वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१५ पृ. ७-८
  • तुखिक—एक भरवसालायक सह दास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुखिक—एक भरवसालायक सह दास
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जेरुसलेमचे मदतकार्य
  • रोमहून कलस्सैकडे
  • दूरच्या नेमणुकींवर देखरेख
  • तुम्ही इतरांचं चांगल्या प्रकारे “सांत्वन” करू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • पौलाचे सहकारी—ते कोण होते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • यहोवाच्या मार्गांनी चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • भरवशालायक असल्याचं दाखवून द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१५ पृ. ७-८

तुखिक—एक भरवसालायक सह दास

तुखिक याने विविध प्रसंगी प्रेषित पौलाबरोबर प्रवास करून त्याचा संदेशवाहक म्हणून काम केले होते. तो एक असा दूत होता ज्याच्याजवळ निर्धास्तपणे पैशाची आणि देखरेखीची जबाबदारी सोपवता येऊ शकत होती. शास्त्रवचनांमध्ये त्याच्या भरवशावर—सर्व ख्रिश्‍चनांकडे असावयास हवा असा गुण यावर—अधिक जोर देण्यात आल्यामुळे तुम्हाला त्याच्याविषयी आणखी जाणून घ्यावेसे वाटेल.

“प्रभूमधील विश्‍वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास,” असे पौल तुखिकचे वर्णन करतो. (कलस्सैकर ४:७) प्रेषित पौलाचा त्याच्याबद्दल असा दृष्टिकोन बाळगण्यामागचे कारण काय?

जेरुसलेमचे मदतकार्य

सा.यु. ५५ च्या सुमारास यहुदियातील ख्रिश्‍चनांना आर्थिक मदत हवी होती. युरोप आणि आशिया मायनरमधील मंडळ्यांच्या मदतीद्वारे पौलाने त्यांना साहाय्य करण्याकरता वर्गणी गोळा केली. आशिया प्रांतातील तुखिकचा या मदतकार्यात सहभाग होता.

या वर्गणीचा कसा उपयोग केला जावा याविषयी सूचना दिल्यानंतर, मिळालेली रक्कम घेऊन भरवसालायक पुरुषांना जेरुसलेमला पाठवण्यात यावे किंवा त्याच्या सोबतीने जावे असे पौलाने सुचवले. (१ करिंथकर १६:१-४) ग्रीसहून जेरुसलेमपर्यंतच्या लांब प्रवासाला तो निघाला तेव्हा त्याच्याबरोबर पुष्कळ पुरुषमंडळी होती ज्यात स्पष्टपणे तुखिक देखील होताच. (प्रेषितांची कृत्ये २०:४) खरं तर इतक्या लोकांची सोबत असणे जरूरीचेच होते कारण त्यांच्याजवळ अनेक मंडळ्यांकडून आलेली रक्कम सोपवण्यात आली होती. लक्षात ठेवण्याजोगे एक कारण म्हणजे, त्यांना सुरक्षिततेची गरज होती कारण रस्त्यावर लुटारूंची भीती होती.—२ करिंथकर ११:२६.

अरिस्तार्ख आणि त्रफिम हे दोघेही पौलाबरोबर जेरुसलेमला गेल्यामुळे काहींना कदाचित असे वाटते, की तुखिक आणि इतरजण सुद्धा गेले असावेत. (प्रेषितांची कृत्ये २१:२९; २४:१७; २७:१, २) तुखिकचा या मदत कार्यात समावेश होता म्हणूनच, ग्रीसमध्ये वर्गणीची व्यवस्था करण्याकरता तीतसोबत काम केलेल्या अनेकांपैकी तो एक ‘बंधू’ असल्याचे सुचवले जाते; याशिवाय, “ह्‍या कृपेच्या कार्यांत [पौलाला] प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमिले” होते. (२ करिंथकर ८:१८, १९; १२:१८) तुखिकने पूर्ण केलेली पहिली कामगिरी जबाबदारीची होती, तर मग त्याची दुसरी कामगिरी देखील काही कमी नव्हती.

रोमहून कलस्सैकडे

पाच ते सहा वर्षांनंतर (सा.यु. ६०-६१), पौल, रोममधील त्याच्या पहिल्या कारावासातून मुक्‍त होण्याची आशा करीत होता. तुखिक त्याच्याबरोबर होता, घरापासून शेकडो किलोमीटर दूर. आता तुखिक आशियाला परतणार होता. यामुळे पौल त्याच्याकडून त्या क्षेत्रातील ख्रिस्ती मंडळ्यांना पत्रे पाठवू शकला व फिलेमोनचा पळून आलेला दास अनेसिम याला त्याच्यासोबत कलस्सैला पुन्हा पाठवू शकला. तुखिक आणि अनेसिमकडे, आता बायबलच्या धर्मसूत्रांत समावेश असलेली निदान तीन तरी पत्रे होती—एक इफिसकरांना, एक कलस्सैकरांना आणि एक फिलेमोनला. कलस्सैपासून सुमारे १८ किलोमीटर दूर असलेले शहर अर्थात लावदिकीयातील मंडळीला देखील एखादे पत्र पाठवण्यात आले असावे.—इफिसकर ६:२१; कलस्सैकर ४:७-९, १६; फिलेमोन १०-१२.

