शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू ठेवा
१ प्रेषित तसेच आरंभाच्या ख्रिस्तीजनांचे क्षेत्र कसे होते याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला संशयात सोडत नाही. येशूच्या मृत्युनंतर काही काळातच अधिकाऱ्यांनी त्यांना “येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका” अशी ताकीद दिली. (प्रे. कृत्ये ४:१८) हे असे का? एक कारण हे की त्यांना त्यांच्या कार्यात अद्भूत यश मिळत होते. प्रे. कृत्ये ४:४ कळवते त्याप्रमाणे हजारो जण विश्वास ग्रहण करीत होते. “वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.”
२ आम्ही अखंडपणे आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले असल्यामुळे आज आमच्या काळात शेकडो, हजारो, होय लाखो विश्वास ग्रहण करीत आहेत. या नोव्हेंबर महिन्यात आपल्याला अवेक! तसेच वॉचटावर ही मासिके वर्गणीच्या रुपात सादर करण्याची संधि आहे. अवेक! या मासिकाने लोकांना त्यांच्या आध्यात्मिक गरजेविषयी जागृत करण्यात खूप मोठी भूमिका पार पाडली आहे यात काही संशय नाही. यामुळे पुष्कळांना आनंद मिळू शकला व त्यांनी यहोवाची इच्छा काय आहे ते शिकून घेतले.—पडताळा मत्तय ५:३.
सर्वत्र जा
३ आम्हापाशी कार्य करण्याजोगे क्षेत्र वारंवार उरकले जात असले तरीही अद्याप ज्यांना सुवार्ता मिळू शकली नाही त्या लोकांशी बोलता येणे शक्य आहे. ते कसे काय? ज्या क्षेत्रात घरोघरचे उपाध्यपण पार पाडणे कठीण होत आहे अशा ठिकाणी, आमच्या प्रांतिय अधिवेशनात तसेच ऑगस्ट १९९० ची आमची राज्य सेवा यात सुचविल्यानुसार आम्ही टेलिफोनच्या साक्षीकार्यात सहभागी होण्याचा का प्रयत्न करू नये? किंवा सायंकाळच्या वा सप्ताहाच्या शेवटाला कार्य करतेवेळी घरमालकासोबत बोलण्यासाठी खास प्रयत्न साधा. आम्ही आपले हाऊस-टू-हाऊस रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने राखल्यास आम्हाला घरात असणारी इतर मंडळी, जसे की, आजी, शाळेला जाणारा पुतण्या किंवा नातू, किंवा नोकरीला जाणारी वहिनी या सदस्यांशी बोलता येईल. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलण्याचा केलेला खास प्रयत्न प्रतिफळदायक ठरू शकतो.
४ या महिन्यात वर्गणी मिळविण्याचे इतर आणखी चांगले मार्ग आहेत. यापैकीचे एक आमचे शास्त्राभ्यास घेणारे विद्यार्थी किंवा इतर आस्थेवाईक लोक. आमच्या पवित्र शास्त्राभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्याने कदाचित एका मासिकाची वर्गणी भरली असल्यास त्याला दुसऱ्याचीही भरण्यास का उत्तेजन देऊ नये? कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वतःचे टेहळणी बुरुज असावे यासाठी वैयक्तीक वर्गणी भरण्याचे उत्तेजन द्यावे; यामुळे प्रत्येकापाशी टेहळणी बुरुज अभ्यासक्रमासाठी मासिक राहील. आणखी एक प्रस्ताव असा की, मासिक मार्ग सुरु करावेत व जे उल्लेखनीय आस्था दाखवीत आहेत अशांना वर्गणी सादर करावी. जे खरी आस्था दाखवितात अशांसोबत आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास सादर करावा.
आपले उपाध्यपण वाढवा
५ या नोव्हेंबर महिन्यात साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. एक कुटुंब या नात्याने तुम्ही डिसेंबर महिन्यात येणाऱ्या जागतिक सुट्ट्यांच्या काळात साहाय्यक पायनियरींग करण्याची योजना आखली आहे का? ते तुम्हाला कसे यशस्वीपणे करता येईल त्याचा आता विचार केला जाण्यास हवा. जर सबंध कुटुंबास साहाय्यक पायनिरींग करता येणे शक्य नाही तर तुम्हाला एकत्र मिळून कार्य करता येणे जमेल का की, निदान कुटुंबातील एकाला किंवा अधिकाला ती करता येईल? जर हेही शक्य नाही तर क्षेत्रकार्यात अधिक वेळ देऊन अवेक! तसेच वॉचटावर या मासिकांची वाषिक वर्गणी सादर करता येईल का?
६ आम्हाला अवेक! तसेच वॉचटावर यांजमधून जे आध्यात्मिक लाभ व आशीर्वाद मिळत आहेत त्याविषयीची रसिकता वाटते. शिवाय आमच्या क्षेत्रातील प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांनाही ही मासिके नियमित रुपाने मिळत राहिल्यास त्यांच्या वाचनाने त्यांना समृद्ध लाभ मिळू शकतील हेही आम्हास ठाऊक आहे. या कारणास्तव, या नोव्हेंबर महिन्यात, यहोवाने आम्हाला दिलेल्या या सुंदर उपकरणांच्या आधाराने आम्ही आपले शिक्षणाचे कार्य अखंडीतपणे करीत राहू या. हे केल्यामुळे आम्हाला यहोवाचे आशीर्वाद मिळतील आणि आम्ही स्वतः इतरांना आशीर्वाद असे ठरू.—गलती. ६:९.