वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp16 क्र. १ पृ. १६
  • बायबल प्रश्‍नांची उत्तरं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल प्रश्‍नांची उत्तरं
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • दारिद्र्‌य निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • गरिबांसाठी आनंदाची बातमी!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • दारिद्र्‌यावर कायमचा उपाय शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • लवकरच कोणीही दरिद्री नसेल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
wp16 क्र. १ पृ. १६

बायबल प्रश्‍नांची उत्तरं

जगातील गरिबी कधी नाहीशी होईल का?

हातात रिकामी कटोरी व आपल्या मुलीला जवळ घेऊन उभी असलेली एक स्त्री

गरिबी नसलेलं जग देव कसं आणेल?—मत्तय ६:९, १०.

कमालीच्या गरिबीमुळं लोक कुपोषित होतात, आजारी पडतात. आणि यामुळं दर वर्षी कोट्यवधी लोक मरण पावतात. जगातील काही देश श्रीमंत असले तरीसुद्धा, बहुतांश लोक कमालीच्या गरिबीत जगत आहेत. मानवजातीत गरिबीची समस्या फार जुनी आहे, असं बायबलमध्ये सूचित करण्यात आलं आहे.—योहान १२:८ वाचा.

संपूर्ण जगातील गरिबी काढून टाकण्यासाठी एका जागतिक सरकाराचीच आवश्‍यकता आहे. या सरकाराकडं, जगात उत्पन्‍न होणाऱ्‍या अन्‍न धान्याचं समप्रमाणात वाटप करण्याची शक्‍ती असली पाहिजे तसंच गरिबीला कारणीभूत असलेली युद्धं थांबवण्याची ताकद असली पाहिजे. हे अशा प्रकारचं जागतिक सरकार आणण्याचं वचन यहोवा देव देतो.—दानीएल २:४४ वाचा.

हे जागतिक सरकार गरिबीचा अंत कसा करेल?

देवानं त्याचा पुत्र येशू याला सर्व मानवजातीवर राज्य करण्याचा अधिकार सोपवला आहे. (स्तोत्र २:४-८) येशू गरिबांना वाचवणार आहे आणि जुलूम व हिंसाचार यांचा अंत करणार आहे.—स्तोत्र ७२:८, १२-१४ वाचा.

बायबलमध्ये येशूला “शांतीचा अधिपती” म्हटलं आहे. तो संपूर्ण जगात शांती व सुरक्षितता आणेल. तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांचं स्वतःचं घर असेल. त्यांच्या मनासारखं काम असेल आणि सर्वांना पोटभर खायला मिळेल.—यशया ९:६, ७; ६५:२१-२३ वाचा. (w15-E 10/01)

अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ८ पाहा

हे पुस्तक www.jw.org/mr वरही उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा