जानेवारीसाठी सेवा सभा
जानेवारी ३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १०१ (४५)
५ मि:स्थानिक घोषणा. स्थानिक क्षेत्रात, लोकांना आवडतील असे चालू मासिकातील विशिष्ट मुद्दे थोडक्यात सांगा.
२५ मि:“धैर्याने परंतु चतुराईने प्रचार करणे.” सेवा पर्यवेक्षक किंवा दुसऱ्या नियुक्त वडिलांद्वारे पुरवणीची प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ३, ५ आणि ६ यांची चर्चा करताना तेथे दिलेल्या सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील अध्यायांचा संदर्भ घेण्यासाठी श्रोत्यांना उत्तेजन द्या. त्या पुस्तकातील अध्याय ६९ आणि ८१ मधील चित्रांकडे लक्ष आकर्षित करा. परिच्छेद ७-११ पूर्ण करताना, स्थानिक अवलंब करा. अशा घटना घडल्या आहेत त्या स्थानिक क्षेत्रांचा आणि भागांचा उल्लेख करा आणि त्यांना कसे उत्तमप्रकारे हाताळले जाऊ शकते ते सांगा. आम्ही लोकांना भीत नाही, परंतु सेवाकार्यात क्रोधिष्ट भूमिका घेतल्याने काही साध्य होत नाही ते दाखवून द्या. (मत्त. १०:२८; १ पेत्र ३:१५) त्याउलट, चतुर आणि सावध राहिल्याने विरोध कसा टाळला जाऊ शकतो ते दाखवा, की जेणेकरून आम्ही आमचे कार्य शांतीने आणि कमीत कमी अडथळा होईल अशाप्रकारे चालू ठेवू शकतो.
१५ मि:“आपल्या प्रकाशनांचे मूल्य ओळखण्यास इतरांची मदत करणे.” लेखाची मंडळीसोबत चर्चा करा. देव काळजी करतो का या माहितीपत्रकाचा उपयोग प्रात्यक्षिकाद्वारे दाखवा व त्यानंतर परिच्छेद ३ ची चर्चा करा. हे माहितीपत्रक उपलब्ध नसल्यास, मंडळीमध्ये साठा असलेल्या १९२-पानी जुन्या पुस्तकांच्या खास किंमतीच्या सादरतेबद्दल प्रचारकांना कळवा. परिच्छेद ५ नंतर यातील एकाला सादर करत असल्याचे एक छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ११६ (३७) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १० ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४७ (४४)
१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील उचित घोषणा.
१५ मि:तुमच्या विश्वासाला आव्हान देणाऱ्या वैद्यकीय स्थितीचा सामना करण्यास तुम्ही तयार आहात का? डिसेंबर १९९० ची आमची राज्य सेवा यातील पुरवणीच्या परिच्छेद १-३ चा उपयोग करून आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्डाच्या संरक्षणात्मक मूल्याची गुणग्राहकता बाळगण्यास बांधवांची मदत करण्यासाठी कार्यक्षम वडिलांचे उत्तेजन देणारे भाषण. एका अलिकडील चौकशीद्वारे कळाले की, तपासण्यात आलेल्या कार्डांपैकी ५० टक्क्यांहून अधिक कार्डांवर सह्या नव्हत्या, किंवा साक्षीदारांच्या सह्या नव्हत्या किंवा ती जुनी झाली होती. केवळ बाप्तिस्मा प्राप्त प्रचारकांना नवी कार्डे वितरीत करा आणि मग, ती कशी भरावीत त्यासाठी ऑक्टोबर १५, १९९१ चे मार्गदर्शनाचे पत्र पाहा. त्याच रात्री कार्डे न भरता, ती घरी नेऊन, प्रार्थनापूर्वकतेने त्यांच्या गरजेवर विचार करून, ती भरावीत, असा सल्ला बांधवांना द्या. परंतु त्यावेळी कार्डावर सही करू नका. भरलेले कार्ड पुढील मंडळीच्या पुस्तक अभ्यासात घेऊन या, जेथे कार्डांवर सह्या, साक्षीदारांच्या सह्या आणि तारीख आहे का, हे पाहण्यात वडील मदत करतील. मंडळीचे पुस्तक अभ्यास चालक, त्यांच्या गटातील सर्वजणांचा विचार केला आहे, याची खात्री करण्यासाठी एका अद्ययावत यादीचा उपयोग करतील. (बाप्तिस्मा प्राप्त पालकांना त्यांच्या मुलांची ओळख पत्रे भरण्यास मदत केली जाऊ शकते.) तो पुस्तक अभ्यास चुकवणाऱ्यांना पुढील सेवा सभेत, सर्व बाप्तिस्मा प्राप्त प्रचारकांचे कार्ड योग्य रितीने भरून सह्या केल्या जात नाहीत तोपर्यंत चालकांद्वारे/वडिलांद्वारे मदत दिली जाऊ शकते. वडिलांकडे उरलेल्या जणांची यादी असावी आणि लवकरात लवकर सर्व कार्डे पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा.
२० मि:“गुणग्राहकतेची वाढ करण्यास परतणे.” श्रोत्यांशी चर्चा. प्रचारक देव काळजी करतो का हे माहितीपत्रक वापरत असतील तर, परिच्छेद ३ मधील सूचनेचा उपयोग करून ज्या व्यक्तीने माहितीपत्रक स्वीकारले त्याच्याकडे पुनर्भेट कशी करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा. खास सादरतेत १९२-पानी पुस्तक स्वीकारलेल्यांच्या पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक देखील दाखवा.
गीत १५४ (७२) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६७ (११०)
१० मि:स्थानिक घोषणा व त्याचबरोबर जमाखर्च अहवाल. देणगीच्या पोचपावतीचा त्यात समावेश करा. संस्थेच्या कार्यांसाठी तसेच मंडळीसाठी जी आर्थिक मदत दिली गेली त्याबद्दल प्रचारकांचे आभार प्रदर्शित करा. ज्यांनी आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड अद्याप पूर्ण केले नाही त्यांना त्यांच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकांकडे किंवा एखाद्या वडिलांकडे जाऊन त्याच रात्री पूर्ण करावयास आठवण करून द्या.
२० मि:“वारंवार उरकलेल्या क्षेत्रात कार्य करणे.” योग्य वडिलांकडून प्रश्नोत्तराने पूर्ण करणे. वारंवार उरकलेल्या क्षेत्राच्या मंडळ्यांमध्ये परिच्छेद ४ मध्ये संदर्भ दिलेल्या रिझनिंग पुस्तकातील प्रस्तावनांचे तसेच परिच्छेद ६ किंवा ७ मधील एखाद्या योग्य प्रस्तावनेचे किंवा खास स्थानिक क्षेत्रासाठी तयार केलेले प्रात्यक्षिक दाखवा. आपली क्षेत्रे वारंवार न उरकणाऱ्या मंडळ्यांमध्ये, रिझनिंग पुस्तकातील इतर उचित प्रस्तावनांना प्रात्यक्षिकांद्वारे दाखवावे. प्रात्यक्षिकांची चांगली तयारी करावी.
१५ मि:व्हॉट इज अर्थ्स फ्युचर? रिझनिंग पुस्तकातील पाने ११२-१७ वर आधारित. (५ मि.) पाने ११२ आणि ११३ वरील उपशिर्षकापासून पान ११४ च्या मध्यापर्यंतच्या साहित्यावर भाषण. (७ मि.) पाने ११४-१६ वरील माहितीवर नवीन प्रचारक आणि प्रौढ, अनुभवी प्रचारक चर्चा करतात. नवीन प्रचारकांच्या जगिक नातेवाईकांनी वाद घातला आहे की, पृथ्वीचा नाश होईल असे पवित्र शास्त्र दाखवते. नवीन प्रचारक पृथ्वीबद्दलची पवित्र शास्त्रीय वचने समजण्यास, अनुभवी प्रचारकाची मदत मागतो. (३ मि.) शेवटी, पान ११७ वरील “व्हॉट काईंड ऑफ पीपल वील गॉड फेवर वीथ एंडलेस् लाईफ ऑन अर्थ?” या प्रश्नावर चर्चा करा. या आशीर्वादीत सुहक्कासाठी सर्वांनी पात्र होण्यास यत्न करण्यासाठी उत्तेजन द्या.
गीत १७६ (१६) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७८ (६७)
१५ मि:स्थानिक घोषणा. “खास संमेलन दिवसाचा नवीन कार्यक्रम” या लेखाची चर्चा. १९९४ मध्ये, खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरता आगाऊ योजना करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या. तारीख आणि जागा माहीत असल्यास त्याची घोषणा करा. त्याबरोबर ईश्वरशासित वृत्त हे जोडा. या सप्ताहांती क्षेत्र सेवेत भाग घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या. मंडळीच्या क्षेत्र सेवा व्यवस्थेचा उल्लेख करा.
