वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१५ पृ. ५-८
  • येशूबद्दलचे सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूबद्दलचे सत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल काय म्हणते
  • विश्‍वास ठेवण्यासाठी आधार
  • ते का विश्‍वास ठेवत नाहीत
  • खऱ्‍या येशूला शोधणे
  • खरा येशू
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • असं खरोखरच घडलं होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • येशूची जीवनकथा—खरी आहे की खोटी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम
    जीवनाचा काय उद्देश आहे?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१५ पृ. ५-८

येशूबद्दलचे सत्य

येशू कोण होता आणि त्याने काय साध्य केले याबद्दलच्या सिद्धान्तांना व परिकल्पनांना अंतच नाही असे दिसते. पण स्वतः बायबलबद्दल काय? ते आपल्याला येशू ख्रिस्ताविषयी काय सांगते?

बायबल काय म्हणते

बायबलचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर तुम्हाला या मुख्य वस्तुस्थिती दिसून येतील:

◻ येशू देवाचा एकुलता-एक पुत्र आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.—योहान ३:१६; कलस्सैकर १:१५.

◻ दोन सहस्त्र वर्षांपूर्वी, मानवी रुपात जन्म व्हावा म्हणून देवाने येशूचे जीवन एका यहुदी कुमारिकेच्या पोटी स्थलांतरीत केले.—मत्तय १:१८; योहान १:१४.

◻ येशू केवळ एक चांगला मनुष्य नव्हता. तो प्रत्येक पैलूत आपला पिता यहोवा देव याच्या सुंदर व्यक्‍तिमत्वाचे विश्‍वासू प्रतिबिंब होता.—योहान १४:९, १०; इब्री लोकांस १:३.

◻ येशूने आपल्या पार्थिव सेवेदरम्यान, अत्याचार पीडितांच्या गरजा प्रेमळपणे पूर्ण केल्या. त्याने चमत्कारिकरीत्या रोग्यांना बरे केले आणि मृतांनाही जिवंत केले.—मत्तय ११:४-६; योहान ११:५-४५.

◻ देवाचे राज्य त्रस्त मानवजातीसाठी एकमात्र आशा असल्याची घोषणा येशूने केली तसेच हे प्रचारकार्य निरंतर करीत राहण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना प्रशिक्षण दिले.—मत्तय ४:१७; १०:५-७; २८:१९, २०.

◻ सा. यु. ३३, निसान १४ रोजी (एप्रिल १ च्या सुमारास), येशूला राजद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली, परीक्षा घेण्यात आली, शिक्षा ठोठावण्यात आली व वधस्तंभावर खिळण्यात आले.—मत्तय २६:१८-२०, मत्तय २६:४८–२७:५०.

◻ येशूचा मृत्यू खंडणीचे कार्य करतो, विश्‍वासू मानवजातीची तिच्या पापी अवस्थेतून सुटका करतो व अशा प्रकारे जे त्याच्यावर विश्‍वास ठेवतील त्या सर्वांसाठी चिरकालिक जीवनाचा मार्ग खुला करतो.—रोमकर ३:२३, २४; १ योहान २:२.

◻ निसान १६ रोजी येशूला पुनरुत्थित करण्यात आले व त्यानंतर लागलीच, आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे खंडणी मोल आपल्या पित्यासमोर सादर करण्यासाठी तो पुन्हा स्वर्गात गेला.—मार्क १६:१-८; लूक २४:५०-५३; प्रेषितांची कृत्ये १:६-९.

◻ यहोवाचा नियुक्‍त राजा या नात्याने पुनरुत्थित येशूला मानवाबद्दलचा देवाचा मूळ उद्देश पूर्ण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.—यशया ९:६, ७; लूक १:३२, ३३.

अशाप्रकारे, बायबल येशूला देवाचे उद्देश साध्य होण्यामधील सर्वात प्रमुख व्यक्‍ती असे सादर करते. पण, बेथलेहेममध्ये जन्म घेतलेला व सुमारे २००० वर्षांपूर्वी पृथ्वीवर येऊन गेलेला इतिहासातील येशू—हाच खरा येशू आहे याबद्दल तुम्ही कशी खातरी बाळगू शकता?

