वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९४ पृ. १
  • सभांची उपस्थिती—एक गंभीर जबाबदारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सभांची उपस्थिती—एक गंभीर जबाबदारी
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • सभांना नियमित उपस्थित राहण्याला —प्राधान्य देणे
    आमची राज्य सेवा—२००४
  • प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देण्याची खात्री करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km १/९४ पृ. १

सभांची उपस्थिती—एक गंभीर जबाबदारी

१ तुम्ही सभांची उपस्थिती केवढ्या गंभीरतेने घेता? तो एक शोधक प्रश्‍न आहे, नाही का? आम्ही सभांबद्दल गुणग्राहकता बाळगतो असे आम्हापैकी बहुतेक सर्वांनाच वाटते, यात काही शंका नाही. तथापि, अहवाल दर्शवतात की, अलिकडेच काही मंडळ्यांमध्ये सभांची उपस्थिती बरीच खालावली आहे. याचे कारण काय असू शकते? आमच्यापैकी काहीजण, अनावश्‍यक ऐहिक काम, कंटाळा, गृहपाठ, किरकोळ शारीरिक अस्वस्थता किंवा वाईट हवामान यांना, सभांना उपस्थित राहण्याच्या आपल्या बंधनाआड येण्यास अनुमती देतात का? (अनु. ३१:१२) ही एक शास्त्रीय गरज असल्यामुळे, आम्ही सर्वांनी प्रार्थनापूर्वक या प्रश्‍नावर विचार करायला हवा की, मी सभांची उपस्थिती केवढ्या गंभीरतेने घेतो?

२ आमचे काही बांधव, सभांना उपस्थित राहण्यासाठी धुळीने माखलेल्या रस्त्यांवरुन तासन्‌तास चालतात आणि मगरींनी व्यापलेल्या नद्या पार करतात. तुमच्या स्वतःच्या मंडळीत, गंभीर आरोग्याच्या समस्या, शारीरिक अपंगत्व, नोकरीच्या ठिकाणी जबरदस्त काम किंवा शाळेत अधिक अपेक्षा करणारे काम असताना देखील असे काही विश्‍वासू जण असतील जे कधीच ‘अनुपस्थित नसतात.’ (लूक २:३७) ते उपस्थित राहण्याचा प्रयत्न का करतात? कारण त्यांना याची जाणीव आहे की, ते केवळ स्वतःच्या शक्‍तीने या तणावपूर्ण जगाच्या समस्यांवर मात करू शकत नाहीत. त्यांनी देवाकडून पुरवलेल्या शक्‍तीवर विसंबून राहण्यास हवे.—२ करिं. १२:९, १०.

३ आरंभीचे ख्रिस्ती प्रार्थना करण्यास, अनुभवांची सहभागिता करण्यास तसेच देव वचनाचा अभ्यास करण्यास नियमितपणे भेटत होते. आज आम्ही, त्यांनी घालून दिलेल्या कित्त्याचे अनुकरण करतो. (प्रे. कृत्ये ४:२३-३०; ११:४-१८; कलस्सै. ४:१६) आम्हाला पवित्र शास्त्राची भविष्यवाणी आणि शिकवण, तसेच ईश्‍वरी आचरण आणि ख्रिस्ती नीतीतत्त्वे याबद्दल बोध मिळतो, व त्याबरोबरच शास्त्रीय तत्त्वांचा काळजीपूर्वक अवलंब करून, आमचे जीवन आता सुधारण्यासाठी समयोचित्त सूचना देखील मिळते. (१ तीम. ४:८) शिवाय, एके दिवशी समस्या आणि दुःखाचा अंत होईल या आशेची आम्हास आठवण दिली जाते. ही आशा अशीच जिवंत राखणे महत्त्वाचे आहे.—इब्री. ६:१९.

४ तुमचे कुटुंब सभांच्या उपस्थितीला केवढ्या गंभीरतेने घेते? जेवणाच्या वेळेसारखे तसेच प्रापंचिक कामासारखे, ते देखील तुमच्या आराखड्याचा एक भाग आहे का? सभेच्या सायंकाळी, तिला उपस्थित राहावे की नाही असा मनाशी वाद घालताना तुम्ही स्वतःला पाहता का? किंवा तुमच्या घराण्यात बांधवांसोबत नियमितपणे एकत्रित मिळणे हे ऐच्छिक नाही? पुष्कळ प्रचारक, ते मोठे होत असताना त्यांच्या समर्पित पालकांच्या उदाहरणाची आठवण काढतात. एक वडील प्रेमळपणे आठवतात, “बाबांबद्दल एक गोष्ट म्हणजे, सर्व कुटुंब सभेला जाईल याची ते नेहमी खात्री करत. एखादा आजारी असला की, कोणीएक त्याच्याबरोबर घरी राहायचे, बाकीचे सर्वजण सभेला जात असत!”

५ आमची राज्य सेवा याच्या आगामी अंकांमध्ये, या आध्यात्मिक तरतूदींसाठी गुणग्राहकता वाढवण्यात मदत करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रत्येक मंडळीच्या सभेच्या मूल्याबद्दल आम्ही चर्चा करू. तुमची सभांची उपस्थिती अधिक नियमित व्हावयाची असेल तर, तुम्ही कोणती गोष्ट चुकवत आहात हे ओळखण्यात ते लेख तुमची मदत करतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामध्ये सभांच्या चालकांकरता स्मरण घडवून आणणाऱ्‍या मदतदायी गोष्टी असतील, त्याचप्रमाणे त्यांची तयारी करताना आणि त्यात सहभाग घेताना आम्ही सर्वजण स्वतःला लागू करू शकू असे सल्ले देखील असतील. कुटुंब या नात्याने, एकत्र बसून तुमच्या सभांच्या उपस्थितीच्या पद्धतीवर प्रार्थनापूर्वक विचार का करू नये? त्यानंतर, तुमच्या आराखड्यात आवश्‍यक ते बदल करा. नियमित सभांची उपस्थिती आमच्या ईश्‍वरशासित शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि तिला निश्‍चितच, गंभीरतेने घेतले पाहिजे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा