कुटुंबाचे जवळचे नातेसंबंध उभारणे
१ पालकांचा दैनंदिनीचा वेळ बरीच कामे घेत असल्यामुळे कुटुंबाला खऱ्या भक्तीमध्ये दृढ करण्याचे एक आव्हानच त्यांच्यापुढे उभे असते. सध्याच्या या कठीण काळी आधार देण्यासाठी ख्रिस्ती कुटुंबाने जवळीक उभारली पाहिजे. (उप. ४:९-१२; २ तीम. ३:१-५) आध्यात्मिकता वाढली म्हणजे कुटुंबात ऐक्य वाढते व त्यामुळे त्याला सैतान व त्याच्या या व्यवस्थेकरवीच्या सर्व जोरदार हल्ल्यात टिकाव धरून राहण्यासाठी बळकटी मिळते.
आध्यात्मिक गुणांची वाढ करणे
२ कुटुंबाच्या साप्ताहिक आराखड्यात मंडळीच्या सभा तसेच कौटुंबिक पवित्र शास्त्राचा अभ्यास या गोष्टी असल्या पाहिजेत. (अनु. ६:६, ७; इब्री. १०:२३-२५; वॉ.८६ ११/१ पृ. २३-५) तरीपण आणखी काही गरज आहे. मुलांना इतकीच आध्यात्मिक तालीम मिळत आहे तर मग आणखी पोकळी राहतेच.
३ मुलांच्या आध्यात्मिक कल्याणाची खरी आस्था पालकांनी घेतल्यास हितकारक कौटुंबिक नातेसंबंध वाढीस लागतात. इस्राएलात मुलांचे शिक्षण तसेच तालीम याबद्दल पालकांवर जबाबदारी होती. त्यांनी तोंडी तसेच आपल्या उदाहरणाद्वारे त्यांना शिक्षण द्यायचे होते. इस्राएलातील शैक्षणिक कार्यक्रमात प्रौढ जीवनासाठी आवश्यक असणारे व्यवहारी शिक्षण, लिहिण्या-वाचण्याची सवय, तसेच आध्यात्मिक गुणांची वाढ करण्याच्या सूचना हे समाविष्ट होते. मुलांना शिक्षण देताना त्यांनी यहोवाचे भय मानावे, नियमशास्त्र पाळावे, पालक व वडीलधाऱ्यांचा आदर करावा आणि आज्ञाधारकपणाचे महत्त्व यावर विशेष भर दिला जाई.
४ तुमच्या कुटुंबासोबत दरदिवशी दर्जेदार वेळ घालविण्याचा प्रयत्न करा. आध्यात्मिक गोष्टींची चर्चा अनौपचारिक रितीने म्हणजे जेवणाच्या वेळीही होऊ शकते. एका पालकाने हे सूज्ञपणाने न्याहाळलेः “पालकांचा मुलांसोबत अशाप्रकारे वेळ जात राहील—एकतर त्यांच्यामध्ये आध्यात्मिक गुणांची वाढ करण्यामध्ये किंवा त्यांच्या एकामागून एका समस्या सोडविण्यात.” तर मग, मुलांना जगाची खाचखळगी टाळता येण्यासाठी त्यांच्यांमध्ये आवश्यक अशा आध्यात्मिक गुणांची वाढ करणे हे किती चांगले आहे!—१ करिंथ ३:१०-१५.
क्षेत्र कार्याच्या हालचालीचा आनंद घेणे
५ चांगल्या गोष्टींची प्राप्ती वा आशा धरण्यामुळे आनंद होत असतो. जेव्हा क्षेत्र कार्याची तयारी केली जाते तेव्हा त्या व्यक्तीला चांगले परिणाम प्राप्त होण्याची आशा धरता येते. क्षेत्रकार्याला निघण्याआधी कुटुंब असे एकत्रित मिळून क्षेत्रकार्यात काय बोलावे याची तालीम केल्यास आत्मविश्वास उभारला जातो. (पडताळा तीत ३:१ब.) प्रत्येक जण आपल्या मनात एखादे ध्येय ठेवू शकतो. लहान मुलांसोबत किंवा जे नुकतेच प्रचाराला येऊ लागले आहेत अशांसोबत साध्या सादरतेचा सराव करता येऊ शकतो.
६ ख्रिस्ती उपाध्यपणात आपल्या मुलांसमवेत काम करण्यामुळे पालक त्यांच्याठायी यहोवा व येशू यांनी लोकांविषयी जो व्यक्तीगत जिव्हाळा राखला तो उभारू शकतात. आमचे हे उपाध्यपण आमचे यहोवाशी जवळचे नाते उभारण्यास मदत देते. (वॉ.८१ ११/१ पृ. १४-२०) काही कुटुंबे एकत्रपणे सबंध दिवस घालवतात. ते क्षेत्रकार्य संपवल्यावर हितकारक मनोरंजनाचा आनंद घेतात. यामुळे खुल्या वातावरणात मोकळे संभाषण करण्यास वेळ मिळतो व पालक आणि मुले यामध्ये जवळीक निर्माण होते.
७ आपल्या मुलांसोबत जवळचे नातेसंबंध राखण्यासाठी आवश्यक असणारे दळणवळण वाढविण्याची खात्री करा. कुटुंबाला आध्यात्मिकरित्या बळकटी देण्यासाठी जो वेळ देणे आवश्यक आहे त्याला दुसऱ्या कशाने हिरावू देऊ नका. आपल्या मुलांसमवेत व त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रयत्नांना यहोवा यशस्वीतेचा कळस देईल याची हमी असू द्या.—स्तोत्र. १२७:१; नीती २४:३.