वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९० पृ. ८
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अनौपचारिक साक्षीकार्य देण्यासाठी सुसंध्या काढणे
  • कोणाकडे प्रचारास जावे?
  • सुरवात कशी करावी
  • कामावरील साक्षीकार्य
  • तुम्ही अनौपचारिक साक्षकार्य करण्यास तयार आहात का?
    आमची राज्य सेवा—२००९
  • तुम्ही अनौपचारिक साक्षीकार्यात सहभाग घेणार का?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • तुम्ही अनौपचारिक साक्ष देऊ शकता!
    आमची राज्य सेवा—२०१०
  • देवाच्या राज्यपदाविषयीचा महिमा विदित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ९/९० पृ. ८

सुवार्ता सादरता

अनौपचारिक साक्षीकार्य देण्यासाठी सुसंध्या काढणे

१ येशूने आपल्या शिष्यांना त्यांचा उजेड लोकांपुढे पाडण्यास सांगितले. (मत्तय ५:१४-१६) योग्य अशा हरप्रसंगी त्यांनी देवाच्या राज्याविषयी इतरांना सांगत राहावे अशी त्याची इच्छा होती. याबाबतीत, येशूने स्वतः आपले उदाहरण ठेवले. याचे एक उदाहरण म्हणजे सुखार येथे एका विहीरीपाशी त्याने एका शमरोनी स्त्रीसोबत सत्याविषयी बोलण्याची संधी काढली. (योहान ४:५-३०) आता, आम्हाबाबत काय? अशा प्रकारच्या सुसंध्या काढून आम्ही साक्ष देतो का?

२ आम्हापैकी प्रत्येकाला दरदिवशी क्षेत्रकार्यात सहभागी होता येत नाही. पण दर दिवशीच असे काही प्रसंग उद्‌भवत असतात जेव्हा आम्ही साक्ष देऊ शकतो. ते कसे? अनौपचारिकपणे साक्षीकार्य करून. कित्येक हजारो जण या पद्धतीमुळे सत्याशी परिचित बनले. आम्ही सुसंध्या हेरल्या आणि प्रयत्न केले तर पुष्कळ लोकांपर्यंत आपल्याला पोहंचता येईल.

कोणाकडे प्रचारास जावे?

३ आमचे नियमित रुपाचे घरोघरचे कार्य, पुनर्भेटी व पवित्र शास्त्र अभ्यासासोबत आपल्याला आमचे सहकर्मचारी, शाळकरी मित्र, व्यावसायिक सहकारी, नातेवाईक व इतर परिचितांसोबत औपचारिकरित्या बोलता येईल. जेव्हा आम्ही बस, गाडी किंवा विमानाने प्रवास करतो तेव्हा आमच्या शेजारी बसलेल्या प्रवाश्‍याबरोबर एखादे संभाषण सुरु करु शकतो. आम्ही सुटीवर गावी गेलो असता आम्ही राहतो त्या ठिकाणी, इंधन भरतो तेथे, उपहारगृहातील कर्मचारी तसेच टॅक्सी वा रिक्षाचालक यांच्यासोबत संभाषण करू शकतो. याचप्रमाणे दवाखान्यात इलाजासाठी थांबून असता किंवा कपड्यांची धुलाई होते अशा केंद्रात असता इतरांशी बोलू शकतो. घरी आहोत तेव्हा आम्हाला आपल्या शेजाऱ्‍यांशी, विक्रेते किंवा जे आमच्या घरी सामान पोचते करतात अशांबरोबर बोलू शकतो. जेव्हा आम्हाला इस्पितळात उपचारासाठी रहावे लागते तेव्हा डॉक्टर, परिचारिका व इतर रुग्णांसमवेत बोलू शकतो.

सुरवात कशी करावी

४ आम्ही भेट घेण्याचे ठरवून दिले आहे व तेथे थांबावे लागणार असे दिसते तेव्हा आपणासोबत अलिकडील मासिके घेतलेली बरी; आणि जे तेथे आढळणार अशांबरोबर मासिकातील एखाद्या मनोरंजक लेखाची चर्चा करण्याची तयारी ठेवावी. किंवा संभाषण सुरु करण्यासाठी एखादी हस्तपत्रिका किंवा माहितीपत्रकाचा आधार घ्यावा. अशा परिस्थितीत असताना काहींना असे आढळले की, अलिकडेच घडलेल्या घटनेविषयी बोलणे आरंभून त्यावर समोरच्या माणसाची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यावे ही पद्धत प्रभावी ठरते. तसेच इतरांना हे आढळले आहे की, अलिकडच्याच घडामोडीविषयी एखादा विचारास चालना देणारा प्रश्‍न विचारून पहावा, जो सुंदर साक्ष देण्याकडे निरवू शकतो. वस्तुतः कसल्याही परिस्थितीत पुढाकार घेणे जरुरीचे आहे की ज्यामुळे पुढचा मार्ग मोकळा होतो.

कामावरील साक्षीकार्य

५ जे प्रापंचिक नोकऱ्‍या करतात अशांना आपल्या सहकर्मचाऱ्‍यांना साक्ष देण्याच्या संध्या उपलब्ध होतात. जॉर्जिया येथे आपल्या दोन भगिनींनी, जे सत्याविषयी गोडी दाखवू शकतील असे त्यांना वाटले अशा कामावरील कर्मचाऱ्‍यांची यादी तयार केली. त्यांच्याशी व इतर काहींसोबत बोलणी केली तेव्हा त्यांनी ६५ पेक्षा अधिक रेवलेशन क्लायमॅक्स पुस्तकाचे वितरण केले आणि बरेच जण आस्थेवाईक असल्याचे त्यांना आढळले.

६ आणखी एका प्रकरणात, एका बंधूने हा निश्‍चय केला की जेवणाच्या १५-मिनिटांच्या वेळी जो माणूस पहिल्यांदा त्याच्या शेजारी येऊन बसेल त्याच्याशी तो बोलेल. जो माणूस त्याच्या शेजारी बसला तो म्हणाला की, त्याला सत्याविषयी माहिती आहे पण पुढचे बोलणे नको. तरीपण आपल्या बांधवाने त्याला घेऊन वाचता येईल अशा जागी प्रकाशन ठेवले. अवघ्या सहा महिन्यातच या माणसाचा व त्याच्या कुटुंबातील सर्वांचा बाप्तिस्मा झाला.

७ “जगाचा प्रकाश” या नात्याने येशूने अनौपचारिक साक्ष देण्यासाठी सुसंध्या हेरल्या. (योहान ८:१२) आम्ही दक्ष असलो व आम्हापाशी असणाऱ्‍या पवित्र शास्त्र आधारीत आशेची सहभागी करण्याची इच्छा आहे तर साक्ष देण्याविषयीच्या सुसंध्या काढण्यात मागे राहणार नाही. अशाप्रकारे येशूचे शिष्य म्हणून आपणही ‘जगात ज्यातिसारखे चमकू.’—फिलिप्पै. २:१५, १६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा