वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ६/१ पृ. ३-५
  • भ्रष्टाचाररहित जगाचे अभिवचन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भ्रष्टाचाररहित जगाचे अभिवचन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भ्रष्टाचाराचा तुमच्यावर प्रभाव पडतो
  • बायबल आपल्याला काय सांगते
  • लोकांमध्ये बदल होऊ शकतो
  • यहोवाचे अभिवचन
  • इतका भ्रष्टाचार का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आत्म्याच्या तलवारीने भ्रष्टाचाराशी लढणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • देवाचं राज्य—एक भ्रष्टाचारमुक्‍त सरकार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • सरकारी भ्रष्टाचाराचा फैलाव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ६/१ पृ. ३-५

भ्रष्टाचाररहित जगाचे अभिवचन

भ्रष्टाचार समाजाच्या प्रत्येक थरात पसरला आहे. मग ते सरकार, विज्ञान, क्रीडा, धर्म किंवा व्यापार असो, भ्रष्टाचार अनियंत्रित असल्याचे दिसून येते.

संपूर्ण जगभरात, लोकप्रवादाने भरलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसारमाध्यमात ठळकपणे येतात. लोकांच्या हितासाठी कार्य करू अशी शपथ घेणारे पुष्कळ लोक, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी लाच घेणारे व मूठ दाबणारे म्हणून उघडकीस येतात. तथाकथित पांढरपेशी लोकांकडून घडत असलेले गुन्हे बोकाळत आहेत. उच्च सामाजिक किंवा आर्थिक स्थान असलेले बहुतांश लोक, त्यांच्या नित्य उद्योगाच्या संबंधात गंभीर नैतिकतेचा व गुन्हेगारीचा भंग केल्याचे दोषी आहेत.

एक युरोपियन नियतकालिक वर्णन करते त्याप्रमाणे, “‘उच्च भ्रष्टाचार’ म्हणजे, मोठमोठी खरेदी व प्रकल्प मान्य करण्याआधी वरिष्ठ अधिकारी, सरकारी मंत्री आणि बहुधा राज्याचे प्रमुख यांना लाच देण्याची पद्धत याची वाढती चिंता आहे.” एका राज्यात, “दोन वर्षांची पोलीस चौकशी व जवळजवळ दररोजच्या अटकेच्या घटना यांनी कोडगेपणाने भ्रष्ट झालेल्या लोकांना त्यांच्या कृत्यांस प्रतिबंध घालता आला नाही,” असे ब्रिटिश नियतकालिक द इकॉनॉमिस्ट म्हणते.

सर्वत्र असलेल्या भ्रष्टाचारामुळे, आज अनेकांना वाटते, की भरवसा करण्यालायक कोणी नाही. ते बायबलच्या पुस्तकाचा लेखक दावीद, याच्या भावना ध्वनित करतात की, “ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत; एकूण एक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकहि नाही.”—स्तोत्र १४:३.

सर्वत्र असलेल्या भ्रष्टाचाराच्या वास्तविकतेला तुम्ही कसे तोंड देता? आज अनेक लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा केला तरी तो तुम्हाला इजा करील. ते कसे?

भ्रष्टाचाराचा तुमच्यावर प्रभाव पडतो

उच्च पातळीवरचा आणि अल्प प्रमाणातला असा दोन्हीकडील भ्रष्टाचार, राहणीमानाचा खर्च वाढवतो, उत्पादनाचा दर्जा कमी करतो व नोकऱ्‍यांच्या आणि पगाराच्या कमतरतेला कारणीभूत ठरतो. उदाहरणार्थ, असा अंदाज लावला जातो, की द्रव्यापहार आणि लबाडी यासारखे गुन्हे, घरफोडी, लुटमार आणि चोरी यांच्यापेक्षा दहा पटीने जास्त आहेत. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका (१९९२) म्हणतो, “अमेरिकेतील मोठमोठे व्यापार किंवा कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांची किंमत प्रती वर्षी २,००,००,००,००,००० डॉलरर्स असल्याचा अंदाज लावला जातो—संघटित गुन्हेगारीच्या किंमतीपेक्षा तीन पटीने अधिक.” हाच विश्‍वकोश म्हणतो, की अशा गुन्ह्यांचे परिणाम लगेचच ओळखता येत नसले तरी, “कामगार, ग्राहक आणि सभोवतालच्या परिस्थिती या सर्वांच्या संरक्षणावर त्यांचा खूप मोठा प्रभाव पडतो.”

भ्रष्टाचाराची कटू फळे आपल्याला राजा शलमोनाच्या शब्दांची आठवण करून देतात: “मग ह्‍या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलुमांचे मी फिरून निरीक्षण केले; तो पाहा, गांजलेल्यांचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही; त्यांजवर जुलूम करणाऱ्‍यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.”—उपदेशक ४:१.

तर मग, आपण स्वतःला भ्रष्टाचाराच्या स्वाधीन करावे का? तो अनिवार्य आहे का? भ्रष्टाचाररहित जग अशक्य स्वप्न आहे का? आनंदाची गोष्ट म्हणजे, नाही! बायबल आपल्याला शिकवते, की अन्याय आणि अधर्माचा लवकरच उच्छेद केला जाईल.

बायबल आपल्याला काय सांगते

एका शक्‍तिशाली देवदूताने देवाविरुद्ध बंड केले आणि पहिल्या मानवी दांपत्याला त्याच्याबरोबर सामील होण्यास प्रवृत्त केले, तेव्हापासून भ्रष्टाचाराची सुरवात झाली असे बायबल आपल्याला सांगते. (उत्पत्ती ३:१-६) त्यांच्या पापी मार्गाक्रमणातून काहीच चांगले निष्पन्‍न झाले नाही. उलट, आदाम आणि हव्वेने यहोवा देवाविरुद्ध पाप केल्यानंतरच्या दिवसापासूनच ते भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम सोसू लागले. त्यांच्या शरीरात हळूहळू निकृष्ट होण्याची प्रक्रिया चालू झाली जिने त्यांना अनिवार्य मृत्यूकडे निरवले. (उत्पत्ती ३:१६-१९) तेव्हापासून, इतिहास लाचलुचपत, लबाडी आणि ठकबाजीच्या उदाहरणांनी गच्च भरला आहे. तरीसुद्धा पुष्कळ अपराधी, कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत असे दिसते.

सर्वसामान्य गुन्हेगारांप्रमाणे नव्हे, तर भ्रष्ट कार्यकारी आणि राजकारणी लोक क्वचितच तुरूंगवास भोगतात किंवा हपापाने मिळवलेल्या पैशाची भरपाई करतात. लाचलुचपत, मूठ दाबणे आणि हिशेब चुकता करणे या गोष्टींच्या चोरट्या स्वरूपामुळे, उच्च प्रतीच्या भ्रष्टाचाराला उघड करणे बहुधा कठीण जाते. परंतु भ्रष्टाचार नसलेले जग अशक्य स्वप्न आहे असा याचा अर्थ होत नाही.

मानवाचा निर्माणकर्ता यहोवा देवाकडून भ्रष्टाचारापासून बचाव येणार आहे. ईश्‍वरी हस्तक्षेप एकमात्र उपाय आहे. का बरे? कारण मानवजातीचा अदृश्‍य शत्रू, दियाबल सैतान मानवजातीला ठकवतो. १ योहान ५:१९ मध्ये आपण वाचतो त्याप्रमाणे, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” दंडमुक्‍ततेने केलेला बराचसा भ्रष्टाचार का वाढत आहे याचे स्पष्टीकरण आणखी कोणती गोष्ट देऊ शकेल?

सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांवर कोणताही मानवी प्रयत्न वर्चस्व करू शकत नाही. आज्ञाधारक मानवजातीला ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्‍त मुक्‍ततेची’ हमी केवळ ईश्‍वरी हस्तक्षेप देऊ शकतो. (रोमकर ८:२१) मानवजातीला आणखी ठकवू नये म्हणून फार लवकर सैतानाला आळा घातला जाईल असे यहोवा अभिवचन देतो. (प्रकटीकरण २०:३) या वेळे पावतो, भ्रष्टाचारापासून मुक्‍त असलेल्या देवाच्या नव्या जगात राहण्याची आपली इच्छा आहे तर आपण या जगाच्या भ्रष्ट मार्गांना धिक्कारणे आवश्‍यक आहे.

लोकांमध्ये बदल होऊ शकतो

येशू ख्रिस्ताच्या दिवसांमध्ये, स्वतःच्या सामर्थ्याचा दुरूपयोग करणारे व त्यांच्या सहकर्म्यांवर जुलूम करणारे लोक होते. उदाहरणार्थ, जकातदार त्यांच्या भ्रष्ट वहिवाटींसाठी विख्यात होते. “लाच घेऊ नका कारण लाच डोळसांना आंधळे करिते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करिते,” हा देवाचा स्पष्ट नियम असताना देखील असे घडत होते. (निर्गम २३:८) जक्कय नावाच्या मुख्य जकातदाराने, खोट्या दोषारोपाद्वारे पुष्कळ द्रव्य बळकावले होते असे त्याने कबूल केले. विस्तृत प्रमाणावर सामाजिक सुधारणा चेतवण्याऐवजी येशूने लोकांना पश्‍चात्ताप करून त्यांच्या भ्रष्ट मार्गांपासून दूर जाण्याची विनवणी केली. परिणामतः, मत्तय व जक्कय या नामांकित भ्रष्ट जकातदारांनी त्यांची पूर्वीची जीवन-शैली सोडून दिली.—मत्तय ४:१७; ९:९-१३; लूक १९:१-१०.

अशाप्रकारे बेईमान चालीरीतींमध्ये गोवलेले लोक आज, “नीतिमत्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश्‍य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” करून भ्रष्टाचारास नाकारू शकतात. (इफिसकर ४:२४) प्रामाणिकपणे कर भरणे किंवा संशयास्पद योजनांमध्ये भाग घेण्याचे थांबवणे सोपे असणार नाही. तरीही त्याचे लाभ मोलाचे आहेत.

या भ्रष्ट जगाला सशर्त नसणारे व इतरांच्या कल्याणाची काळजी करणारे, आंतरिक शांतीचा आनंद लुटतात. चुकीच्या गोष्टींमध्ये गोवण्याची त्यांना काहीच चिंता नसते. उलट, त्यांचा विवेक चांगला राहतो. ते बायबलमधील दानीएल संदेष्ट्याचे उदाहरण अनुसरतात. बायबल सांगते की उच्च अधिकारी दानीएलाविरूद्ध काही तरी निमित्त शोधण्याचा प्रयत्न करत होते, “पण त्यांस काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्‍वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.”—दानीएल ६:४.

यहोवाचे अभिवचन

“पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्यास भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल; पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही,” असे अभिवचन यहोवा देतो.—उपदेशक ८:१२, १३.

भ्रष्टाचारामुळे दुःखी न होणे किती आरामदायी असेल! भ्रष्टाचारापासून मुक्‍त असलेल्या जगात अनंतकाळासाठी जगणे किती आशीर्वादाचे असेल! ते अशक्य नाही. ‘सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केलेल्या युगानुयुगाच्या जीवनाविषयी’ बायबल सांगते. (तीत १:२) तुम्ही भ्रष्टाचाराचा द्वेष करून धार्मिकतेवर प्रीती करता, तर देवाने अभिवचन दिलेल्या भ्रष्टाचाररहित जगाची पूर्णता कदाचित पाहू शकाल.

[४ पानांवरील चित्रं]

सरकार आणि व्यापारमंडळात भ्रष्टाचार विपुल आहे

[५ पानांवरील चित्रं]

भ्रष्टाचार बहुधा सार्वजनिक अधिकृतावर प्रभाव पाडतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा