वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 २/१५ पृ. ३-४
  • नितान्त दुःख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नितान्त दुःख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अतिशय “कष्टमय व दुःखमय”
  • देवाच्या उद्देशानुरूप?
  • दुःख नसेल तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • देव खरोखरी आपली काळजी करतो का?
    देव खरोखरी आपली काळजी करतो का?
  • देवाला आपलं दुःख कळतं का?
    सावध राहा!—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 २/१५ पृ. ३-४

नितान्त दुःख

“वैयक्‍तिकरित्या आणि सामुहिकपणे माणसांना सोसावे लागणारे हे अकथनीय दुःख का . . . कशासाठी? देवाला तर पर्मार्थ म्हणतात, आणि तरीसुद्धा या जगात आढळणारे हे निरर्थक दुःख, हा निष्फळ पापीपणा, सारेच किती अर्थशून्य आहे. नीत्शेने देवावर जुलूमशहा, फसव्या, तोतया, जल्लाद असण्याचा जो आरोप लावला तो खरा तर नाही?”—हान्स कुंग लिखित ऑन बीइंग ए ख्रिश्‍चन.

कॅथलिक वेदान्ती हान्स कुंग यांनी वरील शब्दांत मांडलेला प्रश्‍न खरे तर अनेकांना बुचकळ्यात पाडतो—सर्वसमर्थ, कृपानिधान परमेश्‍वर एवढे दुःख का म्हणून खपवून घेतो? तुम्ही लोकांच्या तोंडून असा प्रश्‍न ऐकलेला नाही का? कुंग यांनी ज्या बेसुमार दुःखाचे वर्णन, “रक्‍त, घाम आणि अश्रू, वेदना, व्यथा आणि भय, एकाकीपणा आणि मृत्यू यांचा एक अखंड प्रवाह” असे म्हणून केलेले आहे ते पाहून कोणताही संवेदनशील माणूस हळहळतो. सबंध इतिहासामध्ये अतिभयंकर व्यथेच्या या प्रवाहाने, नव्हे महापुराने, लक्षावधी लोकांचे जीवन अस्ताव्यस्त केले आहे.—ईयोब १४:१.

अतिशय “कष्टमय व दुःखमय”

युद्धांमुळे निष्पन्‍न होणाऱ्‍या दुःखाचा विचार करा; यांत प्रत्यक्ष बळी पडणाऱ्‍या मुलांना आणि इतरांनाच नव्हे, तर त्यांच्या मागे त्यांच्या शोकाकुल पालकांना आणि आप्तेष्टांना देखील अतीव वेदना सोसाव्या लागतात. अलीकडेच रेडक्रॉसने सांगितले की “गत दशकातील सशस्त्र चकमकींत १.५ दशलक्ष मुले दगावली आहेत.” रेडक्रॉसच्या वृत्तानुसार १९९४ साली र्‌वांडा येथे “हजारोंच्या संख्येने पुरुष, स्त्रिया व मुलांची क्रमाक्रमाने निर्घृण हत्या करण्यात आली.”

विकृतमानस बालसंभोगी ज्या वेदनांना कारणीभूत ठरतात त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या मुलासोबत एका बाल-कल्याण कार्यकर्त्याने लैंगिक दुर्व्यवहार केल्यामुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली, असे सांगणाऱ्‍या उद्विग्न झालेल्या एका आईने म्हटले की, “ज्या माणसाने माझ्या मुलासोबत लैंगिक दुर्व्यवहार केला . . . त्याने कल्पनाही करता येणार नाही अशा घृणास्पद पद्धतीने, इतरही अनेक मुलांना ठार मारले.” शिवाय, अमानुषपणे मनुष्यहत्या करणाऱ्‍या किंवा एकापाठोपाठ एक खून करणाऱ्‍या नराधमांना बळी पडलेल्या लोकांच्या अतिभयंकर व्यथेचा विचार करून पाहा; उदाहरणार्थ ब्रिटनमध्ये “तब्बल २५ वर्षांपर्यंत निर्धोकपणे अपहरण, बलात्कार, छळ आणि खून करणाऱ्‍यांना” शेवटी अटक करण्यात आली. सबंध इतिहासात स्त्रीपुरुषांनी एकमेकांना दिलेल्या वेदनांना आणि दुःखाला जणू अंतच नाही असे भासते.—उपदेशक ४:१-३.

त्यातल्या त्यात, भावनिक आणि शारीरिक व्याधींमुळेही भयंकर दुःख सोसावे लागते आणि जेव्हा जवळच्या माणसांचा अचानक अकाली मृत्यू होतो, तेव्हा तर कुटुंबीयांवर आभाळच कोसळते. शिवाय, दुष्काळ किंवा इतर तथाकथित नैसर्गिक आपत्तींमुळे निपजणाऱ्‍या अपरिमित दुःखाविषयीही काही वेगळे सांगायला नको. खरोखर, ७० ते ८० वर्षांचे आपले आयुष्य अतिशय “कष्टमय व दुःखमय” असते असे जे मोशेने म्हटले त्याबद्दल कोणाचेही दुमत नसेल.—स्तोत्र ९०:१०.

देवाच्या उद्देशानुरूप?

काहींनी दावा केल्याप्रमाणे, हे सारे अविश्रांत दुःख आपल्या बुद्धीपलीकडे असणाऱ्‍या देवाच्या उद्देशानुरूप तर नसावे? ‘पुढच्या जगातील’ जीवनाची पूर्ण समज प्राप्त होण्यासाठी आता दुःख सोसणे अनिवार्य आहे का? “दुःखामुळे मृत्यू होऊन शरीराचे कुजणे मनुष्य प्राण्यासाठी आवश्‍यक आहे, कारण यामुळे तो जिवंत राहून आत्मा [जीव] बनतो” असे फ्रेंच तत्त्वज्ञानी टीलहर्ड दी शार्डिनचे म्हणणे खरे असावे का? [टीलहर्ड दी शार्डिन यांचा धर्म (इंग्रजी); तिरपे वळण आमचे.] निश्‍चितच नाही!

एक विचारवंत सृष्टिकर्ता, जाणूनबुजून घातकी परिस्थिती निर्माण करून मग तिच्या दुष्परिणामांपासून लोकांना वाचवल्यावर स्वतःला दयाळू म्हणवेल का? शक्यच नाही! एक प्रेमळ परमेश्‍वर असे का म्हणून करील? पण मग देवाने दुःखाचे अस्तित्व का खपवून घेतले? दुःख कधी संपुष्टात येईल का? पुढील लेखात हे प्रश्‍न विचारात घेतले जातील.

[Picture Credit Line on page 3]

P. Almasy यांचे WHO छायाचित्र

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा