देवाच्या वचनाचा वापर कुशलतेने करण्यासाठी इतरांना मदत द्या
१ आमचे व्यक्तीगत उपाध्यपण प्रभावीपणे पार पाडता यावे यासाठी यहोवाने आम्हाला विविध रुपात तरतुदी उपलब्ध केल्या आहेत. त्याने केलेल्या तरतुदींचा वापर केल्यामुळे ‘आम्हाला आमची गति स्थिर ठेवता येते.’ (स्तोत्र. ३७:२३) याचे उदाहरण म्हणजे साधारणपणे ५० पेक्षा अधिक वर्षांपासून ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा आम्हाला वक्ते व शिक्षण कसे प्रभावी रितीने देता येईल त्याविषयीची प्रगतिशील तालीम देत आली आहे. या बरोबरच साप्ताहिकरित्या सेवा सभांचा कार्यक्रमही आहे, जेथे व्यावहारिक भाषणे, प्रात्यक्षिके तसेच सामूहिक चर्चा यांचा समावेश असतो.
२ आम्हाला विभागीय देखरेख्यांच्या भेटीकडून देखील नियमितपणे लाभ होत असतो. सेवा देखरेखे प्रत्येक अभ्यासाच्या गटाला भेटी देऊन आमची जाहीर उपाध्यपणातील क्षमता कशी सुधारावी याचे प्रेमळ उत्तेजन देत असतात. याखेरीज, आपण जेव्हा क्षेत्रकार्यासाठी एकत्र जमतो तेव्हा दहा मिनिटे देण्यात येणारी व्यावहारिक सूचना आम्हाला उत्तेजन तसेच त्या दिवसाविषयी उपयुक्त प्रस्ताव प्रस्तुत करते. (इब्री. १०:२३-२५) यहोवाने आपल्या संस्थेकरवी केलेली ही व्यवस्था, त्याने सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी ज्यांना नेमून दिले आहे त्यांच्याविषयी वाटत असलेल्या त्याच्या प्रेमळ चिंतेचे प्रदर्शन करते.
युवक व पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना साहाय्य द्या
३ युवक प्रचारकांना तसेच नव्या लोकांना जाहीर उपाध्यपणात नियमित रुपाने व्यक्तीगत साहाय्याची गरज असते. वस्तुतः आम्ही यांची वेळोवेळी मदत करू शकत असलो तरीही याविषयीची प्रमुख जबाबदारी पालक व जे पवित्र शास्त्र अभ्यास चालवितात अशांची आहे. (गलती. ६:६; इफिस. ६:४) पवित्र शास्त्राचा प्रभावी वापर हा कालावधी तसेच काही अनुभव याकरवी मिळवता येऊ शकत नाही; उलटपक्षी त्याला पद्धतशीर प्रेमळ साहाय्य व तालीम यांची गरज आहे.
४ ही व्यक्तीगत मदत ती व्यक्ती उपाध्यपणात समाविष्ट होण्याची सुरु करते त्याआधी देण्याची सुरवात झाली पाहिजे. संभाषणाच्या विषयाची उजळणी करा. जे उपाध्यपणात भाग घेण्याच्या पात्रतेचे आहेत अशांसोबत साधे प्रवचन कसे द्यावे याची तालीम द्या. यांना कदाचित आधी सुचविण्यात आलेले केवळ एकच वचन वापरता येईल. एकत्र मिळून कार्य करीत असता दोन घरातील भेटीच्या दरम्यान आवश्यक ती प्रशंसा व जेथे सुधारणा आवश्यक आहे तेथे दयावंत प्रस्ताव प्रस्तुत करा. सर्वदा प्रार्थनाशील वृत्ती बाळगण्याचे उत्तेजन द्या.—इफिस. ६:१८, १९.
५ वस्तुतः नियमित पायनियर्स व इतर अनुभवी प्रचारक प्रामुख्यत्वे आपले उपाध्यपण सप्ताहात करीत असले तरीही या प्रभावी प्रचारकांनी आपल्या आराखड्याची पुनर्रचना केली आणि सप्ताहाच्या शेवटी वेळोवेळी क्षेत्रकार्यात सहभाग घेतला तर ते किती चांगले ठरेल. त्यांच्या या व्यक्तीगत त्यागाची रसिकता सर्वजण बाळगतील आणि काहींना यांच्यासोबत कार्य करून उपाध्यपणात आपली प्रगती साध्य करून घ्यावीशी नक्कीच वाटेल.—उप. ४:९, १०.
६ एकेकाळी आपण सर्व क्षेत्रकार्यात नवे व कमअनुभवी होतो. आम्हापैकी बहुतेकांना अनुभवी प्रचारक किंवा पायनियरांकडून प्रोत्साहन व तालीम मिळाली. या मदतीमुळेच आज आमची कार्यात कुशलता वाढली असून अधिक आनंद मिळाला आहे. (नीती. २७:१७; प्रे. कृत्ये २०:३५) यहोवाने आम्हाला उपाध्यपणामध्ये क्रियाशील तालीम देऊन आम्हासाठी जे घडवून आणले आहे त्याची गुणग्राहकता बाळगून आम्हीही इतरांना यहोवाच्या वचनाचा कुशलतेने वापर करण्यासाठी मदत देण्यासाठी तयार ठेवले पाहिजे.