“आपण कॅथलिक, त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो”
हेयहोवाच्या साक्षीदारांबद्दलचे उद्गार, इटली, बारी येथील एका शिक्षिकेने धर्माचा इतिहास या विषयावर तिच्या हायस्कूलमधील एका वर्गात बोलत असताना काढले. शिक्षिकेने वर्गाला सांगितले होते, की ती हा विषय व्हिडिओ कॅसेटद्वारा त्यांना शिकवणार होती. हे ऐकल्यावर, १८ वर्षीय रोबेर्टो नामक एका विद्यार्थ्याने, आपल्याही धर्मावर चर्चा करावी असे सुचवले. त्याने तिला यहोवाचे साक्षीदार—ह्या नावामागील संस्था ही इंग्रजी व्हिडिओ कॅसेट दिली. तिने रोबेर्टोचे म्हणणे मान्य केले आणि सुमारे ३० विद्यार्थी असलेल्या संपूर्ण वर्गाने ती कॅसेट पाहिली. रोबेर्टो म्हणतो, “यहोवाच्या साक्षीदारांतील ऐक्य, संघटन आणि गाढ प्रीती पाहून सर्वजण प्रभावीत झाले. दर महिन्याला टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या ४ कोटी प्रती आणि सावध राहा! नियतकालिकाच्या ३.६ कोटी प्रती छापल्या जातात हे समजल्यावर तर त्यांना जास्तच आश्चर्य वाटले.”
व्हिडिओ पाहून झाल्यावर रोबेर्टोचे पुष्कळ वर्गमित्र त्याच्याकडे येऊन म्हणाले, “तुम्ही लोक इतकं संघटित आहात हे मला माहीतच नव्हतं.” यहोवाच्या साक्षीदारांबद्दल शिक्षिका वर्गाला अशी म्हणाली: “त्यांचा विश्वास त्यांना ऐक्याने व संघटितरीत्या काम करावयास कसा प्रवृत्त करतो ते पाहा. आपण कॅथलिक, त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो.” व्हिडिओ आणि त्यानंतर झालेली चर्चा यामुळे यहोवाच्या साक्षीदारांविषयीची अधिक चांगली समज सर्वांना मिळू शकली.