वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • मर्यादेवरील खुणेकडे धावा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “मागील गोष्टींकडे” पाहत राहू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “आपण धैर्य सोडत नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • राज्याचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

मी “मागील गोष्टींना विसरत आहे व पुढील गोष्टींकडे जात आहे,” असे प्रेषित पौलाने लिहिले तेव्हा त्याचा कोणता अर्थ होता? (फिलिप्पैकर ३:१३, NW) मनुष्य एखादी गोष्ट हेतुतः विसरू शकतो का?

नाही, बहुतेक वेळा आपल्या मनातील आठवणींना आपण हेतुपुरस्सर काढू शकत नाही. खरे तर, लक्षात ठेवावयाच्या गोष्टींचे नेमके आपल्याला विस्मरण होते आणि ज्या गोष्टी विसरण्यास हव्यात त्या मात्र आठवणीत राहतात. तर मग, पौलाने फिलिप्पैकर ३:१३ मधील शब्द लिहिले तेव्हा त्याचा काय अर्थ होता? आपल्याला हे समजण्यास संदर्भ मदत करतो.

फिलिप्पैकर अध्याय ३ मध्ये, “देहावर भरवसा ठेवण्याकरिता” असणाऱ्‍या स्वतःच्या “आधारांचे” पौल वर्णन करतो. स्वतःची शुद्ध यहुदी पार्श्‍वभूमी आणि नियमशास्त्राकरिता असणाऱ्‍या स्वतःच्या आवेशाविषयी तो बोलतो—अशा गोष्टी ज्यामुळे त्याला इस्राएल राष्ट्रामध्ये अनेक लाभ मिळू शकत होते. (फिलिप्पैकर ३:४-६, NW; प्रेषितांची कृत्ये २२:३-५) हे लाभ जणू तोटेच आहेत असे समजून त्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली. का? कारण त्याला यापेक्षाही अधिक चांगले काही गवसले होते—‘ख्रिस्त येशूच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व’.—फिलिप्पैकर ३:७, ८.

जगामध्ये एखादे स्थान प्राप्त करावे हे पौलाचे प्रमुख ध्येय नव्हते, तर “मृतांमधून [“प्रारंभिक,” NW] पुनरुत्थान मिळवावे” हे होते. (फिलिप्पैकर ३:११, १२) यास्तव तो लिहितो: “मागील गोष्टींना विसरत आहे व पुढील गोष्टींकडे जात आहे, ख्रिस्त येशूत जे देवाचे वरील बोलावणे त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत आहे.” (फिलिप्पैकर ३:१३, १४, NW) मी “मागील गोष्टींना विसरत आहे,” असे पौलाने म्हटले तेव्हा त्याने मनातून “मागील गोष्टींना” काढून टाकले होते, असा त्याचा अर्थ नव्हता. त्या गोष्टींची त्याला अद्यापही स्पष्टपणे आठवण येत होती कारण त्याने त्याच गोष्टींची संपूर्ण यादी दिली होती. याशिवाय पौल मूळ ग्रीक भाषेत, क्रिया चालू आहे, अद्याप पूर्ण झालेली नाही, हे दाखविणाऱ्‍या क्रियापदाच्या स्वरूपाचा प्रयोग करतो. तो म्हणतो “विसरत आहे,” “विसरलेलो आहे” असे तो म्हणत नाही.

“विसरणे” असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाचे (इपिलॅनथानओमाय) अनेक अर्थ होतात; त्यांपैकीचा एक अर्थ म्हणजे “एखाद्या गोष्टीविषयी चिंता नसणे” किंवा “दुर्लक्ष”. एक्झेजेटिकल डिक्शनरी वॉफ द न्यू टेस्टामेंट (हॉर्स्ट बाल्झ आणि जर्हार्ड श्‍निडर यांद्वारे संपादित) नुसार फिलिप्पैकर ३:१३, NW मधील “विसरत आहे” याचा नेमका हाच अर्थ होतो. पौल, त्याग केलेल्या गोष्टींवर सतत विचार करत बसला नाही. त्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाहीत, अशा दृष्टीने त्यांकडे पाहण्यास तो शिकला. स्वर्गीय आशेसोबत तुलना करता या गोष्टी ‘केरकचऱ्‍यासारख्या’ होत्या.—फिलिप्पैकर ३:८.

पौलाचे शब्द आज कशा प्रकारे लागू होऊ शकतात? पौलाप्रमाणे एखाद्या ख्रिश्‍चनाने देवाची सेवा करण्यासाठी कदाचित अनेक गोष्टींचा त्याग केला असेल. पूर्ण-वेळेच्या सेवेसाठी कदाचित त्याने चांगले पैसे मिळवून देणाऱ्‍या करियरचा त्याग केला असेल. किंवा तो कदाचित श्रीमंत कुटुंबातील असेल आणि कुटुंबातील सदस्यांना सत्य पसंत नसल्यामुळे त्यांनी त्याचा वारसा काढून घेतला असेल. अशा प्रकारचे त्याग वाखाणण्याजोगे आहेत, परंतु त्यांवरच विचार करत बसावे अशा या गोष्टी नाहीत. ख्रिस्ती मनुष्य आपल्यासाठी असलेल्या वैभवी भविष्याचा विचार करता “मागील गोष्टींना” ‘विसरतो’ म्हणजेच त्यांची चिंता करीत नाही.—लूक ९:६२.

पौलाच्या शब्दांमागील तत्त्व कदाचित इतर मार्गाने देखील लागू होऊ शकते. एखाद्या ख्रिश्‍चनाने देवाबद्दल जाणून घेण्याआधी दुर्वर्तन केले असल्यास काय? (कलस्सैकर ३:५-७) किंवा असे समजा, की ख्रिस्ती झाल्यानंतर त्याने एखादे गंभीर पातक केले आणि मंडळीकडून त्याला शासन मिळाले. (२ करिंथकर ७:८-१३; याकोब ५:१५-२०) तो जर खरोखरच पश्‍चात्तापी आहे आणि त्याने आपल्या मार्गांत बदल केला आहे, तर मग त्याला ‘स्वच्छ धुण्यात’ आले आहे. (१ करिंथकर ६:९-११) जे काही घडले ते गतकाळात जमा झाले. त्याने जे काही केले त्यास तो कदाचित अक्षरशः विसरणार नाही—परंतु पापाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून अशा अनुभवातून शिकणे त्याच्याकरिता सूज्ञतेचे ठरेल. तरी देखील, स्वतःस दोष न देण्याच्या अर्थाने तो संबंधित बाब ‘विसरतो.’ (पडताळा यशया ६५:१७.) येशूच्या समर्पणाच्या आधारावर त्याची क्षमा झाल्यामुळे तो आपला भूतकाळ मागे ठेवण्याचा प्रयत्न करतो.

फिलिप्पैकर ३:१३, १४ (NW) येथे पौल स्वतःचे वर्णन शर्यतीत असणाऱ्‍या धावपटूप्रमाणे करतो जो आपले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी “पुढे धावत आहे.” धावपटू पुढे पाहतो, मागे नाही. त्याचप्रमाणे ख्रिश्‍चनाने मागे होऊन गेलेल्या गोष्टींऐवजी भविष्यातील आशीर्वादांकडे आपली दृष्टी लावण्यास हवी. पौल असेही म्हणतो: “तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेविली, तरी देव तेहि तुम्हाला प्रगट करील.” (फिलिप्पैकर ३:१५) यास्तव, हा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा. बायबलमध्ये आढळणाऱ्‍या देवाच्या विचारांना आपल्या अंतःकरणात भरा. (फिलिप्पैकर ४:६-९) यहोवाचे तुमच्यावर असणारे प्रेम आणि त्यामुळे तुम्ही जे आशीर्वाद उपभोगता त्यांवर मनन करा. (१ योहान ४:९, १०, १७-१९) मग, यहोवा आपल्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला मदत करील जेणेकरून गतकाळातील त्यागलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही चिंताग्रस्त होऊ नये. उलटपक्षी, पौलाप्रमाणे तुम्ही पुढील वैभवी भवितव्याकडे दृष्टी लावाल.—फिलिप्पैकर ३:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा