वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९३ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • माझे कपडे माझे खरे रूप प्रकट करतात का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • बाप्तिस्मा—एक महत्त्वाचं ध्येय!
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • बाप्तिस्मा—ख्रिश्‍चनांसाठी आवश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ६/९३ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ एखाद्याने बाप्तिस्म्याला स्वत:ला सादर करताना कोणता पोशाख योग्य समजला पाहिजे?

जगाच्या वेगवेगळ्या भागात पोशाखाच्या दर्जांमध्ये विविधता असली तरी, पोशाखाबद्दलची ‘भिडस्तपणा व मर्यादा’ ही पवित्र शास्त्राची सूचना सर्व ख्रिश्‍चनांसाठी कोठेही राहत असले तरी सारखीच आहे. (१ तीमथ्य. २:९) बाप्तिस्म्याला स्वत:ला सादर करताना कोणता पोशाख घालावा याचा विचार करताना ह्‍याच तत्त्वाचे अवलंबन केले जावे.

जून १, १९८५चे वॉचटावर, पृ. ३० वर, जो व्यक्‍ती बाप्तिस्मा घेणार आहे त्याला असा सल्ला दिला जातो: “बाप्तिस्म्याच्या वेळी ज्या पोशाखाचा उपयोग केला जाणार आहे त्यावरून भिडस्तपणा उठून दिसला पाहिजे. हे आजच्या दिवसात महत्त्वपूर्ण आहे कारण फॅशन कलाकार अनैतिकता दिमाखाने दाखवू इच्छितात व संपूर्णपणे नग्नता साध्य करू पाहतात. दुसरे एक कारण आहे ज्याला विचारात घेतले पाहिजे ते आहे की काही पोशाख वाळलेले असताना जेवढे भिडस्त वाटतात तेवढे ओले झाल्यावर वाटत नाहीत. बाप्तिस्मा घेणाऱ्‍या कोणाही व्यक्‍तिला, बाप्तिस्मा ह्‍या गंभीर प्रसंगी चलबिचल किंवा अडखळणास कारण होण्यास आवडणार नाही.—फिलीप्पैकरास १:१०.”

या सल्ल्याच्या अनुषंगाने, बाप्तिस्मा घेणाऱ्‍यांना त्या घटनेचे गांभीर्य लक्षात ठेऊन, भिडस्तपणाचे वस्त्र घालण्यास नक्कीच आवडेल. यास्तव, पोहताना घातला जाणारा पोशाख जो पुरेसे अंग झाकत नाही किंवा ओले झाल्यावर शरीराला अगदी असभ्यतेने चिकटून राहतो तो एका ख्रिस्ती व्यक्‍तिने घालणे साजेसा नसेल व यास्तव, तो टाळला पाहिजे. याचप्रकारे, एखाद्याने गबाळ्या किंवा गचाळ्या अवस्थेत येणेही अयोग्य असेल. याखेरीज, जगीक म्हणी असलेले किंवा व्यापारी घोषवाक्य असलेले टी-शर्टस्‌ घालणे देखील योग्य नसेल.

बाप्तिस्मा घेण्याऱ्‍या बरोबर नियुक्‍त वडिलांनी बाप्तिस्म्यासाठी असलेल्या प्रश्‍नांची उजळणी केल्यावर, योग्य पोशाख घालण्याच्या महत्त्वाबद्दल बोलण्याची ही एक उचित वेळ ठरेल. अशारितीने त्या घटनेचा सभ्यपणा राखला जातो, आणि आपण जगापासून वेगळे आहोत हे निरंतर दाखवून देऊ शकतो.—पडताळा योहान १५:१९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा