वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९० पृ. ११
  • खास अधिवेशने यहोवाचा सन्मान करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास अधिवेशने यहोवाचा सन्मान करतात
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निवडक प्रतिनिधींची व्यवस्था
  • २००३ मधील आंतरराष्ट्रीय अधिवेशने
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • संमेलनांमध्ये हर्ष व देवाची स्तुती करणे
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • यहोवाचे साक्षीदार आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवीत आहेत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवा आपल्या आनंदित लोकांना एकत्र जमवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km १२/९० पृ. ११

खास अधिवेशने यहोवाचा सन्मान करतात

१ वार्षिक अधिवेशने यहोवाच्या साक्षीदारांना आध्यात्मिक तजेला व सोबत ख्रिस्ती सहवासाचा आनंद उपलब्ध करून देतात. यहोवाच्या लोकांची मोठे मेळावे हे यहोवाचे नाम व राज्याची सुवार्ता प्रसिद्ध करण्यात प्रभावी साधनं ठरली आहेत.

२ सर्व बांधवांच्या लाभासाठी प्रांतिय अधिवेशने पृथ्वीभरात नियमित रुपाने भरविण्यात येतात. याशिवाय काही ठिकाणी खास अधिवेशनेही भरवली जातात. यामुळे संस्थेचे स्वरुप केवढे आंतरराष्ट्रीय आहे ते दिसते व भव्य साक्षीला वाव मिळतो. १९८९ मध्ये पोलंडमध्ये खास अशी तीन अधिवेशने भरविण्यात आली. त्या खास अधिवेशनांच्या बाबतीत जे अहवाल आम्हास मिळाले ते किती उत्तेजनपर होते!

निवडक प्रतिनिधींची व्यवस्था

३ खास अधिवेशनांना उपस्थित रहावे अशी हजारो बांधवांची इच्छा असते. काही काळातच अधिक बांधवांना यापैकींच्या एकाला उपस्थित राहण्याची शक्यता उपलब्ध होईल. तथापि, खास अधिवेशनांचा उद्देश साध्य करण्यासाठी तसेच सर्वकाही यथास्थितपणे होण्यासाठी काही निवडक शाखा दप्तरांना मर्यादित प्रतिनिधींना एका विशिष्ट अधिवेशनाला उपस्थित राहण्याची निवड करण्याची माहिती दिली आहे. यामुळे स्थानिक बांधवांच्या उत्तेजनार्थ समतोल असे आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचे प्रतिनिधित्व करता येते व जे निरिक्षक आहेत अशांना प्रभावी साक्ष दिली जाते. याचा हा अर्थ होतो की, ज्यांनी आपला अर्ज दिला आहे व मंडळीच्या सेवा समितीची देखील शिफारस आली आहे त्या सर्वांना प्रतिनिधी म्हणून निवडण्यात येईलच असे नाही. आपली निवड झाली नाही याविषयी काहींना दुःख वाटेल, पण अशा व्यवस्थेमागील महत्त्वपूर्ण कारणांचा हे बांधव जरुर विचार करतील असे आम्हाला आत्मविश्‍वासपूर्वक वाटते.

४ चांगली साक्ष देता यावी यासाठी खास अधिवेशनाच्या अनुषंगाने जी व्यवस्था आखण्यात आली आहे त्याला प्रत्येकाने सहकार्य द्यावे अशी संस्थेची विनंति आहे. ज्या बांधवांची प्रतिनिधी या अर्थी निवड झाली नाही अशांनी खास अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या स्वतःच्या योजना केल्या तरी त्यामुळे काही समस्या उद्‌भवू शकतात. निवडक शहरातून खास अधिवेशनाला जे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशांची संख्या संस्थेद्वारे निश्‍चित करण्यात येते. याचे कारण हे की, जेथे हे अधिवेशन होणार आहे तेथील सुविधा अपुऱ्‍या पडू नयेत. जर सुविधांची अधिक गरज भासली गेली तर त्यामुळे अधिवेशनाचे कार्यवहन सुरळीत होणार नाही व मग स्थानिक अधिकाऱ्‍यांवर आम्हाविषयी चांगला ठसा राहणार नाही.

५ निवड झालेल्या प्रतिनिधींनी हे लक्षात घेण्यास हवे की, त्यांचे अधिवेशनाला उपस्थित राहणे हे राज्य आस्थेची वाढ करावी या हेतूने आहे. हा उद्देश जेव्हा सर्वजण संस्थेने प्रवास तसेच इतर व्यवस्थेविषयी आखलेल्या योजनांना सहकार्य देतात व स्वतःच्या योजना बनवीत नाहीत, तेव्हा सफळ होतो.

६ या वर्षी खास अधिवेशने बर्लिन, जर्मनी आणि ब्राझिलमधील साओ पौलो येथे भरविण्यात आली. डिसेंबरमध्ये अर्जेंटिना येथील ब्युनोस एअर्स येथे खास अधिवेशन भरविण्यात येईल. जानेवारी १९९१ मध्ये खास अधिवेशने अतिपूर्वेकडे घेण्यात येतील. त्यांची ठिकाणे फिलिपाईन्समधील मनिला; ताईवान येथील ताईपई; आणि थायलंड येथील बँकॉक ही असतील. या अधिवेशनांसाठी प्रतिनिधींची आधीच निवड झाली आहे. (या व्यवस्थेमध्ये सध्या भारताला समाविष्ट करण्यात आलेले नाही.) निवडण्यात आलेले प्रतिनिधी दुसऱ्‍या देशातील हजर राहणाऱ्‍या प्रतिनिधींसोबत मिळून चांगली साक्ष प्रदर्शित करण्याचा हर तऱ्‍हेचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा धरली जाते.

७ आम्ही खास अधिवेशनांसाठी निवडलेले असू वा स्थानिक अधिवेशनांना उपस्थित राहणारे असू, आमच्या प्रार्थना तसेच आमची दैनंदिन वागणूक आमच्या अंतःकरणपूर्वक निष्ठेची तसेच आम्ही जे काही करतो त्यामध्ये यहोवाला सन्मान मिळवून देण्याची आमची प्रामाणिक इच्छा प्रदर्शित करीत राहो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा