प्रभावी पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे अंतःकरणाप्रत पोहंचा
१ येशूला आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद वाटला, तसेच इतरांनीही यहोवाची सेवा करावी म्हणून त्यांना मदत देण्याचे त्याला समाधान वाटले. (स्तोत्र. ४०:८; मत्तय ९:३७, ३८; ११:२८-३०) येशूने केवळ संदेश देण्यापुरतेच समाधान मानले नाही. जर आम्हाला, इतरांनी आम्हासोबत या सुवार्तिक कार्यात सहभाग घ्यावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात यशस्वी ठरायचे आहे तर मग, आम्ही आम्हाकडून पवित्र शास्त्राचा अभ्यास घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्यास हवे. यासाठी पुस्तकाची निव्वळ प्रश्नोत्तराची चर्चा उपयुक्त ठरणार नाही. आम्हाला अंतःकरणाप्रत पोहंचावयाचे आहे तर आम्ही आमच्या विद्यार्थ्याला ध्यानात ठेवून अभ्यासाची पूर्वतयारी केली पाहिजे.
२ येशूने इतरांच्या बाबतीत व्यक्तीगत आस्था घेतली. त्याने त्यांचा दृष्टीकोण लक्षात घेतला. कठीण विषय स्पष्ट करण्यासाठी त्याने उदाहरणांचा वापर केला. (मत्तय अध्याय ५-७) त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे ते जाणून त्याने योग्य सूचना त्यांना दिल्या. (मार्क ९:३३-३७) आपल्या श्रोत्यांना प्रथमतः मुद्दा कळत नाही असे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने आपले म्हणणे त्यांना सहनशीलतेने समजावून दिले. (मत्तय १६:५-१२) येशूठायी लोकांविषयी जी खोल आस्था होती तिने आम्हाला स्वतःला हे विचारावयास प्रवृत्त करावेः ‘मी जर विद्यार्थी असतो तर समजण्यासाठी तसेच जे शिकवले जात आहे त्याद्वारे उत्साहीत होण्यासाठी मी काय करण्याची गरज आहे?’—पहा, १९७१ चे वार्षिक अहवाल पुस्तक, पृष्ठे २४६-७.
पवित्र शास्त्राला ठळकपणे समोर मांडा
३ जेव्हा एका जोडप्याला हे विचारले गेले की, दिलेल्या साक्षीला त्यांनी इतका उत्स्फुर्त प्रतिसाद कशामुळे दाखवला, तेव्हा त्यांचे उत्तर होतेः “ती पवित्र शास्त्रातून होती.” होय, देवाचे वचन अंतःकरणापर्यंत जाते. (इब्री. ४:१२) या कारणास्तव त्याचा नेहमी संदर्भ घ्या, परिच्छेदातील वचनांचा वापर मुक्तपणे करा. एखादे मार्गाक्रमण चोखाळणे हे सूज्ञ किंवा मूर्खपणाचे आहे हे विद्यार्थ्याला पाहू द्या. देवाच्या नियमांना दाखविलेली आज्ञाधारकता कशी लाभदायक ठरते याविषयी त्याच्याशी विचारविनिमय करा.—पहा, द वॉचटावर, ऑगस्ट १, १९८४, पृष्ठे १५-१६.
४ पवित्र शास्त्राला ठळकपणे समोर मांडण्यात रिझनिंग पुस्तक खूप प्रभावी ठरते असे पुष्कळ प्रचारकांना आढळले आहे. उदाहरणार्थ, लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील १२४ पानावरील १३ वा परिच्छेदाचा विचारविनिमय चालू असताना घरमालक कदाचित हे म्हणेल की, मुले मरतात तेव्हा त्याचे कारण, त्यांनी देवाजवळ स्वर्गात असावे अशी देवाची इच्छा असते असे त्यांचे पाळक म्हणतात. अशावेळी रिझनिंग पुस्तकातील ९९ पानावरील “व्हाय डू बेबीज् डाय?” या शिर्षकाखालील माहिती विचारात घेतल्यास, यहोवाला कौटुंबिक व्यवस्थेविषयी किती आस्था आहे ते जोरदारपणे व्यक्त होईल. या माहितीमुळे घरमालकाला यहोवा मानवजातीविषयी किती प्रेम बाळगतो त्याची खात्री पटेल.
प्रश्न विचारा
५ प्रश्नांचा प्रभावीपणे वापर केल्यामुळे लोकांना विचार करावयास लावण्यास व त्यावर चर्चा करण्यासाठी पुढे येण्यास येशूला मदत मिळाली. (मत्तय १७:२४-२७) विद्यार्थी जे उत्तर देतो त्यावरून तो काय शिकत आहे तसेच तो अद्याप कोणते अशास्त्रीय दृष्टीकोण बाळगून आहे ते समजण्यास मदत होईल. कदाचित कोणी विद्यार्थी अद्याप धूम्रपानाच्या समस्येशी झगडत असेल. तुम्ही त्याच्याशी लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील २७ व्या अध्यायातील माहिती तसेच अवेक! मासिकाच्या जुलै ८, १९८९ अंकातील १३-१६ पृष्ठावरील माहिती चर्चिली असेल. त्याची ही सवय थांबविण्याची इच्छा आहे. पण खरे पाहता त्याने ही सवय सोडली पाहिजे अशी त्याजठायी खरीच खात्री झाली आहे का? तुम्ही कदाचित विचारू शकालः “तुम्हाला काय वाटते? समजा तुम्ही आत्ताच धुम्रपान सोडले पण तुमच्या काही मित्रांनी तुमची याविषयी थट्टा केली तर काय? तुम्ही काय कराल?”
६ एक जागृतीचा इशारा. वरील प्रश्नांची कदाचित अशी उत्तरे मिळतील की ज्याकरवी तुम्हाला एकतर आश्चर्यात किंवा घोटाळ्यात पाडले जाईल. तेव्हा काय? तो जर संवेदनाशील विषय आहे असे दिसते तर तुम्ही त्यावर नेट लावू नका, तर म्हणू शकताः “ठीक आहे, आपण पुढे जाऊ. परत कधी तरी याविषयी बोलू.” किंवा “ही विचार करण्याची बाब आहे हो ना?” (योहान १६:१२) त्या विद्यार्थ्यास त्या विषयाबद्दल जे वाटते ते जाणून घेतल्यामुळे तुम्ही अशी तयारी करू शकता जिच्यामुळे त्याला पुढील प्रगती करण्याची मदत मिळेल. आम्ही लोकांच्या अंतःकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यहोवाने त्याची आध्यात्मिक रितीने वाढ घडवून आणावी म्हणून प्रार्थना करावी.—१ करिंथ ३:५-९.
७ पवित्र शास्त्राचा अभ्यास चालविताना जे साहित्य विचारात घेतले जात आहे त्यावर विद्यार्थ्यासोबत विवाद करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. त्याच्या विशिष्ट गरजा भरून काढण्यासाठी तुम्ही आपल्या शिक्षण पद्धतीला जुळवून घ्या. यहोवा, पवित्र शास्त्र आणि यहोवाची संस्था यांजविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम व आदर उभारण्यासाठी काम करा. पवित्र शास्त्राचा अभ्यास परिणामकारक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करून इतरांना ख्रिस्ताचे शिष्य बनविण्याची मदत देण्याचा आपला कार्यभाग आपण उरकू या.—प्रे. कृत्ये २:४१-४६.