वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९४ पृ. ४
  • इतरांना सत्य शिकण्यासाठी मदत करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांना सत्य शिकण्यासाठी मदत करा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही पुन्हा गेल्यावाचून ते कसे ऐकतील?
    आमची राज्य सेवा—१९९४
  • इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
    आमची राज्य सेवा—२००५
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ७/९४ पृ. ४

इतरांना सत्य शिकण्यासाठी मदत करा

१ येशू पृथ्वीवर सत्याची साक्ष देण्यास आला. इतरांना सत्याचा प्रचार व्हावा यासाठी त्याने त्याच्या शिष्यांना शिक्षक होण्यास प्रशिक्षित केले. इतरांना शिकवण्याच्या त्यांच्या यशस्वीतेबद्दल तो इतका आत्मविश्‍वासी होता की, त्याने त्यांना “शास्त्री” म्हटले. (मत्त. १३:५२) त्याने प्रत्येकाची तुलना, ज्यातून प्राप्त केले जाऊ शकते असे खऱ्‍या धनाचे भांडार असणाऱ्‍या व्यक्‍तीशी केली. येशूचे शिष्य आज, राज्य प्रचाराचे कार्य वाढवण्यासाठी छापील प्रकाशनांचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, इतरांना शिष्य बनवण्यात मदत करण्यासाठी आमच्याजवळ विविध पुस्तिका आहेत. ही मूल्यवान साधने कशी वापरली जाऊ शकतात?

२ “सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल,” ही पुस्तिका सादर करण्याकडे निरवणारे संभाषण सुरु करण्यासाठी तुम्ही विचारू शकता:

▪“मानवाच्या सर्व प्रयत्नांनंतर देखील, सुरक्षित भवितव्याची आशा फारच मंद वाटते, असे का आहे याबद्दल तुम्ही कधी विचार केला का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] एवढे सर्व प्रयत्न निष्फळ का ठरले याचे स्पष्टीकरण पवित्र शास्त्र देते.” स्तोत्र १४६:३, ४ वाचा. घरमालकासोबत परिच्छेद ६ मधील माहितीवर कारणमीमांसा केल्यावर तुम्ही विचारू शकता: “आम्हाला दीर्घ-काळाची सुरक्षा पुरवण्यास कोण खरोखरच समर्थ आहे?” घरमालकाच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने, परिच्छेद ७ मधील उचित मुद्यांवर चर्चा करण्यास तुम्ही निवडाल किंवा भविष्यात दुसऱ्‍या वेळी तसे करण्यासाठी व्यवस्था कराल.

३ “काळजी वाहणारा देव आहे का?” ही पुस्तिका तुम्ही वापरू शकता, असा येथे एक मार्ग आहे:

▪“पुष्कळ लोकांनी, या दोन चित्रांखालील मथळ्यातील प्रश्‍न विचारला आहे. [६ व ७ पृष्ठाच्या खालचा प्रश्‍न वाचा, व प्रतिसादास वाव द्या.] एखादा प्रेमळ देव एकाच वेळी चांगल्यास व वाईटास अनुमती देणार नाही यासाठी, येथे यशया ६५:२१-२४ मध्ये लिहिलेल्या त्याच्या अभिवचनाबद्दल तुम्हाला काय वाटते?” थोडी आस्था व्यक्‍त करणारे विवेचन तुम्हाला मिळाल्यास, परिच्छेद ३७ कडे वळा व देवराज्याद्वारे काय साध्य होईल ते समजावून सांगा.

४ “जीवनात आणखीन पुष्कळसे आहे!” ही पुस्तिका सादर करताना तुम्ही असे म्हणू शकता:

▪“पुष्कळांसाठी जीवनाचा दर्जा खिन्‍न व कंटाळवाण्या कामासारखा झाला आहे. जीवन अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी कशाची गरज आहे असे तुम्हाला वाटते? [घरमालकाला त्याचे मत व्यक्‍त करू द्या.] पवित्र शास्त्र दाखवते की, देवाने आम्हासाठी उत्तम गोष्टी राखून ठेवल्या आहेत. तो येथे प्रकटीकरण २१:४, ५ मध्ये काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या.” उचित असल्यास, पुस्तिकेच्या परिच्छेद ४२ मधील मुद्यांवर चर्चा चालू ठेवा.

५ “भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!,” या माहितीपत्रकाचा उपयोग करून एक तरुण प्रचारक विचारू शकतो:

▪“भूतलावर अशा एका नंदनवनात राहावयास तुम्हाला आवडेल का? [पुढील व मागील पृष्ठ दाखवा, व विवेचनास वाव द्या.] पवित्र शास्त्र येथे योहान १७:३ मध्ये जे म्हणते, त्यासाठी मी व माझे कुटुंब तेथे राहण्याची वाट पाहात आहोत.” शास्त्रवचन वाचल्यावर, आस्था दिसून आल्यास त्या व्यक्‍तीला वाचण्यासाठी माहितीपत्रक सादर करा.

६ या महिन्यादरम्यान तुम्ही इतर पुस्तिका किंवा माहितीपत्रकांचा उपयोग करत असाल तर, वरील सूचनांप्रमाणे तुम्ही तुमची प्रस्तावना व सादरता बनवू शकता. संक्षिप्त असण्याचे व घरमालकांची आस्था उत्तेजित करणारी सकारात्मक व उभारणीकारक विवेचने करण्याचे लक्षात ठेवा.

७ यहोवाने आम्हाला सत्य प्रदान केले आहे. आम्हाला भेटणाऱ्‍या लोकांशी छापील गोष्टींद्वारे व आपल्या संभाषणाद्वारे त्याचा सहभाग इतरांशी करण्यास आम्हासमोर असणाऱ्‍या संधींचा आम्ही फायदा घेतला पाहिजे. अशाप्रकारे, इतरांच्या चिरकालिक लाभासाठी आपण स्वतः जाहीर शास्त्री आहोत याचा पुरावा आपण देतो.—मत्त. २८:१९, २०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा