प्रश्न पेटी
▪ मंडळीत एखादा नियमित पायनियर स्थालांतरीत होतो त्यावेळी सचिवांनी काय करावे?
सचिवांनी मंडळीचा अहवाल (S-1) याच्या पाठीमागे दिलेल्या जागेत लिहून संस्थेला कळवावे. यासाठी रकाना दिलेला नसला तरी, पायनियरच्या आधीच्या मंडळीचे नाव, म्हणजेच जेथून तो आला आहे ते देखील दाखवले पाहिजे. सचिवांनी पायनियरच्या आधीच्या मंडळीच्या सचिवांशी तत्काळ संपर्क साधावा व त्या मंडळीच्या फाईलमधील पायनियरची सर्व प्रचारक नोंद कार्डे (S-21) त्याचप्रमाणे, मंडळीच्या सेवा समितीकडून प्रस्तावनेच्या पत्रासाठी देखील विनंती करावी.
पायनियर दुसरीकडे जातो तेव्हा स्थिरावण्यात आणि सेवेसाठी चांगला नित्यक्रम स्थापण्यात त्याला बहुधा काही समस्या असतात. नवीन मंडळीत झालेली बदली सुरळीतपणे पार पडावी यासाठी वडिलांनी पायनियरला प्रेमळ साहाय्य दिले तर, तो त्याची गुणग्राहकता बाळगतो.
स्मरणिका: एक नियमित पायनियर बदली करतो तेव्हा, पायनियरच्या आधीच्या मंडळीतील सचिवांनी S-1 कार्डवर काही दाखवू नये. पायनियर ज्या मंडळीत गेला आहे त्या मंडळीच्या सचिवांनी ते दाखवावे. त्याचप्रमाणे, एखाद्या पायनियर बहिणीचा विवाह होऊन ती दुसऱ्या मंडळीत जाते, त्यावेळी सुद्धा पायनियरच्या आधीच्या मंडळीतील सचिवांनी संस्थेला त्याबद्दल सांगण्याची गरज नाही. परंतु, पायनियर ज्या मंडळीत गेला आहे त्या मंडळीच्या सचिवांनी संस्थेला कळवावे. त्याने पायनियरच्या नावातील बदल दाखवावा व दोन्ही, नवे तसेच जुने नाव दाखवावे त्याचप्रमाणे, मंडळीचा बदल म्हणजेच पायनियरच्या आधीच्या आणि सध्याच्या मंडळीचे नाव दाखवावे.
एका नियमित पायनियरने पूर्ण-वेळेची सेवा थांबवली किंवा काही कारणासाठी त्याला त्या स्थानावरून कमी केले असेल तर S-1 कार्डच्या मागे कोणतीही नोंद करू नये. पायनियर जेथे सेवा करीत होता त्या मंडळीतील सचिवांनी संस्थेला, नोटीफिकेशन फॉर डिस्कंटीन्यूइंग रेग्यूलर पायनियर सर्व्हिंस (S-206) हा फॉर्म पाठवावा. प्रत्येक मंडळीला असे दोन फॉर्म पुरवले आहेत. या मूळ प्रती मंडळीच्या कायमच्या फाईलमध्येच ठेवाव्यात व आवश्यकता असेल तेव्हा व त्याची गरज असल्यास त्याच्या नकला काढाव्यात. तुमच्या फाईलमध्ये सध्या हा फॉर्म उपलब्ध नसेल तर, संस्थेला लिहू शकता. तुमच्या फाईलमध्ये ठेवण्यासाठी, लागल्याच तर प्रती बनवून वापरण्यासाठी काही फॉर्म्सची विनंती करा.
संस्थेला कोणत्याही प्रकारच्या स्थगतीबद्दल कळवताना, फॉर्म नीट काळजीपूर्वकतेने वाचा व सर्व रकाने भरून काढा. नेहमी स्थगतीबद्दल कळवताना सोबत पायनियरचे ओळखपत्र पाठवावे. पायनियरने त्याचे ओळखपत्र हरवले असल्यास फॉर्मवर तसा उल्लेख करावा.
कृपया तत्पर व अचूक असा. नियमित पायनिरशी संबंधित कोणतेही बदल असल्यास संस्थेला कळवताना विस्तृत माहिती द्या. काहीवेळा आम्हाला, ‘आमच्या मंडळीतील पायनियरने त्याचे कार्य स्थगित केले आहे’ असे पत्र मिळते परंतु, त्यात नाव दिलेले नसते. बहुतेकवेळा, एक नियमित पायनियर नवीन मंडळीत गेला असेल, व तो तेथे पायनियर सेवा चालू ठेवत असताना देखील आम्हाला S-206 हा फॉर्म मिळतो. एखादा पायनियर, तुमच्या मंडळीतून दुसऱ्या मंडळीत गेल्यावरही, नियमित पायनियर या नात्याने सेवा करीत असतो तेव्हा S-206 फॉर्म पाठवू नका. नव्या मंडळीतील सचिव आम्हाला मंडळीचा बदल व लागू होत असल्यास, नावात झालेला बदल याविषयी कळवतील. तसेच, कृपया मंडळीचा अहवाल (S-1) या कार्डवर खास पायनियरांच्या कार्याचा अहवाल देऊ नका. हे कार्ड केवळ मंडळीतील प्रचारक, साहाय्यक पायनियर, व नियमित पायनियरांच्या कार्याचा अहवाल देण्यासाठी आहे. खास पायनियर त्यांचा अहवाल थेटपणे संस्थेला पाठवतात.
या बाबींमध्ये तुम्ही लक्ष दिल्यामुळे, आम्हाला आमचे अहवाल ठेवण्यास ते मदतदायी ठरेल. ते आम्हाला क्षेत्राच्या गरजांसाठी सेवा पुरवण्यात मदत करील. हे सर्व काही, यहोवाला गौरव आणेल अशा विस्तारित कार्यासाठी आहे.