तुमची मुले शाळेत दृढनिश्चयी असतात का?
१ “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) हे आमच्या मुलांना, जेव्हा शाळेत परिक्षा व दबाव यांचा सामना करावा लागतो तेव्हा हे किती सत्यतेचे ठरते बरे! येणारे प्रत्येक शालेय वर्ष हे विश्वास, सचोटी आणि यहोवाविषयीचे प्रेम याजबद्दलच्या परिक्षांनी भरुन असणार हे ख्रिस्ती युवकांना माहीत असते. तर, मंडळीतील युवकहो, तुम्ही आपल्या शाळेत दृढनिश्चयी असता का? आपल्या मुलांना येणाऱ्या परिक्षांसाठी तयार करता यावे म्हणून तुम्हा पालकांना त्यांची कशी मजबूती करता येणे शक्य आहे?
स्कूल माहितीपत्रकाचा वापर करा
२ १९८३ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले स्कूल माहितीपत्रक हे खासपणे पालक व शाळेला जाणाऱ्या त्यांच्या मुलांसाठी होते. ते शाळेतील शिक्षक व व्यवस्थापक यांना शाळेतील कार्यहालचालीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास व प्रथा काय आहेत ते स्पष्टपणे सादर करण्यासाठी योजिलेले होते. याचप्रमाणे नैतिक वागणूकीविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा एकबद्ध पवित्रा कोणता आहे त्याविषयीच्या मार्गदर्शिका देखील त्यात आहेत.
३ पुष्कळ युवकांसाठी हे माहितीपत्रक एक खरे संरक्षण असे ठरले. उदाहरणार्थ, एका साक्षीदार पालकाला कळले तिच्या मुलीच्या वर्गात लैंगिक शिक्षणाविषयीची जी भाषणे होणार आहेत ती कामातुर वर्तणूकीच्या लोकांकरवी दिली जाणार. तेव्हा या आईने या माहितीपत्रकाच्या साहाय्याने शास्त्रवचनीय निर्बंधांची चर्चा शिक्षकापुढे केली व तिला आपल्या मुलीचा वर्ग बदलण्यात यश मिळाले.
४ शालेय वर्ष सुरु होण्याआधीच पालक आपल्या मुलांसोबत बसून या माहितीपत्रकातील माहितीची चर्चा करून मुलांच्या स्मृतीस उजाळा देऊ शकतील. मुलांचे वय, इयत्ता व शाळा लक्षात ठेवून पालकांना माहितीपत्रकातील निवडक अशा मुद्यांची चर्चा मुलांसोबत करता येईल, जी त्यांना वर्षभरासाठी साहाय्यक ठरू शकेल. (नीती. १४:१५; २२:३) मुलासमोर कोणती परिस्थिती येऊ शकेल याची तालीम करा व प्रसिद्ध करण्यात आलेल्या साहित्याचा वापर केवढ्या लाभदायकपणे करता येऊन ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा’ करता येतील ते त्याला दाखवा.—इब्री. १२:१३.
५ मुलांचे व्यक्तीगत दृष्टीकोण व आशा काय याविषयी प्रश्न विचारणाऱ्या “प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध अस”ण्यासाठी मुलांना मदत देण्यात पालकांना बरेच काही करता येईल. (१ पेत्र ३:१५) काही बाबतीत, पालकांना थेटपणे शिक्षकांसोबत बोलावेसे वाटेल. काही ख्रिस्ती पालक शाळेला अधूनमधून भेट देण्याच्या योजना आखतात; यामुळे त्यांच्यामध्ये व शिक्षकांमध्ये चांगले नाते प्रस्थापले जाते. अशा व्यक्तीशः घेतलेल्या आस्थेमुळे पालक व मूल यांच्यातील नातेही दृढ होते. काही पालकांनी सुचविण्यात आलेला प्रस्ताव लक्षात आणून जेथे त्यांना मुभा मिळाली तेथे वर्गात बसून वर्गातील चर्चा ऐकण्यासाठी वेळ दिला. यामुळे पालकांना मुलाच्या शाळेतील वातावरण समजण्यास तसेच मुले दरदिवशी कोणत्या दबावांना तोंड देतात ते जाणण्यात खरी मदत होते.—१ पेत्र ३:८.
दर दिवशी साक्षीदार राहा
६ कोलोराडो येथे एक तरुण साक्षीदार आपल्या शिक्षकाला, दररोज एक्झामिनिंग द स्क्रिपचर्स पुस्तिकेतील माहिती वाचताना जे कठीण शब्द येत, ते उच्चारण्याविषयी व अर्थाविषयी मदत मागे. एकदा असे झाले की, त्याला ती पुस्तिका मिळेना. नंतर त्याला समजले की, त्याच्या या शिक्षिकेने, तिला बरे वाटत नव्हते म्हणून लवकर घरी गेली तेव्हा सोबत ती पुस्तिकाही नेली. त्या दिवसाचे वचन वाचण्याचे चुकू नये अशी तिची इच्छा होती. याचा परिणाम हा झाला की, तिलाही तिची एक्झामिनिंग द स्क्रिपचर्सची प्रत दिली गेली.
७ शाळेचे येणारे प्रत्येक वर्ष भीती व काळजीचे क्षण सामोरे आणते हे खरे आहे. पण, सरळ दृष्टीकोण तसेच पालक व युवकांनी एकत्रितपणे केलेली तयारी ही त्यांना शाळेत जो वेळ घालवण्यात येतो तेथे यहोवाच्या स्तुतीसाठी ‘आपल्य मनरुपी कंबरा बांधून सज्ज राहण्यासाठी’ सिद्ध करील.—१ पेत्र १:१३.