वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९४ पृ. २
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९३
  • आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास मदत करणारे विभागीय संमेलन
    आमची राज्य सेवा—२००९
  • देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ९/९४ पृ. २

विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम

१ पुढील वर्षाच्या आरंभाला घेतल्या जाणाऱ्‍या विभागीय संमेलनाच्या नवीन कार्यक्रमाचे शीर्षक ‘सावध असा, विश्‍वासात स्थिर राहा, खंबीर व्हा,’ हे असेल. ते १ करिंथकर १६:१३ मधील पौलाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या उत्तेजनात्पर शब्दांवर आधारित आहे.

२ कार्यक्रमाची सुरवात, आध्यात्मिक आत्म-परीक्षणाच्या सतत गरजेला ठळकपणे मांडण्याद्वारे होईल. या “शेवटल्या काळी,” योग्य गोष्टींना चिकटून राहण्यासाठी यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाचे आणि त्याच्या पार्थिव संघटनेबरोबरील आपल्या भूमिकेचे मूल्य ओळखण्याची गरज आहे. (२ तीम. ३:१) आमच्या सर्व कठीण परिश्रमाबद्दल आम्हाला देवाच्या गुणग्राहकतेची आठवण करून दिली जाईल. आमचे ख्रिस्ती गुण सुधारण्यासाठी आणि उदाहरणीय वर्तणूक टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला सूचनेची आवश्‍यकता आहे.

३ आध्यात्मिक प्रगती आणि जबाबदारी सांभाळताना शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशी राहण्याच्या गरजेवर देखील जोर दिला जाईल. व्यक्‍ती तसेच कुटुंबे, नियमित आध्यात्मिक भरवणूकीच्या कार्यक्रमाला कसे टिकवून ठेवू शकतात याविषयी विविध भाषणे, प्रात्यक्षिके आणि चर्चांद्वारे व्यावहारिक सूचना सादर केल्या जातील.

४ शनिवारी पात्र सदस्यांना पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे त्यांच्या समर्पणाची जाहीर घोषणा करण्यास वाव मिळेल. त्यानंतर, रविवारी आम्हा सर्वांना, “यहोवा तुम्हाला कोणत्या नजरेतून पाहतो?” या जाहीर भाषणास उपस्थित राहावयास आवडेल.

५ विश्‍वासात स्थिर राहण्यास, म्हणजेच एकमेकांशी नेहमीच प्रीती व शांतीच्या आत्म्याने वर्तणूक राखण्याचे उत्तेजन देऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल. यहोवा आम्हा सर्वांना ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन’ देण्यासाठी पुरवीत असलेल्या विशेष संधींपैकी विभागीय संमेलन ही एक आहे. (इब्री. १०:२४, २५) दोन्ही दिवसांच्या सबंध कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यास निश्‍चित योजना करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा