आस्था दाखवणाऱ्यांची प्रेमळपणे मदत करा
१ देव वचनाच्या सत्याबद्दल प्रामाणिक आस्था दाखवलेल्या हबशीकडे यहोवाच्या दूताने निरवल्यावर, तो वाचत असलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यासाठी शिष्य फिलिप्पाने प्रेमळपणे स्वतःला सादर केले. (प्रे. कृत्ये ८:२६-३९) आस्था दाखवणाऱ्यांची मदत करण्यासाठी आपण खास प्रयत्न करतो का? आपण तसे केले पाहिजे, कारण आपल्या ईश्वरी नेमणूकीत शिष्य बनवण्याचे काम समाविष्ट आहे. (मत्त. २८:१९, २०) त्यांची मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो?
२ पुनर्भेटी घेण्यासाठी प्रत्येक आठवडी वेळ बाजूला राखून ठेवा. आस्था दाखवलेल्यांची भेट घेण्यासाठी व्यवस्था करा आणि तुमच्या सुरवातीच्या भेटीत केलेली शास्त्रवचनीय चर्चा पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करा. बायबल अभ्यास सुरु करण्याचे ध्येय लक्षात ठेवा. घरमालक अद्यापही वर्गणी करण्यास मागेपुढे करत असल्यास, टेहळणी रुज आणि सावध राहा! नियतकालिकांचे अलिकडील अंक सादर करण्यासाठी नियमितपणे जात राहा.
३ तुम्ही प्रथम भेटीत बायबलच्या मूल्याबद्दल चर्चा केली असल्यास, “रिझनींग” पुस्तकातील पृष्ठ ६६ वरील सूचनेने संभाषण पुन्हा सुरु करून तुम्ही असे म्हणू शकता:
▪“आपल्या आधुनिक जगात बायबलचा सल्ला व्यावहारिक नाही असे काहींना वाटते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपल्याला आनंदी कौटुंबिक जीवन असण्यास उचित सल्ला पुरवणारे पुस्तक व्यावहारिक आहे यावर तुमचे सहमत नाही का? [विवेचनासाठी वाव द्या.] कौटुंबिक जीवनाचे सिद्धांत आणि रीती बदलल्या आहेत आणि त्याचे परिणाम आज आपण पाहतो त्याप्रमाणे चांगले नाहीत. परंतु बायबल सांगते त्या गोष्टींचा अवलंब करणारी कुटुंबे स्थिर आणि आनंदी आहेत.” कलस्सैकर ३:१८-२१ वाचा. तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता ही पत्रिका सादर करा आणि आपण मोफत बायबल अभ्यासाचा कार्यक्रम सादर करतो हे समजावून सांगा.
४ मृतांच्या अवस्थेबद्दलची चर्चा तुम्ही अशाप्रकारे सुरु करू शकता:
▪“मृतांच्या अवस्थेबद्दल लोकांची पुष्कळ मते आहेत. मरण पावल्यावर आपले काय होते असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपण कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात असतो असे बहुतेक धर्म शिकवतात. बायबल याविषयी काय सांगते ते जाणून पुष्कळांना आश्चर्य वाटले आहे. [उपदेशक ९:५ वाचा.] मृत कोणत्याही प्रकारे शुद्धीवर नसले तरी त्यांना विसरण्यात आलेले नाही. देवाने त्याच्या राज्य शासनात त्यांना पुन्हा जिवंत करण्याचे अभिवचन दिले आहे.” ऑक्टोबर १५, १९९४, च्या टेहळणी रुज नियतकालिकाकडे किंवा अनंतकाल जगू शकाल पुस्तकाच्या पृष्ठ १६२ कडे वळा आणि शास्त्रवचनांवर व चित्रांवर चर्चा करा. बायबल अभ्यास सुरु करण्याच्या दृष्टिकोनाने आणखी एका पुनर्भेटीची योजना करा.
५ युद्धाच्या ख्रिस्ती दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, तुम्हाला कदाचित असे म्हणावेसे वाटेल:
▪“काहींचा असा विश्वास आहे की, केवळ लढायांनी झगडे मिटवले जाऊ शकतात. तुम्हाला त्याबद्दल काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल दाखवते की, लोकांनी शांतीने एकत्र राहावे अशी देवाची इच्छा आहे. [रोमकर १२:१७, १८ वाचा.] देवाच्या राज्याखाली ती जगभरात एक वास्तविकता अशी बनेल.” देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकातील पृष्ठे २५-६ वरील संदर्भ द्या. बायबल भवितव्यासाठी कोणती आशा देते ते समजावून सांगण्यास पुन्हा येईन असे सांगा.
६ हबशी षंढाने कोणा मार्गदर्शकाविना समज घडू शकत नाही हे कबूल केले. (प्रे. कृत्ये ८:३१) फिलिप्पाने प्रेमळपणे त्याला लागणारी मदत दिली. आपणही अशाचप्रकारे मदत करून इतरांबद्दल आपले खरे प्रेम व्यक्त करू शकतो.