विश्‍वास ठेवण्यासाठी आधार

मोकळ्या मनाने जर केवळ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने वाचून काढलीत तर पुष्कळ शंका दूर केल्या जाऊ शकतात. असे केल्याने तुम्हाला आढळून येईल, की भाकडकथांच्या बाबतीत असते त्याप्रमाणे बायबल वृत्तान्त, घटनांची संदिग्ध कथा नाही. उलट, त्यामध्ये नावे, विशिष्ट काळ व अचूक ठिकाणे सांगितली आहेत. (उदाहरणार्थ, लूक ३:१, २ पाहा.) शिवाय, येशूच्या शिष्यांना उल्लेखनीय प्रामाणिकतेत चित्रित करण्यात आले आहे, त्यात असा सरळपणा आहे जो वाचकामध्ये भरवसा बिंबवतो. लेखकांनी विश्‍वासू नोंद करण्याच्या हितामध्ये कोणाच्याही दोषावर—स्वतःवरही—रंगसफेती लावण्याचा प्रयत्न केलेला नाही. होय, बायबलमध्ये सत्याचा निनाद असल्याचे तुम्ही पाहाल.—मत्तय १४:२८-३१; १६:२१-२३; २६:५६, ६९-७५; मार्क ९:३३, ३४; गलतीकर २:११-१४; २ पेत्र १:१६.

पण आणखी पुष्कळ काही आहे. पुरातत्त्वविद्येच्या शोधांनी वारंवार बायबल अहवालांना पुष्टी दिली आहे. उदाहरणार्थ, जेरुसलेममधील इस्राएल संग्रहालयाला तुम्ही भेट दिली तर येथे तुम्हाला एक शिला दिसेल ज्यावर पंतय पिलातचे नाव कोरले आहे. इतर पुरातत्त्वविद्येचे शोध, बायबल ज्यांचा उल्लेख करते ते लायसनायस व सरजियस पौलस, आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या कल्पित गोष्टी नसून खऱ्‍या व्यक्‍ती असल्याची पुष्टी देतात. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत (नवा करार) लिहिलेल्या घटनांना, प्राचीन लेखकांच्या संदर्भांद्वारे ज्यामध्ये जुवेनल, टॅसिटस, सेनेका, स्विटोनिअस, प्लिनी द यंगर, लुशियन, सेल्सस आणि यहुदी इतिहासकार जोसीफस यांसहित विपुल प्रमाणात पुष्टी मिळते.a

पहिल्या शतकात हयात असलेल्या हजारोंनी ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये सादर केलेले अहवाल तत्परतेने स्वीकारले. ख्रिस्ती विश्‍वासाच्या शत्रूंनीसुद्धा, येशूने काय म्हटले असावे व काय केले असावे याबद्दलच्या अहवालांची सत्यता नाकारली नाही. येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी त्याच्या गुणलक्षणांना फुगवून सांगण्याच्या शक्यतेबद्दल प्राध्यापक एफ. एफ. ब्रूस असे विवेचन मांडतात: “काय घडले व काय घडले नाही याबद्दल येशूच्या शिष्यांनी त्या प्रारंभिक वर्षांमध्ये त्याचे बोलणे व कृती बनवून सांगणे आणि तेही बहुतेक शिष्य जिवंत असतानाच असे करणे काही लेखकांना वाटते इतके सोपे नाही . . . शिष्यांना चुका (वास्तविकतांचे मुद्दामहून केलेले बदल तर बाजूलाच राहिले) करून चालणार नव्हते कारण काही लोकांनी त्या लागलीच प्रकाशझोतात आणल्या असत्या आणि तसे करण्यासाठी त्यांना खूपच आनंद झाला असता.”

ते का विश्‍वास ठेवत नाहीत

तरीसुद्धा काही विद्वान अजूनही साशंक आहेत. बायबल अहवाल कल्पित आहे असे गृहीत धरताना ते अगदी उत्सुकतेने ॲपोक्रिफल लिखाणे धुंडाळून काढतात व त्यांना विश्‍वसनीय म्हणून स्वीकारतात! असे का? कारण बायबल अहवालांमध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहेत ज्यांना आधुनिक बौद्धिक लोक मानू इच्छित नाहीत.

सन १८७१ मध्ये प्रकाशित केलेल्या युनियन बायबल कंपॅनियन या आपल्या पुस्तकात एस. ऑस्टीन ॲलीबोन यांनी शंकेखोरांसमोर एक आव्हान मांडले. त्यांनी लिहिले: “ज्या कोणाला शुभवर्तमान इतिहासाच्या सत्यतेबद्दल संशय वाटतो त्याला विचारून बघा, की सीझर रोमच्या राजधानीत वारला किंवा शार्लमेन या सम्राटाला रोमी साम्राज्याचा पश्‍चिमेचा सम्राट म्हणून ८०० मध्ये तिसरा पोप लिओ याने शिरोभूषण घातले यावर कोणत्या कारणास्तव विश्‍वास ठेवतो? . . . या लोकांविषयी केलेली सर्व प्रतिपादने . . . आपण मानतो; कारण त्यांच्या सत्यतेविषयीचे ऐतिहासिक पुरावे आपल्याकडे आहेत. . . . इतका ऐतिहासिक पुरावा असूनही जर लोक त्यावर विश्‍वास ठेवण्यास नकार देत असतील तर आम्ही त्यांना मूर्ख आग्रही किंवा हताशपणे दुर्लक्ष करणारे असे म्हणून त्यांना सोडून देऊ. पवित्र शास्त्रवचनांच्या विश्‍वसनीयतेचा हा स्पष्ट पुरावा असूनसुद्धा आपली खात्री पटली नाही असा दावा करणाऱ्‍यांबद्दल आपण आणखी काय म्हणावे? . . . आपला अहंकार उतरवणाऱ्‍या गोष्टीवर ते विश्‍वास ठेवू इच्छित नाहीत व त्यामुळे त्यांना वेगळेच जीवन जगण्यास भाग पाडले जाईल.”

