टेहळणी बुरुज व अवेक! —सत्याची नियतकालिके
१ जानेवारी १, १९९४ च्या टेहळणी बुरुज अंकाच्या “द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके,” या लेखातील परिच्छेद ११ ने आम्हास आठवण करून दिली की, आमची नियतकालिके “लोकांच्या वास्तविक गरजांशी संबंध ठेवणाऱ्या व त्यांच्या जीवनावर खरेपणाने प्रभाव पाडणाऱ्या समयोचित लेखांना,” प्रकाशित करतात. आम्हाला या नियतकालिकांचे विस्तीर्ण वाटप करायचे आहे. एप्रिल व मे महिन्यांमध्ये, टेहळणी बुरुज व/किंवा अवेक! यांची वार्षिक वर्गणी ही प्रस्तुत करण्याची सादरता आहे.
२ घरोघरच्या कार्यामुळे आम्हाला या नियतकालिकांच्या वर्गण्या किंवा त्यांच्या किरकोळ प्रतींना सादर करण्यास उत्तम संधी मिळते. प्रभावकारी साक्षकार्य आणि पुनर्भेटींमुळे देखील, त्यांचे नियमितपणे वाटप होते. त्याचप्रमाणे, रस्त्यावरील कार्य करणे आणि आमच्या क्षेत्रातील व्यापारी कारखान्यांना भेटी देणे, हे देखील वाटप वाढवण्याचे फलदायी मार्ग आहेत.
३ चर्चा करण्यासाठी विषय: टेहळणी बुरुजच्या पाक्षिक आवृत्तींचा एप्रिल १ चा अंक, “चांगले जग—केवळ एक स्वप्न?” आणि “चांगले जग—जवळ आहे!” या विषयांवर चर्चा करतो. हे निश्चितच, देव राज्याची घोषणा करणे, या नियतकालिकेच्या हेतूशी सुसंगत आहे. ख्रिस्त येशूच्या राज्याखाली चिरकालिक नंदनवन एक वास्तविकता कशी बनेल हे दाखवून, दुसऱ्या लेखाची समाप्ती होते.—लूक २३:४३.
४ पाक्षिक आवृत्तींच्या एप्रिल १५ च्या अंकात, “तुम्हाला विश्वसनीय मार्गदर्शन कोठे मिळू शकेल?” या प्रश्नावर चर्चा केली आहे. मेच्या अंकातील “धर्म तुमच्या गरजांना तृप्त करीत आहे का?” आणि “पवित्र शास्त्र का वाचावे?” या लेखांद्वारे या विषयावर पुढे खोलवर अभ्यास केला जाईल. ज्या लोकांना त्यांचे जीवन अर्थहीन व उद्देशहीन असल्याचे वाटते, त्यांच्यासोबत आम्हाला सहजगत्या संभाषण सुरू करता आले पाहिजे.
५ वाटप वाढविणे: जानेवारी १ च्या टेहळणी बुरुजने वाटप वाढवण्यासाठी चार सल्ले दिले. आम्हास उत्तेजन दिले गेले की आम्हाला, (१) नियतकालिकांची जाणीव असावी. ती वाचताना, आपल्या क्षेत्रातील लोकांना कोणते लेख अधिक अपीलकारक असतील, याबद्दल आपण विचार केला पाहिजे. तसेच, आम्हासोबत नियमितपणे काही प्रती बाळगल्या तर, आम्ही सहकर्मचाऱ्यांना, शेजाऱ्यांना, शिक्षकांना किंवा दुकानदारांना त्या देऊ शकतो.
६ आम्हाला (२) सादरता साधी ठेवण्यास आठवण करून दिली गेली होती. एखादा मनोरंजक मुद्दा निवडा, व त्यास थोडक्या शब्दात मांडा. घरमालकाला पटवून ते नियतकालिक त्याला दिले तर, तुम्हाला भेटलेल्या व्यक्तिशी किंवा घरातील इतरांशी ते “बोलू” शकते.
७ आणखी एक गरज (३) लवचिक असण्याची आहे. चर्चा करण्यासाठी—तरुणांकरिता एखादा, पुरुषांकरिता दुसरा आणि स्त्रियांकरता आणखी काहीतरी—असे वेगवेगळे लेख मनात बाळगणे चांगले आहे.
८ शेवटी, आम्हाला (४) वाटपासाठी वैयक्तिक ध्येय ठेवण्याची गरज आहे. मंडळी, वितरणाची विशिष्ट संख्या ठरवू शकत नसली तरी, आम्ही वैयक्तिकरित्या स्वतःसाठी एक ध्येय ठेवू शकतो. यामुळे, वर्गणी किंवा नियतकालिकांची किरकोळ प्रत सादर करण्यात उत्साही असण्यासाठी आम्हाला अधिक उत्तेजन मिळेल.
९ इतरांनी देव राज्याबद्दल जाणून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. नियतकालिके, राज्य संदेश पसरवण्यास देत असलेल्या उत्तम मदतीचा आपण पूर्ण फायदा घेऊ या.—मत्त. १०:७.