१९९६ “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” अधिवेशन
प्राचीन काळी यहोवाचे लोक दर वर्षी प्रमुख तीन सण साजरे करीत होते. त्याचप्रमाणे आजही, आधुनिक दिवसांतील यहोवाचे नाव धारण करणारे लोक प्रत्येक वर्षी उत्साहाच्या प्रसंगांकरिता तीन वेळा एकत्र येतात. एक दिवसीय खास संमेलन दिवस, दोन दिवसांचे विभागीय संमेलन आणि तीन किंवा चार दिवसांच्या प्रांतीय अधिवेशनासाठी एकत्र आल्यामुळे त्यांना आनंद होतो. “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” हे या वर्षीच्या प्रांतीय अधिवेशनाचे शीर्षक आहे.
हे शीर्षक किती समर्पक आहे! आपला देव यहोवा, “शांतीचा देव,” होय, “शांतिदाता देव” आहे. आपला गुरू, येशू ख्रिस्त “शांतीचा अधिपति” आहे आणि यहोवाचे सेवक जो संदेश देतात तो ईश्वरी शांतीचा संदेश आहे. (रोमकर १५:३३; फिलिप्पैकर ४:९; यशया ९:६; नहूम १:१५) उत्तम अधिवेशन कार्यक्रमाची योजना करण्यात आली आहे जेणेकरून ईश्वरी शांतीचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास सर्वांना मदत होईल.
या वर्षी केवळ भारतात १५ अधिवेशने पार पडतील. त्याचप्रमाणे एखादे अधिवेशन तुमच्या आसपास देखील होईल. ते नक्की केव्हा आणि कोठे होईल याची चौकशी तुमच्या परिसरात असणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांकडे करून त्यास हजर राहण्यासाठी योजना का करू नयेत? खरी, चिरस्थायी शांती प्राप्त करण्यात आस्था बाळगून असणाऱ्या सर्वांचे सस्नेह स्वागत केले जाईल.