तुखिक काही पोस्टमन नव्हता. तो एक भरवसालायक खासगी संदेशवाहक होता, कारण पौलाने लिहिले: “प्रिय बंधु तुखिक, प्रभूमधील विश्‍वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळवील; त्याला मी तुम्हाकडे ह्‍यासाठीच पाठविले आहे की, आमचे वर्तमान तुम्हास कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे.”—कलस्सैकर ४:७, ८.

ई. रॅन्डॉल्फ रिचड्‌र्स नामक विद्वान असे दर्शवतात, की संदेशवाहक, “सहसा, लिहिलेल्या मजकुराव्यतिरिक्‍त, लेखक आणि ज्यांना पत्र पाठवले आहे त्यांच्यामधील एक व्यक्‍तिगत दुवा होता. . . . एक भरवसालायक संदेशवाहक असण्याचे [एक कारण] हे [की] त्याच्याजवळ बहुधा ज्यादा माहिती असायची. पत्रामध्ये एखाद्या परिस्थितीचे संक्षिप्त वर्णन असायचे, बहुधा लेखकाचेच विचार असायचे, पण संदेशवाहकाने, पत्र प्राप्त करणाऱ्‍याला सर्व तपशीलवार माहिती सांगावी असे त्याच्याकडून अपेक्षिले जायचे.” एखाद्या पत्रामध्ये, शिकवणी व तातडीच्या बाबी लिहिण्यात आलेल्या असल्या तरी, त्यात इतरही गोष्टी होत्या ज्या एका भरवसालायक संदेशवाहकाकडून तोंडी सांगितल्या जाऊ शकत होत्या.

इफिसकरांना, कलस्सैकरांना आणि फिलेमोनला लिहिलेल्या पत्रांत, पौलाचे कसे चालले होते त्याबद्दल इतके काही सांगण्यात आलेले नाही. यास्तव तुखिकला, व्यक्‍तिगत माहिती सांगावी लागली, पौलाच्या रोममधील परिस्थितीचे विश्‍लेषण द्यावे लागले व मंडळ्यांना उत्तेजन देता यावे म्हणून आधी मंडळ्यांतील परिस्थिती योग्यरीतीने समजून घ्यावी लागली. अशाप्रकारचे संदेश आणि जबाबदाऱ्‍या, पाठवणाऱ्‍याचे विश्‍वासूपणे प्रतिनिधीत्व करू शकणाऱ्‍यावरच सोपवल्या जात असत. आणि तुखिक असाच मनुष्य होता.

दूरच्या नेमणुकींवर देखरेख

रोममधील गृहकैदेतून सुटका मिळाल्यानंतर, पौल क्रेत बेटावरील तीतकडे अर्तमाला किंवा तुखिकला पाठवण्याच्या विचारात होता. (तीत १:५; ३:१२) प्रेषित पौलाला दुसऱ्‍यांदा (कदाचित सा.यु. ६५ च्या सुमारास) रोममध्ये कैद करण्यात आले त्यादरम्यान त्याने, पुन्हा एकदा तुखिकला इफिसला पाठवले; जेणेकरून कदाचित तो तीमथ्याची जागा घेऊ शकत होता आणि तीमथ्य मग पौलाकडे जाऊ शकत होता.—२ तीमथ्य ४:९, १२.

या कालावधीत, तुखिक क्रेतला आणि इफिसला गेला की नाही याबाबत काही स्पष्ट माहिती नाही. तरीसुद्धा, यासारखे संदर्भ सुचवतात, की तो प्रेषित पौलाच्या सेवेच्या शेवटल्या वर्षांपर्यंत त्याचा एक जवळचा सोबती राहिला. पौलाने, त्याला जबाबदार आणि कदाचित कठीण कामगिरीसाठी तीमथ्य आणि तीत यांच्या बदल्यात पाठवण्याचा विचार केला याचा अर्थ स्पष्ट आहे, तो एक प्रौढ ख्रिस्ती पर्यवेक्षक बनला होता. (पडताळा १ तीमथ्य १:३; तीत १:१०-१३.) प्रवास करण्यास व दूरच्या नेमणुकीत जाण्यास तो तयार होता यामुळे पौलाला आणि सर्व ख्रिस्ती मंडळीला त्याची खूप मदत झाली.

आज, आत्म-त्यागी ख्रिस्ती स्वेच्छेने यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळ्यांमध्ये देवाची सेवा करतात किंवा इतरत्र राज्य हितांना बढावा देण्याकरता स्वतःला उपलब्ध करतात. हजारोंनी अगदी आनंदाने, मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक, बांधकाम प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सेवक, वॉच टावर संस्थेच्या जागतिक मुख्यालयात किंवा संस्थेच्या इतर शाखांपैकी कोठे तरी नेमणूक स्वीकारली आहे. तुखिकप्रमाणे ते अगदी साधेसुधेच पण कष्टाळू सेवक आहेत; देवाला प्रिय असलेले “विश्‍वासू सेवक” आणि ‘प्रभूमधील सोबतीचे’ भरवसालायक दास म्हणून इतर ख्रिश्‍चनांना देखील ते प्रिय आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा