वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१५ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे साक्षीदार वाढदिवस का करत नाहीत?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • देवाला नाखूष करणारे सण
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • ख्रिश्‍चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • धार्मिक वैविध्याचे आव्हान
    यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१५ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

यहोवाच्या साक्षीदारांतील अनेक जण लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. वाढदिवस म्हणजे तुमचा जन्मदिवस. मग, लग्नाचे वाढदिवस साजरे केलेले चालतात आणि जन्मदिवस का नाही?

स्पष्टपणे सांगायचे तर, ख्रिश्‍चनांना यातील कोणताही साजरा करण्याची गरज नाही. पण, याचा असा अर्थ होत नाही, की या दोन्हींना सारखेच महत्त्व आहे किंवा ख्रिश्‍चनांनी, जन्मदिवसाकडे ज्या दृष्टीने पाहिले जाते तसेच लग्नाच्या वाढदिवसाकडे देखील पाहावे.

वर नमूद केल्याप्रमाणे, दोन्ही दिवस वर्षदिन आहेत; कारण “वर्षदिन” म्हणजे ‘एखादी घटना चिन्हांकित करणारा वर्षातून एकदा येणारा दिन.’ तो दिवस कशाचाही असू शकतो—ज्या दिवशी तुमचा अपघात झाला तो दिवस, तुम्ही पाहिलेले चंद्रग्रहण, तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही पोहायला गेलेला दिवस, वगैरे. ख्रिस्ती जन ‘वर्षदिनाला’ अगदीच खास दिवस समजत नाहीत किंवा तो साजरा करण्यासाठी मोठी पार्टी करीत नाहीत. एखाद्याने, एखाद्या प्रसंगाच्या पैलूंचे परिक्षण करावे व उचित काय ते स्वतः ठरवावे.

जसे की, देवाने इस्राएल लोकांना, त्याचा देवदूत इजिप्तमधील इस्राएल लोकांचे घर ओलांडून गेला तो दिवस आणि त्यामुळे सा.यु.पू. १५१३ मध्ये त्याच्या लोकांचे झालेले निर्गमन दरवर्षी साजरा करण्याची खासकरून सूचना दिली. (निर्गम १२:१४) यहुद्यांनी आणि येशूने देखील देवाच्या सूचनेच्या आज्ञेनुसार ती घटना साजरी केली; पण कोणत्याही पार्टीद्वारे किंवा भेटवस्तू देऊन केली नाही. यहुद्यांनी मंदिराच्या पुनः समर्पणाचा वर्षदिवस देखील खास समजला. ही ऐतिहासिक घटना साजरी करण्यासंबंधी बायबलमध्ये आज्ञा नसली तरी, योहान १०:२२, २३ सुचवते, की येशूने ती घटना साजरी करण्यावर टीका केली नाही. दर वर्षी, ख्रिस्ती जन येशूच्या मृत्यूच्या वर्षदिनी खास सभा भरवतात. आणि हे देवाच्या वचनात दिलेल्या आज्ञेच्या सुसंगतेत आहे.—लूक २२:१९, २०.

लग्नाच्या वाढदिवसांबद्दल काय? काही देशात हे सर्वसामान्य आहे, की पतिपत्नी, देवाने ज्या व्यवस्थेची अर्थात विवाहाची सुरवात करून दिली त्या आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. (उत्पत्ति २:१८-२४; मत्तय १९:४-६) बायबल विवाहाविषयी काहीही नकारात्मक सांगत नाही. येशूसुद्धा एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिला व त्या प्रसंगाच्या आनंदाला त्याने द्विगुणीत केले.—योहान २:१-११.

तेव्हा, एखाद्या जोडप्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवशी, त्या प्रसंगाच्या आनंदावर मनन करण्यास वेळ काढला व दांपत्य या नात्याने यश मिळवण्याकरता कार्य करण्याचा दृढनिश्‍चय केला तर यात काही वावगं नाही. हा आनंदाचा प्रसंग त्यांना, खाजगीत केवळ एक दांपत्य या नात्याने साजरा करायचा आहे की काही नातलगांना अथवा जवळच्या मित्रपरिवाराला सामील करावयाचे आहे हे त्यांनीच ठरवावे. परंतु, या प्रसंगाला एखादा जंगी कार्यक्रम मानण्यासाठी निमित्त समजू नये. अशा प्रसंगी ख्रिश्‍चनांनी, आपल्या दैनंदिन जीवनात लागू होणाऱ्‍या तत्त्वांनुसार वागले पाहिजे. यास्तव, एखाद्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करावा की नाही ही व्यक्‍तिगत बाब आहे.—रोमकर १३:१३, १४.

परंतु, जन्मदिवस पाळण्यासंबंधी काय? अशा वर्षदिनाविषयी बायबलमध्ये काही उल्लेख आपल्याला आढळतो का?

खरे तर, या शतकाच्या सुरवातीला बायबल विद्यार्थी अर्थात यहोवाचे साक्षीदार जन्मदिवस साजरा करीत असत. पुष्कळ जण डेली हेव्हन्ली मान्‍ना नामक लहान लहान पुस्तिका आपल्याजवळ बाळगत असत. यांमध्ये दर दिवसाचे बायबल वचन असायचे; आणि पुष्कळ ख्रिस्ती, सहबायबल विद्यार्थ्यांचा एक लहानसा फोटो त्यांच्या जन्मतारखेच्या पानांवर लावत असत. शिवाय, फेब्रुवारी १५, १९०९ (इंग्रजी) च्या टेहळणी बुरूज नियतकालिकाने म्हटले, की अमेरिका, फ्लोरिडा, जॅक्सनवीले येथील एका अधिवेशनात, संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष बंधू रस्सल यांना स्टेजवर यायला सांगितले. कशाकरता? ग्रेपफ्रुट, अननस आणि संत्राच्या काही पेट्या जन्मदिवसाची सरप्राईज भेट म्हणून त्यांना देण्यात आल्या. यावरून आपल्याला गतकाळाची झलक मिळते. यांचा संदर्भ सांगायचा तर, त्या काळात बायबल विद्यार्थी डिसेंबर २५ तारखेला येशूचा वाढदिवस किंवा जन्मदिवस पाळत असत हेही लक्षात आणा. ब्रुकलिन मुख्यालयात नाताळाचे खास भोजन करण्याची रीत होती.

परंतु त्यानंतर देवाच्या लोकांनी अनेक बाबतीत आध्यात्मिक प्रगती केली आहे. सन १९२० च्या दशकातील सत्याच्या वाढत्या प्रकाशाने त्यांना पुढील गोष्टी पाहण्यास मदत केली:

येशूचा जन्म डिसेंबर २५ रोजी झाला नव्हता; ही तारीख मूर्तीपूजक धर्माशी निगडीत आहे. बायबल आपल्याला, येशूचा अथवा इतर कोणाचा जन्मदिवस नव्हे तर येशूचा मृत्यूदिन साजरा करण्याची आज्ञा देते. असे करणे उपदेशक ७:१ च्या एकवाक्यतेत आहे व एका विश्‍वासू मनुष्याचे जीवन कसे सिद्ध होते ही वस्तुस्थिती त्याच्या जन्मदिवसापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. अमुक विश्‍वासू सेवकाने आपला जन्मदिवस साजरा केल्याचा अहवाल बायबलमध्ये नाही. उलट, मूर्तीपूजकांनी साजरा केलेल्या जन्मदिवसांचा अहवाल आहे; व या घटना क्रूर कृत्यांशी संबंधित आहेत. चला त्यांची पार्श्‍वभूमी पाहू या.

पहिला जन्मदिवस योसेफाच्या दिवसातील फारोचा आहे. (उत्पत्ति ४०:२०-२३) याबाबतीत, हेस्टींग्स यांच्या एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स पुस्तकात जन्मदिवसांवरील लेखाची सुरवात अशाप्रकारे आहे: “जन्मदिवस साजरा करण्याच्या रिवाजाला वरून पाहिले तर समय मोजणे हे त्याचे स्वरूप आहे पण त्यात गोवलेल्या पद्धती प्राचीन धार्मिक तत्त्वांशी संबंधित आहेत.” पुढे, हा विश्‍वकोश इजिप्टोलॉजिस्ट सर जे. गार्डनर विलकिनसन यांचा उल्लेख करतो ज्यांनी असे लिहिले: “प्रत्येक इजिप्शियनला आपला जन्मदिवस आणि ज्या तासाला त्याचा जन्म झाला होता तो खूप महत्त्वाचा वाटत होता; आणि कदाचित, पर्शियात चालते त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्‍तीने आपला जन्मदिवस धूमधडाक्यात साजरा केला, समाजातील सर्वप्रकारच्या मनोरंजनाच्या साधनांद्वारे आपल्या मित्रांचे स्वागत केले आणि पंचपक्वान्‍ने तयार केली.”

बायबलमध्ये हेरोदाच्या जन्मदिवसाचा आणखी एक उल्लेख आहे; त्यावेळी बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचा शिरच्छेद करण्यात आला होता. (मत्तय १४:६-१०) द इंटरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिआ (१९७९ आवृत्ती) ही समज पुरवतो: “पूर्व-हेल्लनीस्टीक ग्रीक, दैवतांचे आणि प्रमुख लोकांचे जन्मदिवस साजरा करीत असत. ग्रीक जेनेथलियाने या उत्सवांचे वर्णन केले आणि जेनेसियाचा अर्थ, महत्त्वपूर्ण मृत व्यक्‍तीच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ केलेला उत्सव असा होतो. २ मकाबीस ६:७ मध्ये आपल्याला ॲन्टीयोकस चौथा याच्या मासिक जेनेथलियाचा संदर्भ मिळतो; या उत्सवाच्या वेळी, यहुद्यांना ‘अर्पणांचे सेवन’ करण्याची जबरदस्ती करण्यात आली होती. . . . हेरोदाने आपला जन्मदिवस साजरा केला तेव्हा त्याचे हे वागणे एका हेल्लनीस्टीक रीतीनुसार होते; पूर्व-हेल्लनीस्टीक काळात इस्राएलमध्ये जन्मदिवस साजरा केल्याचा कोणताही पुरावा नाही.”

कबूल आहे, की प्रत्येक रीतीचा किंवा रिवाजाचा उगम कोठून झाला किंवा त्यांचा कदाचित काही प्राचीन धार्मिक संबंध असावा, या गोष्टींची आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांना जास्त काळजी नसली तरी, देवाच्या वचनात असलेल्या यथायोग्य सूचनांकडे ते दुर्लक्षही करत नाहीत. आणि यात याही गोष्टीचा समावेश होतो, की बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेले जन्मदिवसाचे अहवाल मूर्तीपूजक आहेत व क्रूर घटनांशी त्यांचा संबंध जोडला जातो. यास्तव, जन्मदिवस साजरा करण्यास शास्त्रवचने पूर्णपणे अस्वीकार करतात व प्रांजळ ख्रिश्‍चन या विचाराचा आदर करतात.

यास्तव, ख्रिस्ती जन आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याविषयी जो निर्णय घेतात तो पूर्णपणे व्यक्‍तिगत असला तरी, प्रौढ ख्रिस्ती जन्मदिवस का साजरा करीत नाहीत याची त्यांच्याकडे सबळ कारणे आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा