वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp16 क्र. १ पृ. १५
  • मोठ्या मनानं माफ करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मोठ्या मनानं माफ करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • “आपसात क्षमा करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • एकमेकांना मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • क्षमाशील का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाप्रमाणे तुम्ही क्षमा करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
wp16 क्र. १ पृ. १५

आधुनिक जीवनासाठी प्राचीन सल्ला

मोठ्या मनानं माफ करा

बायबलमधील तत्त्व: “कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने [यहोवाने] तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा.”—कलस्सैकर ३:१३.

एक स्त्री दुसऱ्‍या स्त्रीला गप्प बसण्याचा इशारा करून चालत जाते

क्षमा करण्याचा काय अर्थ होतो? बायबलमध्ये पापाची तुलना कर्जाशी आणि क्षमा करण्याची तुलना ते कर्ज माफ करण्याशी करण्यात आली आहे. (लूक ११:४) बायबलमध्ये ‘क्षमा’ असे ज्याचे भाषांतर करण्यात आले आहे त्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “ज्याला कर्ज देण्यात आले आहे त्याच्याकडे परतफेडीची मागणी न करता ते माफ करणं” असा होतो, असं एका पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळं आपण जेव्हा आपलं मन दुखावणाऱ्‍याला माफ करतो तेव्हा आपण कशाचीही अपेक्षा न करता मोठ्या मनानं त्याला क्षमा करतो. क्षमा करण्याची तयारी दाखवून आपण, आपलं मन दुखावलेल्या व्यक्‍तीचं चुकीचं वागणं खपवून घेत नसतो. किंवा, त्याच्या वागण्यामुळं आपल्याला झालेल्या दुःखाची तीव्रता कमी होत नसते. तर, मनात राग बाळगण्याचं रास्त कारण असलं तरी आपण तसं करत नाही; आपण तिला माफ करतो.

पण आजच्या दिवसांत असं करणं व्यावहारिक आहे का? आपण अपरिपूर्ण असल्यामुळं आपल्या हातून नेहमीच चुका होतात. (रोमकर ३:२३) त्यामुळं इतरांना क्षमा करून आपण सुज्ञता दाखवतो कारण आज नाही तर उद्या आपल्यालाही क्षमेची गरज भासू शकते. शिवाय, इतरांना आपण माफ करतो तेव्हा आपल्यालासुद्धा फायदाच होतो. कोणता फायदा?

दोन स्त्रिया एकमेकांना मिठी मारतात

माफ करण्यास तयार न होता मनात राग बाळगून आपण खरं तर स्वतःलाच इजा करत असतो. मनात राग खदखदत ठेवल्यामुळं, आपण जीवनाचा पुरेपूर आनंद लुटू शकत नाही आणि आपलं जीवन निरस होतं. यामुळं आपल्या आरोग्यालादेखील धोका संभवू शकतो. मनात राग खदखदत ठेवणं व शत्रुत्वाच्या भावना जोपासत राहणं हे हृदयविकाराला आमंत्रण आहे, असा रिपोर्ट द हिंदू नावाच्या एका दैनिकात देण्यात आला आहे.

पण तेच जर आपण माफ केलं तर त्याचे अनेक फायदे आहेत. इतरांना मोठ्या मनानं क्षमा केल्यानं आपण आपल्यातील एकी व शांती टिकवून ठेवतो. यामुळं आपापसातील नातेसंबंध टिकून राहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण देवाचं अनुकरण करणारे आहोत हे दाखवून देतो. कारण, पश्‍चात्ताप करणाऱ्‍या पापी लोकांना तो क्षमा करतो व इतरांना क्षमा केली पाहिजे अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.—मार्क ११:२५; इफिसकर ४:३२; ५:१. (w15-E 10/01)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा