यहोवाची कृत्ये विदीत करा
१ “राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदीत करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. . . . कारण त्याची करणी प्रतापमय आहे.” (यशया १२:४, ५) या निमंत्रणास तुमचा कसा प्रतिसाद आहे? आम्ही जेव्हा यहोवाने आपले लोक तसेच वैयक्तीरित्या जे दळणवळण ठेवले आहे त्याचे मनन करतो तेव्हा आमचे अंतःकरण इतरांना सांगण्यासाठी उचंबळत नाही का? साधारण ७३ वर्षांआधी यहोवाने आपल्या लोकांना बाबेलोनी बंधनातून मुक्त केले. १९१९ पासून खरी भक्ती दृढपणे स्थापण्यात आली असून ती आता पृथ्वीच्या सर्व भागात पसरली आहे. यहोवाने हे ज्या प्रमाणात साध्य करून दाखवले आहे ते आमच्या आकलनशक्ती पलिकडे आहे. तर मग, वैयक्तीकपणे तुम्ही देवाचे मार्गदर्शन, संरक्षण व आशीर्वाद याबद्दल केवढी कदर दाखवीत आहात? त्याची कृत्ये विदीत करण्यासाठी व त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करण्यासाठी तुम्हाला अधिक ते करता येईल का?
२ स्मारक विधीचा ऋतु आमच्या लक्षात एक ईश्वरी कृत्य आणतो, ज्याबद्दल आम्ही नेहमीच कृतज्ञ असू. यहोवाला आमची कृतज्ञता व कदर दाखविण्यासाठी साहाय्यक पायनियर बनून सेवा करण्यासाठी एप्रिल हा उत्तम महिना आहे. तुम्ही विभागीय देखरेख्यांच्या भेटीदरम्यान साहाय्यक पायनियरींग केल्यास तुम्हाला सेवाकार्यात त्यांच्याकडून मदत व उत्तेजनाचा लाभ मिळू शकेल.
३ साहाय्यक पायनियर म्हणून एखादा गट सामील होतो तेव्हा सर्व व्यवस्था उत्तम तऱ्हेने पार पडतात. सर्वांना काम करण्यासाठी सोबतीला कोणी ना कोणी असावे, तसेच लहान मुले असणाऱ्या भगिनींनी एकमेकांना साहाय्य करण्यासाठी चांगला आराखडा आखणे आवश्यक आहे. चांगली आयोजना केल्यामुळे बऱ्याच जणांना ६० तासांचे ध्येय गाठण्यात तितके अडचणीचे वाटले नाही. याचा अर्थ हा होतो की, दर दिवशी २ तास किंवा आठवड्याला १५ तासांचे कार्य करावे लागेल. काही साहाय्यक पायनियर आपल्या प्रापंचिक कामाच्या आधी किंवा नंतर एकदोन तास व आठवड्याच्या शेवटाला अधिक तासांचे कार्य करतात.
४ तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येणे अशक्य असले तरी तुम्हाला आपले क्षेत्रकार्य वाढवता येईल. तसेच ने-आण करण्यात मदत देणे किंवा इतर पायनियरांसोबत मिळून कार्य करण्यात तुम्ही त्यांना उत्तेजन देणारे ठराल. यहोवाचे नाम व त्याची कृत्ये विदीत करण्यात आपण जे काही करू ते आमच्या रसिक देवाच्या दृष्टीआड जाणार नाही.—मलाखी ३:१६.