होय, काही शंकेखोरांचे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा नकार करण्याचे अंतःस्थ हेतू आहेत. त्यांची समस्या त्याच्या विश्‍वसनीयतेची नाही तर त्यातील दर्जांची आहे. जसे की, येशूने आपल्या अनुयायांबद्दल म्हटले: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहान १७:१४) परंतु, स्वतःला ख्रिश्‍चन म्हणवून घेणारे पुष्कळ जण या जगाच्या राजकारणात खोलपर्यंत गोवलेले आहेत, एवढेच नव्हे तर रक्‍तलांच्छित युद्धांमध्ये त्यांचा भाग होता. बायबलच्या दर्जांनुरूप असण्याऐवजी, बायबलने आपल्या दर्जांनुरुप व्हावे असे पुष्कळ लोकांना आवडेल.

नैतिकतेच्या बाबीचा देखील विचार करा. जारकर्माला सूट दिल्याबद्दल येशूने थुवतीरा मंडळीला कडक सल्ला दिला. त्याने त्यांना सांगितले, “मी [अंतर्याम, NW] व अंतःकरणे ह्‍यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.”b (प्रकटीकरण २:१८-२३) पण स्वतःला ख्रिस्ती म्हणविणारे अनेक जण नैतिक दर्जांना बाजूला सारतात हे खरे नाही का? आपले अनैतिक वर्तन झिडकारण्याऐवजी ते, येशूने जे म्हटले ते झिडकारतील.

बायबलमधील येशूचा स्वीकार न करण्याकडे कल असल्यामुळे, विद्वानांनी स्वतःच्या कल्पनांचा एक येशू तयार केला आहे. ते खोटेपणाने शुभवर्तमान लेखकांवर काल्पनिक कथांचा जो दोषारोप लावतात त्याबद्दल ते स्वतः दोषी बनतात. येशूच्या जीवनाचे काही भाग जे त्यांना स्वीकारावेसे वाटतात ते स्वीकारतात, बाकीचा झिडकारतात आणि स्वतःच्या काही माहितीची त्यात भर घालतात. वास्तविक पाहता, ते ज्याचा शोध घेत असल्याचा दावा करतात तो त्यांचा भटकंती ऋषी किंवा सामाजिक क्रांतिकारक हा इतिहासातील येशू नाही; तर तो गर्विष्ठ विद्वत्तापूर्ण कल्पनांचा केवळ कल्पित व्यक्‍ती आहे.

खऱ्‍या येशूला शोधणे

सत्य आणि धार्मिकतेसाठी प्रांजळपणे भुकेले असलेल्यांची अंतःकरणे जागृत करण्याचा येशूने प्रयत्न केला. (मत्तय ५:३, ६; १३:१०-१५) असे लोक येशूच्या या आमंत्रणास प्रतिसाद देतात: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”—मत्तय ११:२८-३०.

खरा येशू आधुनिक विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये आढळणार नाही; किंवा मानव-निर्मित परंपरेचे माहेरघर असलेल्या ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसमध्येही आढळणार नाही. ऐतिहासिक येशू तुम्हाला तुमच्या बायबलमध्येच आढळेल. तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी शिकण्यास आवडेल का? यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करण्यास आवडेल.

[तळटीपा]

a अधिक माहितीसाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), पुस्तकाचा ५ वा अध्याय, पृष्ठे ५५-७० पाहा.

b बायबलमध्ये अंतर्याम, केव्हा केव्हा एखाद्याच्या खोल विचारांचे व भावनांचे प्रतिनिधीत्व करते.

[६ पानांवरील चौकट]

समीक्षेची शतके

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची समीक्षा, २०० पेक्षा अधिक वर्षांआधी जेव्हा जर्मन तत्त्ववेत्ता हर्मन सॅम्युएल रायमरस (१६९४-१७६८) यांनी, “प्रेषितांनी त्यांच्या लिखाणांद्वारे दिलेली शिकवण आणि येशूने स्वतःच्या जीवनकालादरम्यान जे घोषित केले व शिकवले यामध्ये पूर्णपणे फरक करणे आपल्याला उचित ठरते,” असे प्रतिपादले तेव्हा मूळ धरू लागली. रायमरस पासून आजपर्यंत अनेक विद्वानांना असाच दृष्टिकोन बाळगण्यास शिकवले आहे.

