वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ७/१ पृ. ३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • आज देवाच्या लोकांचं नेतृत्व कोण करत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आज नियमन मंडळ कशा प्रकारे कार्य करते?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • आजच्या नियमन मंडळाशी सहकार्य करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ७/१ पृ. ३१

वाचकांचे प्रश्‍न

प्रारंभिक नियमन मंडळाचे सदस्य सर्वच यहुदी असल्यामुळे सारखीच वांशिक आणि राष्ट्रीय पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांनाच निवडून घेण्याद्वारे देव पक्षपात करत होता का?

नाही, मुळीच नाही. येशूने सुरवातीला जितक्या लोकांना त्याचे शिष्य होण्यासाठी बोलावले ते सर्व यहुदी होते. त्यानंतर, सा. यु. ३३ पेन्टेकॉस्ट रोजी यहुदी आणि यहुदीयमतानुसारी पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झालेले व अशा प्रकारे ख्रिस्तासोबत स्वर्गामध्ये राज्य करण्याच्या पात्रतेचे ठरणारे प्रथम असे होते. त्यानंतरच, शोमरोनी आणि सुंता न झालेले विदेशी मतांतर झालेल्यांचा समावेश झाला. यास्तव, प्रेषितांची कृत्ये १५:२ मध्ये सांगितल्याप्रमाणे त्या काळातील नियमन मंडळ “यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग,” अशा यहुद्यांचे मिळून बनलेले होते हे समजण्याजोगे आहे. या पुरुषांना शास्त्रवचनांचे सखोल ज्ञान होते आणि खऱ्‍या उपासनेत अनेक वर्षांचा अनुभव होता. तसेच प्रौढ ख्रिस्ती वडील होण्यासाठी त्यांना पुष्कळ वेळ मिळाला होता.—पडताळा रोमकर ३:१, २.

प्रेषितांच्या कृत्यांच्या १५ व्या अध्यायातील नियमन मंडळाच्या सभेची फेरमोजणी करीपर्यंत अनेक विदेशी लोक ख्रिस्ती बनले होते. यामध्ये आफ्रिकन, युरोपियन आणि इतर प्रदेशांतील लोकांचा समावेश होता. तरीही, ख्रिस्ती धर्म गैर-यहुद्यांना आकर्षक वाटावा म्हणून यापैकीच्या कोणत्याही विदेश्‍यांची नियमन मंडळात भरती केल्याचा अहवाल नाही. नव्याने मतांतर झालेल्या या विदेशी ख्रिश्‍चनांचा दर्जा ‘देवाच्या इस्राएलच्या’ सदस्यांसारखाच असला तरीही, त्यांनी तेव्हा नियमन मंडळाचे भाग असलेल्या प्रेषितांसारख्या यहुदी ख्रिश्‍चनांच्या प्रौढत्वाचा आणि अधिक अनुभवाचा आदर केला असावा. (गलतीकर ६:१६) प्रेषितांची कृत्ये १:२१, २२ मध्ये या अनुभवाला किती सन्मान देण्यात आला आहे ते पहा.—इब्रीयांस २:३; २ पेत्र १:१८; १ योहान १:१-३.

अनेक शतकांपर्यंत देवाने इस्राएल राष्ट्रासोबत खास मार्गाने व्यवहार केला होता आणि या राष्ट्रातूनच येशूने त्याचे प्रेषित निवडले होते. आताच्या दक्षिण अमेरिकेतून किंवा आफ्रिकेतून किंवा दूरच्या पौर्वात्य देशातून एकही प्रेषित आले नाहीत यामध्ये काहीही चूक नव्हती किंवा अन्याय नव्हता. कालांतराने त्या ठिकाणातील पुरुष आणि स्त्रियांना, पृथ्वीवर प्रेषित असणे, पहिल्या शतकाच्या नियमन मंडळाचे सदस्य असणे किंवा आज देवाच्या लोकांमध्ये कोणतीही इतर नेमणूक असण्यापेक्षा अधिक पटीने महान सुहक्क प्राप्त करण्याच्या संधी मिळतील.—गलतीकर ३:२७-२९.

“देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे,” असे म्हणण्यासाठी एका प्रेषिताला प्रेरणा झाली. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) होय, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे फायदे, निःपक्षपातीपणे सर्वांना उपलब्ध आहेत. आणि स्वर्गीय राज्यात तसेच पृथ्वीवर राहणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायात प्रत्येक वंश, भाषा आणि राष्ट्रातील लोकांचा समावेश असेल.

अनेक मानव वंश, भाषा किंवा राष्ट्रीय पार्श्‍वभूमीबद्दल संवेदनाक्षम होतात. त्याचे उदाहरण आपल्याला प्रेषितांची कृत्ये ६:१ मध्ये वाचावयास मिळते, जेथे ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये व इब्री भाषा बोलणाऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये कुरकूर चालल्याच्या वादविषयाबद्दल सांगितले आहे. कदाचित भाषा, वंश, जातीय पार्श्‍वभूमी किंवा लिंग याविषयीच्या अतिसंवेदनाक्षम वातावरणात आपले संगोपन झाले असेल किंवा आपण ती मनोवृत्ती अंगीकारली असेल. त्याच वास्तविक शक्यतेला लक्षात ठेवून, सर्व मानव, मग आपले बाह्‍य स्वरुप कोणतेही असले तरी आपण देवासमोर सारखेच आहोत या देवाच्या दृष्टिकोनानुसार आपल्या भावना किंवा प्रतिक्रियांना वळण देण्याचा दृढनिश्‍चयी प्रयत्न करण्यास आपल्या परीने झटत असतात. देवाने वडिलांच्या व सेवा सेवकांच्या योग्यतांची नोंद केली तेव्हा त्याने वंश किंवा राष्ट्रीय पार्श्‍वभूमीचा उल्लेख केला नाही. त्याने सेवा करू शकणाऱ्‍यांच्या आध्यात्मिक योग्यतांवर लक्ष केंद्रित केले. पहिल्या शतकातील नियमन मंडळाप्रमाणे आजच्या स्थानिक वडिलांच्या, प्रवासी पर्यवेक्षकांच्या आणि शाखा मंडळाच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा