वॉचटावर वार्षिक वर्गणीच्या मोहिमेसाठी तयार असा
एप्रिल व मे महिन्यात वॉचटावर वार्षिक वर्गणीची उल्लेखनीय मोहीम होईल अशी अपेक्षा धरून संस्था द वॉचटावर तसेच अवेक! मासिकांसाठी खास आस्थेचे लेख तयार करीत आहे. त्यातील लेख सर्वत्र लोकांच्या मनात जे विषय आहेत त्यावर आधारीत असतील.
द वॉचटावरमध्ये पुढील विषयांची चर्चा असेलः “इज इट लेअर दॅन यु थिंक?” (एप्रिल १), “व्हेन वील पीस रिअली कम?” (एप्रिल १५), “कोपिंग वीथ क्राईम इन अ चाओटिक वर्ल्ड” (मे १), आणि “पूट गॉड फर्स्ट इन युवर फॅमिली लाईफ!” (मे १५) अवेक! मधील लेख या विषयांवर असतीलः “व्हेन मॅन ॲण्ड बीस्ट लिव्ह इन पीस” (एप्रिल ८), “हेल्प फॉर द चिल्ड्रन ऑफ डिवोर्स” (एप्रिल २२), “लॉटरी फिव्हर—हू विन्स? हू लूसेस्?” (मे ८), आणि “टेलिव्हिजन—द बॉक्स दॅट चेंज्ड् द वर्ल्ड” (मे २२) टेहळणी बुरुज व इतर प्रादेशिक भाषातः “आनंदी राष्ट्र” (एप्रिल १), “शांती—ती निःशस्त्रीकरणामुळे येईल का?” (मे १), “लोभरहित जग—ते शक्य आहे का?” (जून १), आणि प्रादेशिक भाषेतील अवेक!मध्येः “बेघर मुले—याकरता काही उपाय आहे का?” (एप्रिल ८), आणि “बंदुकीविनाचे जग—ते शक्य आहे का?” (मे ८).
सर्व प्रचारकांनी तसेच खासपणे पायनियरांनी या वाढीव कार्याच्या अनुषंगाने वर्गणीसाठी तसेच किरकोळ मासिकांचे वितरण करण्यासाठी आपली वैयक्तीक गरज लक्षात घ्यावी. आपली मासिकांची वाढीव मागणी पुष्कळ आधीच नोंदवा म्हणजे वॉचटावर मासिकाची वार्षिक वर्गणी मोहीम सुरु होताच पुरेसा साठा आपल्या हाती असेल.