कौटुंबिक पवित्रशास्त्राभ्यास—ख्रिश्चनासाठी एक प्राधान्य
१ बहुतेक वेळेस विश्वासातील कौटुंबिक सदस्य, खासपणे किशोर वयीनाच्या गंभिर समस्याना कौटुंबिक पवित्रशास्त्र अभ्यासाकडे जरूर ते लक्ष न दिल्यामुळे तोंड देतात. असे म्हणणे दुखाचे आहे की पुष्कळ कुटुंबे ज्यात वडील व उपाध्य सेवक समाविष्ट आहेत त्यांच्या शालेय-वयीन मुलावर जगीक प्रभावाने मात केली अशा समस्याने ग्रस्त आहेत.
२ अलिकडेच एका विभागिय देखरेख्याने, लेकरांच्या समस्या असणाऱ्या बांधवांच्या बाबत लिहिले. त्यांनी न्याहाळले की याचे मुख्य कारण बहुदा पवित्रशास्त्र शिक्षणाकडे घरात लक्ष दिले जात नाही हे आहे. विभागीय देखरेख्याच्या अलिकडील पहाणीत संकेत मिळाला की कांही मंडळ्यात ५० टक्याहून अधीकांना कौटुंबिक पवित्रशास्त्र अभ्यास नाहीत.
प्राधान्य
३ देवाच्या वचनात दिलेले मार्गदर्शन कुटुंबाना पाळावयाचे असेल तर कौटुंबिक अभ्यासासाठी नियमितपणे वेळ बाजुस काढून ठेवलाच पाहिजे. कुटुंब प्रमुखांनी कौटुंबिक पवित्रशास्त्राभ्यास नियमितपणे चालविण्यात दक्ष असावे व कुटुंबातील इतर सदस्यांनी सर्व कुटुंबाच्या फायद्यासाठी कौटुंबिक भक्तीचा हा असणारा भाग यशस्वी होण्यास मदत करावी. सर्वांनी या गोष्टीची गुणग्राहकता जाणावी की आताच कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष देण्यात ते अपयशी ठरले तर बहुदा त्यांना गंभिर समस्यांनाच काय पण भवितव्यात त्रासदायक समस्यांचा सामना करावा लागेल.
अभ्यास कार्यक्रम कसा लागू करावा
४ अभ्यास कसा चालविला जावा? काय अभ्यासले जावे? तो केव्हा व्हावा व किती दिर्घकाळ असावा? लेकरांच्या अंतकरणात तो भिडतो याची तुम्ही कशी खात्री करू शकता? या प्रश्नांच्या उत्तरासाठी कृपया द वॉचटॉवर नोव्हेंबर १, १९८६, पृष्ठ २४चा विचार करा.
५ पालकांनी दाखविलेली उत्सुकता व आनंद हेच काय ते यशस्वी कौटुंबिक अभ्यासाचे आवश्यक मुल्य आहेत. (स्तोत्रसंहिता ४०:८ पडताळा.) तसेच, पालकांनी त्यांच्या लेकरांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्याची व यहोवाची तत्वे लागू करण्यास उत्तेजन देण्याची जरूरी आहे.
६ एका बहीण तिची आठही लेकरे अजून घरात असतानाच ती सत्य शिकली. तिचा पति विश्वासातील व सहकार्य देणारा नव्हता तरी तिच्या लेकरांच्या अध्यात्मिकतेकडे योग्य लक्ष दिले जात आहे यात ती निश्चीत होती. तिने क्षेत्र सेवेचे व तिच्या सभेतील सहभाग याबाबत चांगले उदाहरण ठेवले. क्षेत्र सेवेनंतर ती तिच्या लेकरांचे चेहरे ते हर्ष प्रतिबिंबित करतात का हे पहाण्यास बघे. नसेल तर ती ताबडतोब उत्तेजन देई. ते स्वतःस त्यांच्या खोलीत वेगळे ठेवीत तर ती त्यांच्या मनातील काढण्यास व त्यांना देव वचनातून उत्तेजन देण्यास ती त्यांच्यासोबत प्रेमळपणे बोले. याच्या परिणामात तिची सर्व मुले सत्यात आहेत. तीन नियमित पायनियर व यातील दोघे बेथेल सेवाही करतात. तिच्या परिश्रमांना तिने नेहमीच त्यांच्या अध्यात्मिक गोष्टीस प्राधान्य दिल्यामुळे फारच आशीर्वादीत करण्यात आले.—३ योहान ४ तुलना करा.
७ पालक त्यांच्या लेकरांच्या अध्यात्मिक गरजाकडे नेहमी लक्ष देतील तर सध्या व भवितव्यात त्यांना पुष्कळ आशीर्वादांचा आनंद लुटण्यास मिळेल. लेकरे देव वचनाचे मोल पहातील व ते खरोखरी चांगले व फायदेकारक आहे असे पटविले जाईल तेव्हा ते काय विश्वास करतात हे त्यांच्या शब्दाने व कृतिने इतरांना ज्ञात करून देण्यास स्वतः मागे राखणार नाहीत. (स्तोत्र. ११९:१६५) यास्तव, पालकहो, तुमच्या कौटुंबिक अभ्यासाला महत्वाचे स्थान द्या ज्यास तो साजेसा आहे.