घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
जून: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्ड किंमत ४० रु.
जुलै: आपल्या समस्या त्या सोडविण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक ४.०० रु. हे माहितीपत्रक उपलब्ध नसल्यास खाली दिलेल्यांपैकी कोणतेही माहितीपत्रक त्याच किंमतीत सादर करु शकताः डज गॉड रिअली केअर अबाऊट अस?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पाहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट विल एन्ड्युअर फॉरएव्हर, किंवा नंदनवन आणविणारे सरकार.
ऑगस्ट व सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकारचे ४०.०० रु. आणि लहान आकाराचे २०.०० रु.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्यापपर्यंत वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठविली नाही ते त्यांच्या पुढील लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर (S-14) पाठवू शकतात.
▪ आधी घोषित केल्यानुसार, केरळसाठी केवळ दोन “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशनांची योजना केली आहे—एक अधिवेशन डिसेंबर २३-२६ कोटायामला आणि दुसरे अधिवेशन डिसेंबर ३० ते जानेवारी २, १९९४ कालिकतला असेल. तरीही आम्ही हे सांगू इच्छितो की, कालिकत अधिवेशनासाठी आम्ही कोणत्याही विशिष्ट मंडळ्या किंवा विभागांना नेमून देणार नाही. परंतु, केरळमधील सर्व साक्षीदारांना आणि आस्थेवाईक लोकांना कोटायाम प्रांतिय अधिवेशनास उपस्थित राहण्यास आम्ही उत्तेजन देत आहोत. कुटुंबातील सर्वच सदस्यांना त्याच अधिवेशनाला त्यांच्या घरच्या जबाबदारीमुळे उपस्थित राहणे शक्य नाही, त्यासाठी, कालिकत मध्ये दुसऱ्या एका अधिवेशनाची व्यवस्था केली आहे—परंतु हे अधिवेशन खासकरून त्यांच्यासाठी आयोजित केले आहे ज्यांनी कोटायामचे अधिवेशन चुकविले आहे. यारितीने, कालिकतच्या अधिवेशनासाठी आम्ही थोड्याच तरतूदी करणार आहोत, परंतु कोटायाममध्ये होणारे अधिवेशन ह्या राष्ट्रामध्ये सर्वात मोठे असेल याची आम्ही वाट पाहत आहोत.
▪ पुढील प्रकाशनांच्या चालू किंमतीकडे लक्ष द्या:
प्रकाशन पाय. मंडळी.
वॉचटावर पब्लिकेशन इंडेक्स १९३०-८५ ७५.०० १०५.००
वॉचटावर पब्लिकेशन इंडेक्स १९८६-९० ४५.०० ६०.००
▪ पुन्हा उपलब्ध असणारी प्रकाशने:
तामिळ: “धीस गुड न्युज ऑफ द किंग्डम.”