खरोखरचा येशू (इंग्रजी) नावाचे एक पुस्तक अशी नोंद करते, की गत काळातील अनेक समीक्षक स्वतःला धर्मत्यागी समजत नव्हते. उलट, “त्यांना स्वतःबद्दल ते, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या बेड्यांतून मुक्‍त झाल्याबद्दल अधिक प्रामाणिक ख्रिस्ती असल्यासारखे वाटले.” उच्च समीक्षा “ख्रिस्ती विश्‍वासाचे शुद्ध रूप” आहे असे त्यांना वाटले.

ख्रिस्ती धर्मजगत मानव-निर्मित परंपरेचे माहेरघर बनले आहे ही दुःखद वास्तविकता आहे. अमर जीव, त्रैक्य आणि अग्निमय नरक यांसारखे सिद्धान्त, बायबलच्या शिकवणींच्या अगदी विरोधात असलेल्या शिकवणींपैकी काही शिकवणी आहेत. पण, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे लेखक सत्याच्या या भ्रष्टतेला जबाबदार नव्हते. उलटपक्षी, स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्‍यांमध्ये धर्मत्यागाने आपले ‘कार्य कधीच चालू केले’ असे जेव्हा पौलाने लिहिले तेव्हा या लेखकांनी पहिल्या शतकाच्या मध्यात खोट्या शिकवणींच्या पहिल्या खुणा दिसल्या तेव्हा त्यांचा प्रतिकार केला. (२ थेस्सलनीकाकर २:३, ७) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत लिहिलेले सर्व काही ऐतिहासिक व सिद्धान्तिक सत्याचा अहवाल आहे याची आपण खात्री बाळगू शकतो.

[७ पानांवरील चौकट]

शुभवर्तमान केव्हा लिहिण्यात आले?

शुभवर्तमानांत वर्णिलेल्या घटना, त्या घडल्यानंतर कैक वर्षांनी शुभवर्तमानात लिहिण्यात आलेल्या असल्यामुळे त्यात चुका असणे जवळजवळ निश्‍चितच आहे, असा नव्या कराराचे अनेक समीक्षक आग्रह करतात.

परंतु पुरावे, मत्तय, मार्क आणि लूकच्या लिखाणांची आधीची तारीख सुचवतात. मत्तयाच्या काही हस्तलिखित प्रतींमधील पादांक मूळ लिखाण सा. यु. ४१ मध्ये झाल्याचे सूचित करतात. लूक कदाचित सा. यु. ५६ व ५८ च्या दरम्यान लिहिण्यात आले होते कारण प्रेषितांची कृत्ये (सा. यु. ६१ पर्यंत बहुधा पूर्ण झाले असावे), हे पुस्तक सूचित करते, की लेखक लूकने आपला ‘पहिला अहवाल,’ शुभवर्तमान आधीच संकलित केला होता. (प्रेषितांची कृत्ये १:१) मार्कचे शुभवर्तमान, प्रेषित पौलाच्या पहिल्या अथवा दुसऱ्‍या तुरुंगवासात रोममध्ये—कदाचित सा. यु. ६० व ६५ च्या दरम्यान रचण्यात आले होते असे मानले जाते.

प्राध्यापक क्रॅग एल. ब्लॉम्बर्ग शुभवर्तमानांच्या या प्रारंभीच्या तारखेशी सहमत आहेत. त्यांनी अशी नोंद केली की, पहिल्या शतकाच्या शेवटी रचलेले योहानाचे शुभवर्तमान यात समाविष्ट केल्यावर सुद्धा “आपण अनेक प्राचीन चरित्रांच्या तुलनेत मूळ घटनांच्या खूप जवळ आहोत. उदाहरणार्थ, ॲलेक्झॅन्डर द ग्रेटचे दोन प्राचीन चरित्रक अरेन व प्लुटार्च यांनी, ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये झालेल्या ॲलेक्झॅन्डरचा मृत्यू होऊन चारशे वर्षे लोटल्यानंतर लिहिले, तरीसुद्धा इतिहासकार सामान्यपणे त्यांना भरवसालायक समजतात. जसजसा समय गेला तसतसे ॲलेक्झॅन्डरच्या जीवनाविषयीच्या कल्पित कथा निर्माण झाल्या, पण त्यातील बहुतेक कथा या दोन लेखकांच्या कैक शतकां नंतर निर्माण झाल्या.” निश्‍चितच, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील ऐतिहासिक भाग कमीत कमी लौकिक इतिहासाएवढे श्रेय मिळण्याच्या पात्रतेचे आहेत.

[८ पानांवरील चित्रं]

येणाऱ्‍या पार्थिव परादीसमध्ये सर्वत्र आनंदीआनंद असेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा