वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१ पृ. २०-२१
  • ते केव्हा वाचतात आणि त्यांना त्याचा लाभ कसा होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते केव्हा वाचतात आणि त्यांना त्याचा लाभ कसा होतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहाटे:
  • दिवसादरम्यान:
  • संध्याकाळी:
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • बायबलचा पूर्ण फायदा कसा घ्याल?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • मी वाचन का केले पाहिजे?
    सावध राहा!—२००६
  • बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१ पृ. २०-२१

ते केव्हा वाचतात आणि त्यांना त्याचा लाभ कसा होतो

पहाटे:

एक विवाहित जोडपे, दोघेही कामाला जात असल्यामुळे त्यांनी ठरवले, की ते प्रत्येक दिवशी नेहमीपेक्षा फक्‍त दहा मिनिटे लवकर उठतील आणि घाईघाईने कामाला निघण्याआधी बायबल वाचन करतील. जे काही वाचतात त्यामुळे घराबाहेर पडल्यावर त्यांना एकमेकांसोबत हितकारक संभाषण करण्यास आधार मिळतो.

नायजेरियातील एक वडील त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक बायबल वाचनासाठी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला कार्यक्रमाचा वापर करतात. ते बहुधा सकाळी दैनंदिन वचनाची चर्चा केल्यानंतर बायबलचा भाग वाचून काढतात. मुलांना आळीपाळीने नेमलेल्या भागांचे वाचन करण्यास सांगितले जाते. आणि मग वाचलेल्या वचनांवर प्रश्‍न विचारण्यास त्यांना आमंत्रण दिले जाते.

जपानमधील एका गृहिणीने १९८५ पासून प्रत्येक वर्षी संपूर्ण बायबल वाचले आहे. ती दररोज पहाटे ५.०० वाजल्यापासून २० ते ३० मिनिटे वाचन करते. त्याच्या फायद्यांविषयी ती म्हणते: “माझा विश्‍वास बळकट झाला आहे. ते मला माझे आजारपण विसरण्यास व परादीसच्या आशेवर मन एकाग्र करण्यास मदत करते.”

एक भगिणी ३० वर्षांपासून पायनियर आहे परंतु तिचा पती साक्षीदार नाही. ती रोज सकाळी पाच वाजता उठून बायबल वाचन करते. इब्री शास्त्रवचनातील चार पाने, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील एक पूर्ण अध्याय आणि नीतीसूत्रातील एक वचन असा तिचा दैनंदिन कार्यक्रम आहे. तिने १९५९ पासून प्रत्येक वर्षी संपूर्ण बायबल वाचले आहे. ती म्हणते: “माझ्या वाचनामुळे मला वाटते, की यहोवा माझ्यावर प्रीती करतो . . . मला प्रोत्साहन, सांत्वन आणि सुधारणूक प्राप्त होते.” ती पुढे म्हणते: “बायबलचे वाचन करणे, प्रत्येक दिवशी यहोवाने मला बळ देण्यासारखे आहे.”

यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी असलेल्या राष्ट्रात एका बहिणीने सत्य शिकले, शिवाय तिचा पती देखील तिच्या विश्‍वासांचा विरोध करीत होता. ती तिचे बायबल वाचन सोमवार ते शुक्रवार, सकाळी ६.०० ते ७.०० च्या दरम्यान करू शकते. त्यामुळे तिला आंतरिक बळ मिळाले आहे. तिच्या वाचनाचा तिच्यावर कसा प्रभाव पडला त्यावर विचार करून ती म्हणते: “आपण यहोवा आणि येशूवर प्रीती करावयास आणि समस्या व कठीण परिस्थितीतही आनंदाने राहावयास शिकतो. कारण आपल्याला माहीत आहे, की यहोवाची अभिवचने कधीच निष्फळ ठरत नाहीत.”

एका बहिणीने पायनियर सेवा प्रशाळेला उपस्थित राहिल्यानंतर दररोज बायबल वाचनाची सवय करून घेण्याविषयी तेथे दिलेल्या सल्ल्यानुसार वागण्याचा ठाम निश्‍चय केला. सुरवातीला ती सकाळी ५.०० ते ६.०० च्या दरम्यान तसे करु शकली. तिची नोकरी बदलल्यामुळे तिने रात्री ९.०० ते १०.०० च्या दरम्यान वाचन चालू केले. इतर आव्हानात्मक प्रसंग आले तेव्हा ती म्हणते: “मी माझे वेळापत्रक परिस्थितीनुसार बदलत गेले.”

दिवसादरम्यान:

ब्राझील बेथेल कुटुंबाचे सदस्य असलेल्या दोन सख्या बहिणींची प्रत्येक दिवशी दुपारच्या जेवणानंतर २० मिनिटे एकत्र बसून बायबल वाचण्याची सवय आहे. त्यांनी संपूर्ण बायबल एकूण २५ वेळा वाचले आहे; तरीही त्या लिहितात: “आम्हाला प्रत्येक वेळा काहीतरी नवीन पाहावयाला मिळते, म्हणून बायबल वाचन केव्हाही कंटाळवाणे वाटत नाही.”

जपानमधील एक सडी बहीण, साक्षीदार म्हणूनच लहानाची मोठी झाली तरी तिला शास्त्रवचने चांगल्याप्रकारे माहीत नसल्याचे तिला समजून आले; पायनियर झाल्यावर तिने बायबल नियमितपणे वाचण्याचा निर्धार केला. ती आता तिचे ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचे वाचन प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी उपचारासाठी इस्पितळात जाताना प्रवासात करते. नंतर, घरी असताना वाचलेल्या भागावर संशोधन करते. आठवड्याच्या शेवटी, बायबल पुस्तके ज्या क्रमाने लिहिली होती त्याप्रमाणे त्यांना निवडून ती पुढील बायबल वाचन करते.

एका १३ वर्षीय मुलाने तीन वेळा संपूर्ण बायबल वाचून काढले आणि सध्या शाळेतून घरी आल्यावर दररोज एक अध्याय वाचून काढतो. यामुळे “मला यहोवावर अधिक प्रीती करण्यास” मदत मिळाली असे तो म्हणतो.

कामगार, वडील, पती आणि पिता या नात्याने व्यग्र असलेला एक साक्षीदार ट्रेनमधून कामाला जाताना बायबल कॅसेट ऐकतो. आणि मग घरी परतल्यावर त्याच साहित्यावर व्यक्‍तिगत वाचन करतो.

फ्रान्समधील एक पायनियर तिच्या व्यक्‍तिगत वाचनाव्यतिरिक्‍त, स्वयंपाक करताना, वाहन चालवताना, कठीण समस्यांचा सामना करत असताना किंवा विरंगुळा म्हणून देखील बायबल कॅसेट ऐकते.

जपानमधील एका २१ वर्षीय पायनियरला आठवते, की त्याची आई त्याला प्रत्येक दिवशी आध्यात्मिक अन्‍न सेवन करण्याविषयी नेहमी सांगत असे आणि तो तीन वर्षांचा असल्यापासून दररोज ठरावीक वेळी नसले तरी बायबल वाचन करतो. दिवसासाठी त्याने निवडलेला भाग वाचून झाल्यावर, तो मुख्य वचने पुन्हा न विसरता वाचतो आणि मग जे काही वाचले त्याची मनातल्या मनात उजळणी करण्यासाठी काही मिनिटे खर्च करतो.

आणखी एका साक्षीदार बहिणीने मागील १२ वर्षांदरम्यान दहा वेळा संपूर्ण बायबल वाचून काढले आहे. तिचा पती ख्रिस्ती विश्‍वासात नसल्यामुळे ती तिचे वाचन दुपारच्या वेळेत करते.

संध्याकाळी:

जपानमधील वडील आणि नियमित पायनियर या नात्याने कार्य करणारे एक बांधव, मागील आठ वर्षांपासून रोज रात्री झोपी जाण्याआधी बायबल वाचतात. ते म्हणतात: “यहोवा कसा विचार करतो, त्याला काही गोष्टी कशा वाटतात आणि तो प्रसंग कसे हाताळतो हे सूचित करणारी वचने मला जास्त वाचावयास आवडतात. या वचनांवर मनन केल्याने, यहोवाच्या विचारांप्रमाणे विचार करण्यास व माझ्या ख्रिस्ती बंधूभगिणींना व माझ्या कौटुंबिक सदस्यांना मदत करण्यास मला साहाय्य मिळाले.”

फ्रान्समधील एक वडील १९७९ पासून प्रत्येक दिवशी संध्याकाळी एक तास बायबल वाचन करतात. वाचन करतेवेळी ते तुलना करण्यासाठी त्यांच्यासमोर पाच ते सहा अनुवाद घेऊन बसतात. ते म्हणतात, की त्यांच्या या काळजीपूर्वक वाचनाने “दैनंदिन परिस्थितीत बायबलचे ज्ञान कसे लागू करावे” हे समजण्यास त्यांना मदत मिळाली आहे. यामुळे ते शास्त्रवचनातून सल्ला देतेवेळी अधिक परिणामकारी होऊ शकले.

नायजेरियातील एका बांधवाला गेल्या २८ वर्षांपासून शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यामध्ये दुसऱ्‍या दिवसासाठी ज्या वचनाची चर्चा करावयाची आहे ते शास्त्रवचन आदल्या दिवशी संध्याकाळी वाचून काढण्याची सवय आहे. त्यासोबतच, ज्या अध्यायातील ते वचन आहे तो बायबलमधील संपूर्ण अध्याय तो वाचून काढतो. त्याचा विवाह झाल्यावर, त्याची ही सवय कायम राहिली, त्या साहित्याचे वाचन आणि चर्चा तो आपल्या पत्नीसोबत करू लागला.

एक किशोरवयीन मुलगी जिचे पालक साक्षीदार नाहीत तिने दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटे वाचन करण्याची सवय स्वतःला लावून घेतली आहे. ते क्षण तिच्यासाठी बहुमोल आहेत आणि वाचन करण्याआधी व झाल्यानंतर ती प्रार्थना करते. यहोवाने प्रत्येक बायबल लेखकाला जो संदेश लिहिण्यासाठी मार्गदर्शित केले त्याबद्दल जाणून घेण्याचे तिचे ध्येय आहे.

बेथेल सेवेत असलेला एक विवाहित बांधव म्हणतो, की त्याने गेल्या आठ वर्षांपासून प्रत्येक वर्षी बायबल वाचले आहे. झोपण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे तो वाचतो. तो कितीही थकलेला असला आणि त्याने वाचन न करता झोपण्याचा प्रयत्न केला तर त्याला झोप येत नसल्याचे त्याला आढळून आले आहे. त्याला ती आध्यात्मिक गरज पूर्ण करण्यासाठी उठावेच लागते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा