ऑक्टोबरमध्ये वर्गण्यांबद्दल जाणीवपूर्वक असा
१ टेहळणी रुज आणि सावध राहा! यात सार्वकालिक सुवार्तेचा सांत्वनदायक आणि प्रोत्साहनदायक संदेश आहे. वर्गण्यांबद्दल जाणीवपूर्वक असणे यामध्ये, त्यांना काळजीपूर्वकतेने वाचण्यासाठी वेळ काढणे आणि आपल्या क्षेत्रातील लोकांना त्यातील लेख कसे अपीलकारक असतील याचा विचार करणे यांचा समावेश आहे.
२ सर्वप्रथम, मुखपृष्ठावर ठळकपणे दाखवलेल्या लेखांशी परिचित व्हा. मुखपृष्ठावरील चित्रेच घरमालकास वर्गणी करण्यास किंवा किरकोळ नियतकालिके घेण्यास चालना देतील. तुमच्या क्षेत्रातील लोकांना अपीलकारक ठरतील असे तुम्हाला वाटणारे लेख निवडा. ते लोक मुख्यत्वे एकाच धार्मिक विश्वासाचे आहेत का? त्यांच्या अधिक चिंतेच्या गोष्टी कोणत्या आहेत? या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला एक परिणामकारी सादरता तयार करणे शक्य झाले पाहिजे. खाली दिलेल्या सादरतांकडे लक्ष द्या.
३ तुम्ही चर्चला जाणाऱ्या व्यक्तीला ऑक्टोबर १ च्या “टेहळणी रुज” नियतकालिकाचा उपयोग करून वर्गणी सादर करत असल्यास, तुम्ही कदाचित “बायबल—त्याचे खरे मूल्य काय आहे?” हा लेख सादर कराल. म्ही अ म्ह शकता:
▪“चर्चला जाणाऱ्या बहुतेक सर्वांकडेच बायबल आहे. ज्यांच्याकडे ते आहे त्यांना वाटते की त्यामध्ये खास मूल्यवान असे काहीतरी आहे.” त्यानंतर तुम्ही कदाचित असा थेट प्रश्न विचारू शकता: “कोणती गोष्ट बायबलला अतुलनीय बनवते, असे तुम्हाला वाटते?” किंवा, “अधिक लोकांना बायबलमधून फायदा कशामुळे होईल असे तुम्हाला वाटते?” घरमालकाच्या प्रतिसादानंतर, तुम्ही उचित विवेचनांनी असे म्हणू शकता: “बायबल हे देवाकडून प्रेरित केलेले वचन आहे आणि आपल्यासाठी ते एक विश्वसनीय मार्गदर्शक आहे याचा भरपूर पुरावा आहे. आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे निरवणारे ज्ञान त्यात आहे. [योहान १७:३ वाचा.] पुष्कळ लोक त्याचा आदर करतात परंतु त्याचा उपयोग कसा करावा हे त्यांना माहीत नाही. टेहळणी रुज नियतकालिकाच्या या लेखात, तुम्ही भविष्याबद्दलच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरता व्यक्तिगतरित्या बायबलचा उपयोग कसा करू शकता हे समजावून सांगितले आहे. तुमच्या घरी टेहळणी रुज नियतमितपणे यावे असे मला वाटते.”
४ ऑक्टोबर १५ च्या “टेहळणी बुरुज” नियतकालिकाचा उपयोग करून तुम्हाला कदाचित असा साधा प्रस्ताव प्रस्तुत करण्यास आवडेल:
▪“बहुतेक सर्वांनीच आपल्या प्रिय जनांना मृत्यूत गमावले आहे. ‘मृतांची काय अवस्था आहे?’ हा प्रश्न या लेखात विचारला आहे. एखादी व्यक्ती मरते तेव्हा काय होते असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] तुम्हाला या तसेच इतर प्रश्नांची उत्तरे हवी असल्यास, तुम्ही या नियतकालिकाची वर्गणी भरावी असे मी सुचवीन.”
५ ऑक्टोबर २२ च्या “अक!” नियतकालिकात खोटा धर्म अपयशी ठरला हे दाखवणाऱ्या अनेक पुराव्यांमधील एकाचे परीक्षण केले गेले आहे. “व्हेन रिलिजन टेक्स साईडस् इन वॉर” यावरील लेख वापरून तुम्ही असा प्रश्न विचारू शकता:
▪“आजचे धर्म आणि धार्मिक नेते युद्धाचा अंत करू शकतील असे तुम्हाला वाटते का? आमच्या भोवतालच्या सर्व हिंसाचाराबद्दल देव कसा विचार करतो असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबलमध्ये येशूने सर्वांवर, आपल्या शत्रूंवरही प्रेम करावयास शिकवले. सर्वजण ती शिकवण पाळतील अशी वेळ येईल असे तुम्हाला वाटते का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] अक! नियतकालिकाचा हा अंक त्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि देवाचे राज्य कशाप्रकारे यावर उपाय काढील हे स्पष्ट करतो.”
६ तुम्ही बायबलची चर्चा करू शकला नाहीत, तरी प्रत्येक दारी वर्गणी सादर करण्याचा प्रयत्न करा. वर्गणी नाकारण्यात आल्यास, नियतकालिकांच्या किरकोळ प्रती नक्की सादर करा व अशाप्रकारे पुनर्भेटी दरम्यान वर्गणी सादर करण्यासाठी मार्ग तयार करा.