एप्रिलसाठी सेवा सभा
एप्रिल ५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२९ (६६)
१० मि:स्थानिक घोषणा. तुमच्या क्षेत्रात जे विषय लोकांना आवडत असतील त्या विषयांची चालू मासिक अंकातून उजळणी करा. शास्त्रवचनीय सादरतेचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी दोन प्रचारक, एक वयस्कर आणि एक युवक यांची योजना करा.
१५ मि:“द वॉचटावर—यथाकाळचे आध्यात्मिक अन्न.” प्रश्नोत्तराने चर्चा. खरी आस्था दाखवणाऱ्या व्यक्तींनी मासिके किंवा वर्गणीचा स्वीकार केला नसेल तरीही त्यांच्याकडे पुन्हा जाण्याच्या गरजेवर अभिप्राय सुचवा. प्रामाणिक व्यक्तिची आस्था, संभाषण करण्याची तिची तयारी, तिचे मत मांडणे, संभाषणात सहभाग घेणे, प्रेमळ स्वभाव, पवित्र शास्त्राची वचने वाचताना ती अनुसरण्याची तयारी, व पुढच्या भेटीसाठी निमंत्रण देणे या सर्व गोष्टींवरुन सिद्ध होते.
२० मि:“इतर साहित्यांबरोबर पत्रिकांना जोडा.” प्रश्नोत्तराने हाताळा. परि. २-६ मधील सुचवलेल्या गोष्टींवर संक्षिप्त प्रात्यक्षिकांचा समावेश करा.
गीत १४ (६) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १५ (११९)
१० मि:स्थानिक घोषणा. स्मारक दिन साजरा करण्यासंबंधी कोणतेही विशेष अनुभव सांगा. “सेवेचा उत्तम विशेषाधिकार” या लेखातील मुख्य मुद्यांवर चर्चा करा. वेळ असल्यास ज्या प्रचारकाने मासिक मार्ग चालू केला असेल त्याची मुलाखत घ्या. त्याने तो कसा चालू केला? घरमालकांमध्ये आस्था वाढविल्याने त्याला कशी मदत मिळाली. ह्या सप्ताहअंती सर्वांना त्यांच्या क्षेत्रकार्य गटासोबत काम करण्याचे उत्तेजन द्या.
२० मि:“नवोदितांना प्रगती करण्यासाठी मदत करा.” दोन किंवा तीन पुस्तक अभ्यास चालकाची चर्चा. लेखाच्या मुख्य मुद्यांचे पुनरावलोकन केल्यानंतर, त्यामध्ये सुचवलेल्या गोष्टींचे स्थानिकरित्या पालन करण्यासाठी कोणत्या योजना आखल्या आहेत याचे विवेचन द्या. स्मारक दिनाला उपस्थित असलेल्या नवोदितांना आम्ही कशी मदत करू शकतो? नवोदितांना क्षेत्र कार्यात भाग घ्यावयाचा आहे तर त्यांना कोणत्या गरजा पूर्ण कराव्या लागतील? भूतकाळात ज्या व्यक्तींची सहभागिता अनियमित होती अशांना मदत करण्यासाठी काय केले जावे? प्रत्येक महिन्याला पूर्ण सहभाग घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला उत्तेजन कसे दिले जाऊ शकते? सत्यात मजबूत असलेले प्रचारक इतरांना कशी मदत करु शकतील? —रोम. १५:१, २.
१५ मि:“सर्वकाळातील सर्व श्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास करणे.” प्रश्नोत्तरे. मे १० तारखेच्या आठवड्यापासून ह्या पुस्तकातून चालू होणाऱ्या अभ्यासासाठी सर्वांमध्ये आवेश उत्पन्न करा.
गीत ३९ (१६) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९४ (१०५)
१० मि:स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातून यथायोग्य घोषणा. जमाखर्च अहवाल आणि देणगीची पावती वाचा. लूक ६:३८ वाचा आणि जागतिक कामाला व स्थानिक मंडळीला उदारतेने पाठिंबा दिल्याबद्दल मंडळीची प्रशंसा करा.
२० मि:मंडळीचा पुस्तक अभ्यास सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातून घेणे. पुस्तक अभ्यास चालकाने मंडळीमध्ये हा अभ्यास कसा घेतला पाहिजे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी चार किंवा पाच प्रचारकांचा उपयोग करावा. ह्या प्रात्यक्षिकाची चांगली तयारी झाली पाहिजे व ते आमची राज्य सेवा यात पृ. ४ वर दिलेल्या लेखातील सूचनेनुसार झाले पाहिजे. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या ११ अध्यायाचा उपयोग करावा. संपूर्ण उतारा वाचण्यासाठी जर वेळ अनुमती देत नसेल तर मोठ्या शास्त्रवचनाच्या उताऱ्याचे विभाजन करावे की ज्याद्वारे एक किंवा अनेक वाचकांना त्याचे वाचन करता येईल किंवा मुख्य मुद्दे स्पष्ट करता येतील याचे प्रात्यक्षिक दाखवा. ज्या पद्धतींचा वापर केला गेला त्यावर श्रोत्यांनी उत्तरे द्यावी यासाठी चालकाने विविध प्रश्न विचारावेत. श्रोत्यांमधील सर्वांनी त्यांच्या व्यक्तीगत पुस्तकात पाहावे.
१५ मि:“आपण यहोवाच्या घराकडे जाऊ.” प्रश्नोत्तराने पुरवणीच्या १-८ परिच्छेदाची चर्चा. परि. ७ मध्ये नमूद केलेल्या साहित्यांवर संक्षिप्तरित्या पुनरावलोकन करा. एखादा योग्य प्रचारक एका नव्या व्यक्तीला मंडळ्यांमध्ये आम्ही संघटित का आहोत याचे कारण समजावण्यासाठी कशी मदत करतो याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. (w८४ ११/१ पृ. १५ परि. ६, ७) आमच्या सभांचे वैशिष्ट्ये, व ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक सभांमध्ये तीव्र तफावत आहे हे ठळकपणे सांगा. प्रत्येक आठवडी विद्यार्थ्यांबरोबर संक्षिप्त चर्चा करण्यासाठी पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्याला उत्तेजन द्यावे जेणेकडून विद्यार्थ्यामध्ये संघटनेसाठी व तिचा एक भाग होण्यास अधिक गुणग्राहकता निर्माण होईल.
गीत २८ (५) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८० (१००)
१० मि:स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. महिन्याच्या दरम्यान त्यांच्या विस्तृत सेवेचे काही अनुभव जसे की साहाय्यक पायनियर यानात्याने, नवे पवित्र शास्त्राभ्यास, किंवा जे आस्थेवाईक स्मारकविधीला उपस्थित होते अशांना मदत करणे ह्याबद्दल सांगण्यासाठी काही व्यक्तींना बोलवा.
१५ मि:प्रश्नपेटी. सेवा पर्यवेक्षक किंवा ज्यांनी साहाय्यक पायनियरिंग केलेली असेल अशा कोणाही वडीलांची ह्या विषयाची सकारात्मक व उत्तेजनात्मक चर्चा. वेळोवेळी ज्या प्रचारकांनी साहाय्यक पायनियरिंग केली असेल अशा एक किंवा दोघांची मुलाखत घ्या.
२० मि:“आपण यहोवाच्या घराकडे जाऊ.” प्रश्नोत्तराने पुरवणीच्या ९-१४ परिच्छेदाची चर्चा. १२ आणि १३ परिच्छेदात दिलेल्या सूचनांनुसार, एखादा अजून आध्यात्मिकतेत मागे राहात आहे अशा व्यक्तीबरोबर एक प्रचारक कसा बोलत आहे याचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत १२७ (६४) व समाप्तीची प्रार्थना.