सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास करणे
१ आमच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासात आम्ही मे १०च्या आठवड्यापासून सर्वकाळातील सर्व श्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा अभ्यास चालू करणार आहोत. येशू ख्रिस्ताचे जीवन व उपाध्यपण याचे पुनरावलोकन करणे किती आनंदाचे असेल! आम्ही ज्या कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे त्यापासून ह्या पुस्तकाची रचना काही वेगळीशी आहे, याबद्दल काही मार्गदर्शक माहिती मदतगार ठरेल.
२ ह्या पुस्तकाला पृष्ठ क्रमांक नसल्याने आमची राज्य सेवा यात ज्या धड्यांचा अभ्यास केला जाणार आहे कदाचित प्रत्येक आठवड्याला तीन किंवा चार धडे असतील, त्याचा आराखडा आहे. धडा क्र. ३५, १११ व ११६ फार मोठे असल्याने दोन अभ्यासात त्यांना विभागले जाईल. लायक असणाऱ्या बंधवाने संपूर्ण धडा वाचल्यानंतर (किंवा धडा ३५वा, १११ व ११६ मध्ये असल्याप्रमाणे एक संपूर्ण उपशीर्षक वाचल्यानंतर), पुस्तक संचालक धड्याच्या शेवटी प्रश्न विचारतील जे धड्याच्या किंवा वाचलेल्या भागाच्या सुसंगतीत आहे. धड्यामधील उत्तरे नेहमीच प्रगमनशील नसतात. धड्याच्या विषयावर आधारित उत्तरे संक्षिप्त व अचूक असली पाहिजेत.
३ यानंतर, वेळ अनुमती देत असल्यास धड्याच्या शेवटी दिलेली वचने वाचावे. मोठ्या वचनांचे, लहान लहान भाग करुन विभागले जावे जेणेकडून विविध प्रचारकांना वाचण्यास सहभाग मिळेल, व जे वाचले त्यावर विवेचने दिली जावीत. चालकाने मार्मिक प्रश्न विचारल्याने पुस्तकात जे काही लिहिले आहे त्यावर ही वचने कशी जोर देतात याची अर्थभरीत उत्तरे येण्यास मदत करील. सर्व प्रश्न आणि उत्तरे उपस्थित असलेल्या सर्वांना येशू, त्याचे जीवन आणि त्याच्या शिकवणी यांवर लक्ष केंद्रित करण्यास मदतगार ठरली पाहिजेत.
४ सर्व श्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक वंशावळीच्या क्रमाने येशूच्या जीवनाचा विचार करते. त्यांना आठवणीत ठेवण्यासाठी त्या घटनेचे डोळ्यापुढे दृश्य उभे करणे व त्या घटना कोठे घडल्या त्यांना मनात ठेवल्याने अधिक मदत होईल. यास्तव, रंगीबेरंगी चित्रांचा विचार करण्यास विसरु नका व पुस्तकाच्या आरंभालाच प्रस्तावनेनंतर असणाऱ्या नकाशाचा नेहमी संदर्भ घ्या.
५ पुस्तकातील प्रस्तावनेवर पहिल्या आठवड्यात चर्चा होईल. उपशीर्षकाखालचे सर्व परिच्छेद वाचल्यानंतर, चालकाने तयार केलेले प्रश्न विचारावेत. अशा प्रकारे सुरवातीला केलेला विचारविनीमय पुढल्या अभ्यासांसाठी नमुना पुरवील. साहित्य पूर्ण करण्याचे यश उपस्थित राहणाऱ्यांच्या तयारीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. प्रत्येक आठवडी अभ्यास चालकाने पूर्ण तयारी केली पाहिजे जेणेकडून त्याचा गट आमचा प्रभू आणि तारणारा, येशू ख्रिस्त, ह्या सर्वकाळातील सर्व श्रेष्ठ मनुष्याबरोबर चांगला परिचित होईल.