वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१५ पृ. ३-४
  • शुभवर्तमानाविषयी विद्वानांचे मत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुभवर्तमानाविषयी विद्वानांचे मत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूबद्दलचा “विद्वत्तापूर्ण” दृष्टिकोन
  • विद्येपेक्षा अधिक
  • येशूची जीवनकथा—वादाच्या भोवऱ्‍यात!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • खरा येशू
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • येशूबद्दलचे सत्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • येशूची जीवनकथा—खरी आहे की खोटी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१५ पृ. ३-४

शुभवर्तमानाविषयी विद्वानांचे मत

“लोक मला कोण म्हणून म्हणतात?” (लूक ९:१८) सुमारे दोन सहस्त्र वर्षांपूर्वी येशूने हे आपल्या शिष्यांना विचारले. हा प्रश्‍न तेव्हा वादग्रस्त होता. असे दिसते की आजही तो जास्त प्रमाणात वादग्रस्त आहे, विशेषकरून येशूवर केंद्रित असल्याचे समजले जात असलेल्या नाताळाच्या या हंगामात. मानवजातीला सोडवण्याकरता येशूला स्वर्गातून पाठवण्यात आले होते असा अनेक जण विश्‍वास बाळगतात. तुमचाही हाच विश्‍वास आहे का?

काही विद्वान दुसरे मत मांडतात. “आपण देवाचा पुत्र आहोत व आपल्याला जगाच्या पापाकरता मरावयाचे आहे अशी शिकवण देणारा येशू ऐतिहासिकरीत्या सत्य नाही,” असा दावा धर्म आणि संस्कृतीचे विद्वान मार्कस जे. बोर्ज करतात.

इतर विद्वान दावा करतात, की खरोखरचा येशू बायबलमध्ये आपण ज्याच्याविषयी वाचतो त्याच्यापासून वेगळा होता. काहींच्या मते, सर्व शुभवर्तमाने येशूच्या मृत्यूच्या चार किंवा त्याहूनही अधिक दशकांनंतर लिहिण्यात आली व तोपर्यंत येशूचे खरे स्वत्व प्रगत करण्यात आले होते. प्रश्‍न शुभवर्तमानाच्या लेखकांच्या स्मृतीचा नव्हे तर त्यांचा अर्थ सांगणे हा होता असे विद्वान ठामपणे म्हणतात. येशूच्या मृत्यूनंतर त्याचे शिष्य त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागले—देवाचा पुत्र, तारणारा व मशिहा या नात्याने त्याला ते पाहू लागले. काहींनी तर बिनदिक्कत असा दावा केला, की येशू केवळ एक भटकंती करणारा ऋषी, सामाजिक क्रांतिकारी होता. हे शुभवर्तमानातील सत्य आहे असे विद्वान म्हणतात.

येशूबद्दलचा “विद्वत्तापूर्ण” दृष्टिकोन

आपल्या “विद्वत्तापूर्ण” दृष्टिकोनाच्या बचावात टीकाकार, येशूबद्दल अद्‌भुत वाटणारी कोणतीही गोष्ट फेटाळून लावण्यात उत्सुक आहेत असे दिसते. उदाहरणार्थ, काही जण म्हणतात, की कुमारिकेच्या पोटी जन्म घेणे येशूची अनौरसता लपवण्यासाठी होती. इतर जण, जेरुसलेमच्या नाशाविषयी येशूने केलेल्या भविष्यवाण्या नाकारतात, त्या भविष्यवाण्यांची “पूर्णता” झाल्यावर त्यांची नोंद शुभवर्तमानांमध्ये करण्यात आली असा ते हेका धरतात. काही तर असेही म्हणतात, की येशूचे लोकांना बरे करणे पूर्णपणे मनोदैहिक होते. तुम्हाला हे पवित्रे निकोपी किंवा अयोग्य असल्याचे दिसून येतात का?

येशूच्या शिष्यांनी आपली चळवळ ढासळू नये म्हणून बनावट पुनरुत्थान तयार केले, असाही दावा विशिष्ट विद्वान करतात. नाही तरी, येशूचे शिष्य त्याच्याशिवाय शक्‍तिहीन होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या लिखाणांमध्ये आपल्या धन्याबद्दल लिहिले, असा तर्क विद्वान करतात. ते म्हणतात, की खरे पाहिल्यास ख्रिस्ताचे नव्हे तर ख्रिस्ती विश्‍वासाचे पुनरुत्थान झाले होते. हे जर विद्वत्तापूर्ण मोकळिकीप्रमाणे वाटते तर, येशूचा मुळात वध झालाच नाही असे वेदान्ती बार्बरा थिएरींगच्या म्हणण्याविषयी काय? तिच्या म्हणण्याप्रमाणे, येशू वधस्तंभावर खिळण्यापासून वाचला आणि त्याने दोन वेळा विवाह केले व त्याला तीन मुले झाली.

ही सर्व प्रतिपादने येशूला त्या खालच्या पातळीवर आणतात ज्यावर अनेक विद्वान त्याचा स्वीकार करतील: “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास” आलेला देवाचा पुत्र म्हणून त्याचा स्वीकार करण्याऐवजी—त्याला एक बुद्धिमान मनुष्य, सीमांतिक यहुदी, सामाजिक सुधारक म्हणून स्वीकारतील.—मत्तय २०:२८.

वर्षाच्या या समयात तुम्ही कदाचित शुभवर्तमानातील काही भाग जसे की गव्हान्यात येशूच्या जन्माविषयी वाचले असावेत. किंवा तुम्ही अशा प्रकारचे अहवाल चर्चमध्ये ऐकले असावेत. हे शुभवर्तमान अहवाल मौल्यवान व विश्‍वास ठेवण्याजोगे आहेत असा तुम्ही त्यांचा स्वीकार केलात का? मग या धक्कादायक प्रसंगाची नोंद घ्या. एका तथाकथित येशू चर्चासत्रात येशूच्या शब्दांची विश्‍वसनीयता ठरवण्यासाठी १९८५ पासून वर्षातून दोन वेळा विद्वानांचा एक गट एकत्र होत आला आहे. बायबलने त्याला जे श्रेय दिले आहे त्याप्रमाणे येशू खरोखरच बोलला का? चर्चासत्राच्या सदस्यांनी प्रत्येक बोलण्यावर रंगीत मण्यांनुसार आपले मत दिले. लाल मण्याचा अर्थ, ते वाक्य नक्कीच येशूचे होते; गुलाबी मण्याचा अर्थ येशूने कदाचित तसे म्हटले असावे; राखट रंगाचा मणी शंकेला सूचित करत होता; आणि काळा मणी म्हणजे पूर्णपणे खोटे असण्याला सूचित करत होता.

तुम्ही कदाचित हे माहीत झाल्यावर अस्वस्थ व्हाल, की त्या येशू चर्चासत्राने, येशूची ८२ टक्के वाक्ये कदाचित त्याने उद्‌गारली नाहीत असे घोषित केले. मार्कच्या शुभवर्तमानातील केवळ एक अवतरण भरवसालायक मानण्यात आले. लूकच्या शुभवर्तमानाबद्दल असे म्हटले गेले, की ते इथूनतिथून प्रचारानेच भरलेले असल्यामुळे “त्यामागील मूळ ठरवता येत नाही.” योहानाच्या शुभवर्तमानातील केवळ तीन ओळींना खोटेपणाला सूचित करणाऱ्‍या काळ्या मण्याचे मत मिळाले व बाकी उरलेल्यांना शंकेचा राखट मणी.

विद्येपेक्षा अधिक

तुम्ही विद्वानांशी सहमत आहात का? बायबलमध्ये आढळणाऱ्‍या येशूच्या माहितीपेक्षा अधिक अचूक चित्र ते आपल्याला सादर करतात का? ही प्रश्‍ने केवळ विद्वत्तापूर्ण वादविषयाची नाहीत. वर्षाच्या या समयात तुम्हाला याची आठवण करून देण्यात आली असावी, की बायबलनुसार, देवाने येशूला पाठवले “अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

येशू जर भटकंती करणारा ऋषी होता ज्याच्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे तर मग, त्याच्यावर ‘विश्‍वास ठेवणे’ निरर्थक असेल. दुसऱ्‍या बाजूला पाहता, बायबलने येशूचे जे चित्र रेखाटले आहे ते सत्य आहे तर, आपले चिरकालिक तारण यात गोवलेले आहे. यास्तव, बायबलमध्ये येशूबद्दलचे सत्य आहे का? ही गोष्ट आपण जाणण्याची गरज आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा