घरोघरच्या कार्यातील आव्हानांना गाठणे
१ खऱ्या भक्तीला ग्रहण करणाऱ्यांपैकी अनेकांना घरोघरी जाणे, व अपरिचित लोकांशी बोलणे ही कल्पना एक खरे आव्हान वाटते. पण यहोवावरील खरे प्रेम त्या व्यक्तीला या आव्हानाला गाठण्यास मदत करते, इतकेच नव्हे, तर जे निसर्गतःच लाजाळू होते त्यांनी सुवार्तेचे पूर्णवेळेचे प्रचारक होण्यापर्यंत प्रगती केली.
२ पवित्र शास्त्रावरुन हे स्पष्ट आहे की, आरंभीचे ख्रिस्ती देवराज्याच्या सुवार्तेची सहभागिता घरोघरी जाऊन करीत होते. (प्रे.कृत्ये. ५:४२; २०:२०, २१) २०व्या शतकातील ख्रिस्ती या नात्याने, आम्ही देखील या कार्यात सहभागी आहोत. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास, तिरस्कार किंवा थेटपणे विरोध असला तरीही, देवावरील व शेजाऱ्यावरील आमच्या प्रेमामुळे आपण हे कार्य करावयास प्रवृत्त झालो आहोत.
३ आव्हानांना गाठणे हे काय साध्य करते: प्रत्येक वेळच्या भेटीत आपण सत्याचे काही बीज पेरण्याचा प्रयत्न करतो, हे जाणून की सरते शेवटी सर्वांचा संकलितपणे राज्याची फळे देण्यात परिणाम होईल. (उप. ११:६) वैयक्तिकांच्या परिस्थिती बदलतात. काहीतरी घडते की ज्यामुळे घरमालकाला आपल्यातील कोणीतरी दरवाजात काय सांगितले होते त्यावर विचार करावयास लावेल आणि पुढील वेळी तो आमच्या भेटीत अधिक रस दाखवणारा असा होईल.
४ आमच्या घरोघरच्या कार्यामुळे, सत्य व धार्मिकतेकडे कल असलेल्यास यहोवा व त्याचे उद्देश यासंबंधी शिकून घेण्याची व त्यांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गावरून जाण्यास सुरु करण्याची संधी मिळते. जगीक सुखसंपदेचा पाठलाग करणाऱ्यांना यहोवाच्या पसंतीचा आनंद घेण्यासाठी बदल करण्याची गरज आहे अशी प्रेमळपणे सूचना दिली जाते. ह्या कार्याद्वारे घरमालक ऐको अथवा न ऐको, यहोवाचे नाव जाहीर केले जाते व त्याला सन्मान दिला जातो.—यहे. ३:११.
५ सेवा कार्यात भाग घेण्याद्वारे आम्हास आत्म्याची फळे, जसे प्रीती, आनंद, शांती व ममता ही वाढविण्यास मदत मिळते. (गलती. ५:२२) ज्याअर्थी यात इतरांसाठी चांगले ते करावयाचे समाविष्ट आहे, त्याअर्थी आम्हास नम्र व सहानुभूती बाळगण्यास हे मदतदायी ठरते. यहोवाच्या कार्यात मग्न असणे हे आम्हास जगापासून संरक्षण देते.—१ करिंथ. १५:५८.
६ आव्हानांना गाठण्यासाठी मदत: या सर्वात उत्तेजक अशा कार्यात सहभाग कसा घ्यावा हे शिकण्याची नवोदितांना गरज आहे. यांना बहुधा आत्मविश्वास नसतो आणि घरोघरी जाणे या केवळ विचारानेच ते नाउमेद होतात. आपण त्यांच्यासोबत सर्वसामान्य आक्षेपांबद्दल आणि उत्तरादाखल काय सांगू याबद्दल चर्चा करावी. रिझनिंग पुस्तकातील संभाषण थांबविणाऱ्यासाठीच्या उत्तरासाठी जे सुंदर प्रस्ताव दिलेले आहेत त्याचा उपयोग करण्याचा सराव करावा. क्षेत्रसेवेच्या तयारीसाठी त्यांना मदत का सादर करीत नाही? क्षेत्र सेवेच्या सभेसाठी नियमित उपस्थित राहण्याद्वारे व नंतर अनुभवी प्रचारकासोबत काम करण्याद्वारे त्यांना खूप मदत मिळेल. गटासोबत काम करणे हे अधिक बळकटी देणारे ठरेल.
७ घरोघरी जाण्याद्वारे, आम्हाला आमचा देव, यहोवा याचे प्रतिनिधीत्त्व करण्याची सुसंधी मिळते. देवाचा खरा सहकामगार होणे यापेक्षा कोणता मोठा सन्मान असू शकेल? (१ करिंथ. ३:९) आम्ही त्याच्यावर भरवसा ठेवला तर त्याचा आत्मा घरोघरच्या सेवेतील येणाऱ्या आव्हानांना गाठण्यास आमची मदत करील.—२ करिंथ. ३:५.