावध राहा! किंवा टेहळणी रुज यांची वर्गणी. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची व पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. कृपया याची नोंद घ्या की: टेहळणी रुज नियतकालिकाच्या पाक्षिक वर्गण्या कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि मराठी यात उपलब्ध आहेत; मासिक वर्गण्या ऊर्दू, गुजराती, नेपाळी, बंगाली आणि हिंदी यात उपलब्ध आहेत. सावध राहा! नियतकालिकाच्या पाक्षिक वर्गण्या तामिळ आणि मल्याळम यात उपलब्ध आहेत; मासिक वर्गण्या कन्नड, गुजराती आणि तेलगू यात उपलब्ध आहेत. सावध राहा! नियतकालिकाच्या वाटपाच्या प्रती मंडळीला त्रैमासिकाच्या रुपात नेपाळी, बंगाली, मराठी आणि हिंदी यात उपलब्ध आहेत, परंतु या प्रत्येकाच्या वण्या या चार भाषांमध्ये उपलब्ध नाहीत.
नोव्हेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यासोबत द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? हे पुस्तक. इंग्रजीशिवाय इतर भाषांमध्ये स्कूल माहितीपत्रकाऐवजी कोणतेही माहितीपत्रक किंवा १९२-पृष्ठांचे कोणतेही पुस्तक सादर केले जाऊ शकते.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४०.०० रुपयांना. साठ्यात हे पुस्तक नसल्यास किंवा परिस्थितीमुळेच पर्यायी सादरता करावी लागल्यास, तुम्ही कदाचित माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् या पुस्तकाचा वापर करू शकता किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक त्याच किंमतीत देऊ शकता (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २०.०० रुपयांना).
जानेवारी: जुन्या १९२-पानी पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ६.०० रुपयांना.
▪ मंडळीशी निगडित असणाऱ्या सर्वांनी, टेहळणी रुज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या नवीन तसेच नूतनीकरणाच्या शिवाय वैयक्तिक वर्गण्या मंडळीद्वारे पाठवाव्यात, थेटपणे संस्थेला पाठवू नयेत.
▪ आमची राज्य वा याच्या या अंकात “१९९५ करता ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” ही पुरवणी आहे. तिला संपूर्ण १९९५ वर्षामध्ये संदर्भ पाहण्यासाठी जवळ ठेवावे. तुम्हाला हे आढळून येईल की, १९९४ चा आराखडा फेब्रुवारी २०, १९९५ पर्यंत असला, तरी १९९५ चा आराखडा जानेवारी २, १९९५ या आठवड्यापासून सुरु होतो. हा आराखडा पुढे ढकलण्यात आला आहे याचे कारण हे की, दशकांपासून करत आलो आहोत त्याप्रमाणे दोन महिने पाठीमागे असण्याऐवजी आपण जानेवारी १९९५ पासून ब्रुकलिनचा आराखडा अनुसरणार आहोत. त्यामुळे, १९९४ च्या आराखड्यात जानेवारी आणि फेब्रुवारीसाठी नेमलेले साहित्य तसेच फेब्रुवारी २० च्या आठवड्यासाठी नेमलेली लेखी उजळणीही घेतली जाणार नाही. भविष्यातील सभांमध्ये या साहित्यामधील मुद्दे आणण्यासाठी प्रशाला पर्यवेक्षकांनी होता होईल तितके प्रयत्न केले पाहिजेत, परंतु जानेवारी २ पासून सुरु होणाऱ्या आठवड्यापासून सर्व मंडळ्यांनी १९९४ चा आराखडा वापरणे सोडून द्यावे आणि यात पुरवलेला १९९५ चा आराखडा वापरावा. पूर्वीच्या वर्षापासून करत आलो आहोत त्याप्रमाणे मार्च ते फेब्रुवारीपर्यंतचा आराखडा असण्याऐवजी, येथून पुढे दर वर्षी प्रशालेचा आराखडा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचा असेल. १९९५ मध्ये जगातील आपले बहुतांश बांधव अनुसरणारा प्रशालेचा आराखडा आपणही अनुसरू याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे.
▪ प्लॅस्टिक बॅज कार्डाच्या पाकीटांच्या मागणीबद्दल कृपया एप्रिल १९९४ ची आमची राज्य वा यातील शेवटच्या घोषणेची उजळणी करा.
▪ मोठ्या अक्षर छपाईच्या गीतपुस्तकांची किंमत प्रचारकांसाठी ६०.०० रुपये आणि पायनियरांसाठी ४५.०० रुपये आहे.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
कन्नड, गुजराती, मराठी आणि हिंदी: जेहोवाज विट्नेसेस इन द ट्वेंटियत सेंच्युरी.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
इंग्रजी: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—नियमित आकाराचे (bi12), सींग प्रेझेज टू जेहोवा—मोठ्या आकाराचे; कन्नड: कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव, मुक्तीकडे नेणारा ईश्वरी सत्याचा मार्ग, सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल; नेपाळी: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!; बंगाली: काळजी वाहणारा देव आहे?, कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव; हिंदी: सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल
▪ साठा नसेलली प्रकाशने:
इंग्रजी: जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंग्डम; हाऊ टू फाईंड द रोड टू पॅरडाइस (पत्रिका); गुजराती: काळजी वाहणारा देव आहे?, “राज्याची ही सुवार्ता;” तामिळ: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे; मल्याळम: जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?; हिंदी: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, “राज्याची ही सुवार्ता.”