१५ मि:प्रश्न पेटी. काही श्रोत्यांची सहभागिता असलेले भाषण. पहिल्या तीन परिच्छेदांमध्ये दाखवल्याप्रमाणे बाबींना का हाताळावे ते समजण्यास सर्वांची मदत करा. संस्थेला बहुतेक वेळा क्रोधिष्ट घरमालकांकडून फोन किंवा पत्र येतात. ते म्हणतात की, यहोवाच्या साक्षीदारांना पुष्कळदा त्यांच्या घरांमध्ये भेटी न देण्यास सांगितल्यावरही ते भेटी देतच असतात. यासाठी, घरोघरच्या कार्यात सहभाग घेत असताना, क्षेत्र कार्याच्या लिफाफ्याची तपासणी करून जेथे भेटी देण्यास मनाई आहे अशा घरांची नोंद घेण्याची खात्री करा. “धैर्याने परंतु चतुराईने प्रचार करणे,” या पुरवणी लेखातून योग्य मुद्यांची थोडक्यात उजळणी करून स्थानिक अवलंब करा.
१५ मि:मंडळीचे क्षेत्र कार्य. सेवा पर्यवेक्षक आणि आणखी एक वडील मंडळीच्या मागील चार महिन्यांच्या कार्याची उजळणी करतात. सेवा वर्षाचा एक तृतीयांश भाग (सप्टेंबर-डिसेंबर) समाप्त झाला आहे. मंडळी कशाप्रकारे प्रगती करत आहे? मंडळी ज्या भागांमध्ये प्रगती करत असेल तेथे मनःपूर्वक प्रशंसा करा. तसेच, मंडळी कोणत्या क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती करू शकेल त्याचा उल्लेख करा आणि व्यावहारिक सूचना सादर करा. सेवा वर्षाच्या पहिल्या चार महिन्यातील एक किंवा दोन प्रोत्साहक छोट्या क्षेत्र अनुभवांचा समावेश करा. सकारात्मक उभारणी करणाऱ्या सूचनेसह समाप्ती करा. सेवाकार्य पूर्ण केल्याने येशूला आनंद प्राप्त झाला. यहोवाने दिलेल्या कार्यात मग्न राहिल्याने आम्हाला देखील मोठा आनंद मिळू शकतो.—योहान ४:३४; १ करिं. १५:५८.
गीत १७९ (२९) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी ३१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८६ (१११)
५ मि:स्थानिक घोषणा. या सप्ताहांती क्षेत्र कार्यात सहभाग घेऊन सर्वांना लवकर सुरवात करण्यास उत्तेजन द्या. चालू नियतकालिके सादर करण्यासाठी मदतदायी सूचना सादर करू शकता.
१० मि:तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे घरोघरच्या कार्यात सादर करा. लोकांना यहोवाला जाणण्यात आणि त्याची भक्ती करण्यात पुस्तकाच्या सिद्ध झालेल्या मूल्यावर आधारित संक्षिप्त उत्साही भाषण. क्षेत्र सेवेत हे पुस्तक वापरण्यात तयारी करण्यासाठी, आमची राज्य सेवाच्या या अंकातील सूचनांना प्रचारक कशाप्रकारे वापरू शकतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि:“सभांची उपस्थिती—एक गंभीर जबाबदारी.” प्रश्नोत्तराने पूर्ण करणे. परिच्छेद २ च्या संबंधात, सभांना नियमितपणे उपस्थित राहण्यासाठी ज्या प्रचारकांनी अडथळे पार केलेत अशांची मुलाखत घ्या.
१० मि:स्थानिक गरजा. किंवा ऑक्टोबर १, १९९३, द वॉचटावरच्या सर्व पंधरवडा आवृत्तींमध्ये पाने २२-२५ वर आढळणाऱ्या “हॅव ए राईट व्ह्यू ऑफ गॉड्स मर्सी,” या लेखावर आधारित वडिलांचे भाषण. ज्या मंडळ्या महिन्याला छापल्या जाणाऱ्या टेहळणी बुरुजच्या भाषेचा उपयोग करतात, त्या ऑक्टोबर १, १९९३ आवृत्तीच्या पाने ८-११ वरील “वाट पाहण्याचे शिकून घेणे याची समस्या,” या लेखावर त्यांचे भाषण आधारू शकतात. हा लेख, ऑक्टोबर १५, १९९३ च्या इंग्रजी तसेच इतर पंधरवडा आवृतींमध्ये आला होता.
गीत १८८ (८१) व समाप्तीची प्रार्थना.