पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी दक्ष असा
१ पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करणे व तो चालविणे हे आम्हाला यहोवाचे साक्षीदार या नात्याने जी नेमणूक लाभली आहे तिचा भाग आहे. (मत्तय २८:१९, २०) तर मग, या कार्यात तुम्ही देवाचे सहकारी ठरणार का? (१ करिंथ ३:९) विश्वातील सर्वथोर व्यक्तीची ओळख कोणाला करुन देणे हा किती मोठा विलोभनीय हक्क आहे!
२ जगभरात जलद गतीने घडत जाणाऱ्या घटनांमुळे ज्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक या गोष्टी अशा का घडत आहेत त्याच्या उत्तराचा शोध घेत आहेत. त्यांच्या प्रश्नांची यहोवाने खूप पूर्वी उत्तरे दिली आहेत. या प्रांजळ जनांना देवाच्या वचनातून शिकवले जाते तेव्हा त्यांना समाधान मिळते. यासाठीच, आपण पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याच्या संधींविषयी दक्ष राहण्यास हवे.—नीती. ३:२७.
संधिविषयी दक्ष असा
३ सत्यात नाही अशा कोणा नातेवाईकासोबत अथवा तुमच्या ओळखीच्या लोकासोबत एखादा तरी पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचा तुम्ही विचार केला आहे का? त्यांची चागली ओळख बाळगल्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्याकरता योग्य वेळ ठरविण्यामध्ये काही आधार मिळू शकेल. निवडून ठेवलेला एखादा प्रश्न किंवा उचित समयी निघालेला एखादा शब्द त्यांची सत्याविषयी आस्था प्रकर्षित करील. जेव्हा एखाद्याची उत्सुकता वाढते तेव्हा फलदायक चर्चा होते व पवित्र शास्त्र अभ्यास सुरु होतो.
४ कित्येक प्रकरणात ख्रिस्ती व्यक्तीचा सदाचार त्याच्या विश्वासातील नसलेल्या सोबत्याला सत्यामध्ये आणण्याचा मार्ग उघडा करून देऊ शकला. (१ पेत्र ३:१, २) विश्वासात नसलेले सोबती तसेच घरातील इतर नातेवाईक यांच्या बाबतीत जेव्हा मंडळीतील सदस्य आपुलकी व आदर दाखवितात तेव्हा ते त्यांना खूप आवडते. त्यांच्याविषयी व्यक्तीगत रुपाची आस्था राखल्यामुळे दीर्घ मुदतीचे मित्रत्व प्रस्थापित होण्यात मदत मिळते. सत्यामध्ये असणाऱ्या सोबत्याशी किंवा घरातील सदस्याशी मिळून कार्य केल्यास तुम्हाला पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यात यश मिळू शकते.
५ घरोघरचे प्रचार कार्य करीत असताना आम्हाला पहिल्याच भेटीत पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करता येऊ शकतो. हे कसे करता येईल? घरमालकांनी प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे थेट प्रकाशनातून दाखवून दिल्यामुळे काही प्रचारकांना हे साध्य झाले आहे. कोणा माणसाने प्रकाशन वाचण्याची तयारी दाखवली किंवा आम्हाला आत बोलावले तर आपण या संधीचा लाभ घेऊन आपले संभाषण पुढे जारी ठेवू व त्याला अभ्यासाचा एक नमुना दाखवून देऊ. अशा या भेटीत आपण किती काळ तेथे राहावे हे तुम्ही स्वतः ठरवा. चर्चा पुढे चालविण्यासाठी त्याच दिवशी इतर वेळी किंवा दुसऱ्या एखाद्या दिवशी परत भेट घेणे चांगले ठरेल. तुम्हाला भावी भेटीत आधी ज्या विषयांची प्रस्तुती करण्यात आली होती त्याविषयीची चर्चा पुढे चालू ठेवावीशी वाटेल. किंवा आधीच्या भेटीत शेवटी जो प्रश्न मांडण्यात आला तो चर्चेला घेणे उपयुक्त वाटेल.
अनौपचारिक वेळी
६ पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यामध्ये अनौपचारिक साक्षीकार्याचा प्रकार हे आणखी एक माध्यम आमच्या उपयोगी पडू शकते. आमच्या दैनंदिनीच्या संपर्कात आम्हाला पुष्कळांचा संपर्क येतो. यांना कदाचित पवित्र शास्त्र शिकण्याची गोडी असते. या वेळी प्रभावी असण्यासाठी आम्ही रिझनिंग पुस्तकातील काही पारखलेल्या प्रस्तावनांचा वापर संभाषण सुरु करण्यासाठी करू शकतो. बोलणारा माणूस कोठे लांब राहात आहे तसेच आपल्याला त्याच्याशी अभ्यास चालविता येणे कमी शक्यतेचे वाटते म्हणून त्याला पवित्र शास्त्र अभ्यासाचा प्रस्ताव मांडण्यास मागेपुढे पाहू नका.
७ अनौपचारिक साक्ष देण्याच्या संध्या हेरा व सोबत हस्तपत्रिका वा मासिके यांचा चांगला पुरवठा आपल्याकडे बाळगा, यामुळे त्याची सत्याविषयी उत्कंठा वाढविली जाऊ शकेल. (उप. ११:१) कोणा माणसाने आस्था दाखवली पण तो तुमच्या मडळीतील क्षेत्रात राहणारा नसला तर त्याचा पत्ता व इतर आवश्यक गोष्टी लिहून घ्या व ही माहिती, तो जेथे राहात आहे तेथील मंडळीला पोचती करा म्हणजे तेथून कोणीतरी त्याची भेट घेईल व नीट काळजी करील.
८ शिष्य बनविण्याचे काम केवळ काहींचे नाही. ते मंडळीतील सर्वांसाठी आहे. शिष्य बनविणारे ही ख्रिस्ती नेमणूक आहे हे लक्षात असू द्या, ज्यामुळे आम्हाला पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी दक्ष राहण्यात उत्तेजन मिळू शकेल.