द वॉचटावर—यथाकाळचे आध्यात्मिक अन्न
१ द वॉचटावर त्याच्या वाचकांना आध्यात्मिकतेत जागृत राहण्यासाठी किमान ११४ वर्षांपासून सल्ला देत आहे. त्याच्या जोडीचे मासिक अवेक! हे आमच्या पिढीत एका शांतीमय आणि सुरक्षित नव्या जगाच्या सृष्टीकर्त्याच्या अभिवचनावर विश्वास वाढवण्यास मदत करते. याबरोबरच ही दोन मासिके अंधकारमय जगात प्रकाशाचा मार्ग दाखवण्याचे विश्वासू साधन बनले आहेत. (यशया ६०:२) देवाच्या वचनाचे सत्य कधीही बदलत नाही, परंतु यहोवा त्यांचा व इतर साधनांचा उपयोग आम्हाला ‘यथाकाळी आध्यात्मिक अन्न’ मिळण्याकरता करीत असल्यामुळे आमची सत्याबद्दलची समजशक्ति अधिक स्पष्ट होत राहते.—मत्तय २४:४५; नीती ४:१८.
२ मासिकांचा उत्तम वापर करा: द वॉचटावर आणि अवेक! वाचण्यासाठी लोकांना उत्स्फुर्ततेने उत्तेजन देऊन, आम्हाला मिळालेल्या आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी गुणग्राहकता दाखवू शकतो. एप्रिल आणि मे महिन्यात, घरोघरच्या कार्यामध्ये लोकांनी वॉचटावर मासिकाची वर्गणी घ्यावी म्हणून आम्ही खास प्रयत्न करणार आहोत. आणि, आम्ही अशा काही लोकांसोबत परिचित असू जे आमच्याकडून मासिकाचा एखादा अंक नियमितरित्या घेत असतील व ते वाचण्यात त्यांना खरोखरी आनंद होतो हे स्पष्टपणे दिसत असेल. एप्रिल आणि मे मध्ये आम्ही लोकांच्या पुनर्भेटी घेऊन त्यांना वर्गणी सादर करु व ही मासिके पोस्टाने त्यांच्या घरी नियमितरित्या कशी येतील हे दाखवून देऊ.
३ आमच्या संदेशात ज्या व्यक्ती आस्था दाखवितात अशांकडे त्यांनी वर्गणी केली असेल किंवा नसेल पुनर्भट दिली पाहिजे. त्यांच्यामध्ये अस्सल आस्था आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता? एखाद्या मासिकातून, माहितीपत्रकातून अगर पत्रिकेतून तुम्ही काही मुद्दे दाखवित असताना घरमालकाची प्रतिक्रिया काय आहे हे नीट निरक्षून पहा. तो लक्षपूर्वक ऐकत आहे का? पवित्र शास्त्राचा तो आदर करतो का व पवित्र शास्त्राची वचने वाचताना तो त्यांना अनुसरतो का? दृष्टीकोनात्मक प्रश्नांचे तो उत्तर देतो का? जर होय, तर मग एका आठवड्याच्या आत किंवा त्याहीपेक्षा लवकर पुनर्भटीची योजना करा व त्यावेळेस पुढील चर्चेचा आनंद घ्या. अशाप्रकारे, घरमालकासोबत एक नियमित पवित्र शास्त्राभ्यास चालू केला जाऊ शकतो.
४ शक्य असल्यास नेहमी मासिके तुम्हांबरोबर बाळगण्याचा प्रयत्न करा. सहकामगारांना, व्यावसायीक परिचितांना, शाळेतील मित्रांना, व नातेवाईकांना मासिके व वर्गणी सादर करण्यास दक्ष असा. रस्त्यावरील साक्षकार्यात किंवा प्रवास करतानाही मासिके सादर केली जाऊ शकतात.
५ मंडळीत नवी मासिके आल्याबरोबर प्रचारकांना ती उपलब्ध करुन द्यावीत. नवा अंक मिळाल्यावर त्याच्याबरोबर पूर्णपणे परिचित व्हा. तुमच्या क्षेत्रातील व्यक्तींना कोणत्या विषयाची अधिक काळजी वाटते? जागतिक शांती आणि सुरक्षितता? आर्थिकता? चांगले सरकार? पर्यावरण? विशेषत:, देवाचे राज्य हाच काय तो कायमचा उपाय आहे याकडे लोकांना द वॉचटावर निर्देशन करते. (दानी. २:४४; मत्तय ६:१०) आमचा “महान शिक्षक” याजकडून ही एक मौल्यवान देणगी आहे.—यश. ३०:२०.
६ एप्रिल आणि मे महिना क्षेत्र कार्यात जास्त सहभाग घेण्यास सर्वोत्तम संधी सादर करत आहे. मे महिन्यात संपूर्ण पाच सप्ताहअंत असल्याकारणाने पुष्कळजण साहाय्यक पायनियरिंग करतील. ह्या दोन महिन्यात आमचे साक्षीकार्य वाढवण्यासाठी सर्वजण व्यक्तीगत ध्येय ठेऊ शकतात व आपण ज्याज्या लोकांना भेटू त्या सर्वांना वर्गणी सादर करुन द वॉचटावर आणि अवेक! वाचण्यास उत्तेजन देऊ या.