वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१ पृ. ३-४
  • नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • लोकांना शिक्षा देण्यासाठी देव नैसर्गिक संकटांचा वापर करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • शिक्षा देतो आहे का देव आपल्याला?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • महाकठीण प्रश्‍न
    सावध राहा!—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१ पृ. ३-४

नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा

ॲक्रा, घाना, जुलै ४, १९९५: सुमारे ६० वर्षांमध्ये झालेल्या सर्वात जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तेथे पूर आला. जवळजवळ २,००,००० लोकांनी आपले होते नव्हते ते सर्व गमावले, ५,००,००० लोकांनी आपली घरे गमावली आणि २२ लोकांनी आपले जीव गमावले.

सॅन ॲन्जेलो, टेक्सास, संयुक्‍त संस्थाने, मे २८, १९९५: ९०,००० रहिवासी असलेल्या या शहराची, वादळ व गारांनी नासधूस केली, अंदाजे १२ कोटी (यु.एस.) डॉलरची हानी झाली.

कोबे, जपान, जानेवारी १७, १९९५: केवळ २० सेकंदाच्या एका भूकंपाने हजारोंना मृत्यूच्या खाईत ढकलले, हजारोंना जखमी केले व हजारो बेघर झाले.

आपण अशा एका युगात जगत आहोत ज्याला कदाचित आपत्तींचे युग असे संबोधले जाऊ शकते. संयुक्‍त राष्ट्राकडून आलेल्या एका अहवालानुसार, १९६३-९२ पर्यंतच्या ३० वर्षांच्या कालमर्यादेत, ठार झालेल्या, जखमी झालेल्या अथवा आपत्तींमुळे विस्थापित झालेल्या लोकांची संख्या प्रत्येक वर्षी सरासरी ६ टक्क्यांनी वाढली आहे. या निरुत्साहित परिस्थितीमुळे युएनने १९९० च्या दशकाला, “नैसर्गिक आपत्ती कपाताचे आंतरराष्ट्रीय दशक” म्हणून संबोधले.

अर्थात, एखादी नैसर्गिक शक्‍ती—जसे की एखादे वादळ, ज्वालामुखी उद्रेक किंवा एखादा भूकंप—नेहमीच आपत्ती आणत नसते. दर वर्षी शेकडो घटना घडतात ज्यामध्ये कोणतीच जीवितहानी होत नाही. पण जेव्हा भारी जीवितहानी व मालमत्तेची हानी होते तेव्हा त्याला आपत्ती असे योग्यपणे म्हटले जाते.

नैसर्गिक आपत्तींमधील वाढ अपरिहार्य भासते. नैसर्गिक आपत्ती—ईश्‍वराची करणी की मानवाची करणी? (इंग्रजी), हे पुस्तक अशी नोंद करते: “लोक त्यांच्या पर्यावरणात असे बदल करतात जे बदल काही आपत्तींना अधिक प्रवृत्त करतात आणि असे वागतात की या आपत्तींबद्दल स्वतःला अधिकच भेद्य बनवतात.” ते पुस्तक एक गृहीतकृत्यात्मक उदाहरण देते: “दरीच्या घळणीवर, माती आणि विटांनी बांधलेल्या झोपडपट्टीत भूकंपाचा सौम्य धक्का, प्राणहानी व पीडा यांच्या रुपात आपत्ती ठरू शकतो. पण ही आपत्ती भूमिच्या कंपामुळे आली की अशा घातक जमिनीवर, अशा घातक घरात लोक राहतात या वस्तुस्थितीमुळे आली?”

बायबलच्या विद्यार्थ्यांना, नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण का वाढत चालले आहे याचे आणखी एक कारण माहीत असल्यामुळे त्याचे इतके आश्‍चर्य वाटत नाही. जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी, ‘युगाच्या समाप्तीला’ चिन्हित करणाऱ्‍या काही गोष्टींपैकी “जागोजागी दुष्काळ व भूमिकंप” होतील असे येशू ख्रिस्ताने भाकीत केले होते. (मत्तय २४:३, ६-८) बायबलने असेही भाकीत केले, की “शेवटल्या काळी” लोक स्वार्थी, धनलोभी, ममताहीन, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी होतील.a (२ तीमथ्य ३:१-५) या प्रवृत्ती मानवांना नैसर्गिक शक्‍तींबद्दल अधिक भेद्य बनवतात व बहुतेकवेळा मानव आपल्या पर्यावरणाविरुद्ध कार्य करतो. मानव-निर्मित आपत्तीसुद्धा, अनेकांना जेथे जीवन कंठावे लागते अशा प्रेमहीन समाजातून निघालेला एक फाटा असू शकतो.

आपला ग्रह जसजसा लोकसंख्येने गजबजून जातो, मानवी वर्तणूक जसजसे लोकांना धोक्यात घालते व पृथ्वीच्या साधनसंपत्तीचे वाढत्याप्रमाणात जसजसे गैरव्यवस्थापन होते तसतसे आपत्ती मानवांवर पीडा आणत राहील. पुढील लेख दाखवील त्याप्रमाणे साहाय्य पुरवणे एक आव्हान ठरू शकते.

[तळटीपा]

a शेवटल्या काळाच्या चिन्हाबद्दल आणखी माहितीसाठी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकाची पृष्ठे ९८-१०७ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा