आप्तेष्टांना साक्ष दिल्याने चांगले परिणाम घडून येतात
तायवानमध्ये असलेल्या तायनान येथे, एक तरुण गृहिणी बायबलचा अभ्यास करू लागली. ती एका मोठ्या कुटुंबात राहते, ज्यातील अनेक जण प्रेस्बिटेरियन चर्चमधील प्रमुख होते. तिचे चर्च ‘इतर धर्मांवर हल्ला करण्याबद्दल’ अनेकदा साक्षीदारांची टीका करी; यास्तव तिने असे करण्याचे काळजीपूर्वक टाळले व त्याऐवजी ख्रिस्ती गुणांचे प्रदर्शन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. तिला सभांना जाण्यासाठी मोटर सायकलने सोळा किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे, पण उपस्थितीच्या बाबतीत मात्र ती नियमित होती. लवकरच, तिच्या व्यक्तिमत्त्वात ती घडवून आणत असलेले बदल कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येऊ लागले. याच्या परिणामास्तव व ती चातुर्याने देत असलेल्या साक्षीमुळे, तिची वहिनी अभ्यास करू लागली. नंतर तिच्या स्वतःच्या पतीने ती जे काही शिकत होती त्याचे परीक्षण करण्यास होकार दिला. पुढे त्याचा भाऊ व आणखी एक जवळचा नातलग अभ्यास करू लागले. यानंतर, कुटुंबातील विविध सदस्य जे शिकत होते त्याबद्दल तिच्या सासूने आस्था प्रकट केली. त्या तरुण स्त्रीने मग ३२२ किलोमीटर अंतरावर राहत असलेल्या तिच्या स्वतःच्या पालकांना साक्ष दिली. त्यांनी अभ्यास करणे सुरू केले. ती तरुण स्त्री, तिचे पती व दोन आप्त आता बाप्तिस्मा घेतलेले आहेत, इतर अनेक नातेवाईक सत्य शिकण्यात चांगली प्रगती करत आहेत, व त्याच चर्चमधील दुसऱ्या एका दांपत्याने प्रचार कार्यात भाग घेता यावा म्हणून चर्चला नुकताच राजीनामा दिला आहे. मुखाने व उत्तम आचरणाने इतरांना सत्याची शिफारस करण्याबद्दल यहोवाकडून केवढा हा आशीर्वाद!