दरिद्र्यांना आणखी किती काळ थांबावे लागेल?
“मुक्त समाज, जे पुष्कळ दरिद्री आहेत त्यांना मदत करू शकत नाही तर जे थोडे लोक श्रीमंत आहेत त्यांचे ते संरक्षण करू शकणार नाही.”—जॉन एफ. केनडी.
“सर्वांचे भवितव्य उज्ज्वल असावे अशी माझी इच्छा आहे—दारिद्र्य नसावे, कोणीही बागेत झोपू नये तर एक परादीस हवे!” साओ पावलो, ब्राझीलमधील १२ वर्षांचा एक मुलगा असे म्हणाला. परंतु दारिद्र्याचा समूळ नाश करणे शक्य आहे का? दरिद्र्यांना किती काळ थांबावे लागेल?
काही लोक त्यांना हव्या त्या वस्तू विकत घेऊ शकत नसल्यामुळे स्वतःला गरीब समजतात. तरी, जे खरोखरच दारिद्र्याने गांजलेले आहेत त्यांच्या दयनीय स्थितीचा जरा विचार करा. या लोकांच्या तीव्र हालअपेष्टांची आणि दुःखाची तुम्ही कल्पना करू शकता का? टाकलेल्या कचऱ्यातून स्वतःसाठी अन्न शोधून काढण्यासाठी काहींची जलकुकूट आणि उंदरांसोबत स्पर्धा लागलेली असते! अशा प्रकारचे दारिद्र्य मानवजातीला कोठवर पीडित करील? युनेस्कोचे (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) महासंचालक फेडेरिको मॉयर यांनी केलेली विनंती अगदी उचित आहे: “दारिद्र्य, उपासमार आणि लाखो जनांचे दुःख—या असह्य गोष्टी सहन करावयास लावणाऱ्या अनिश्चित सहिष्णुतेचा आपण त्याग करू या.”
विश्वव्यापी कल्याणाचे स्वप्न सार्थ होईल का? दरिद्र्यांना कोणती आशा आहे?
दरिद्र्यांसाठी कोणत्या संधी आहेत?
सद्हेतू पुढारी अधिक नोकऱ्या, चांगला पगार, सुधारित सामाजिक सुरक्षितता आणि जमीन सुधारणेचे उपाय सादर करतात. ते अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती जॉन एफ. केनडी यांच्याबरोबर सहमत असतील: “मुक्त समाज, जे पुष्कळ दरिद्री आहेत त्यांना मदत करू शकत नाही तर जे थोडे लोक श्रीमंत आहेत त्यांचे ते संरक्षण करू शकणार नाही.” परंतु केवळ चांगले हेतू दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी पुरेसे नाहीत. उदाहरणार्थ, आर्थिक अभिवृद्धी दरिद्रयांना मदत करील का? निश्चितच नाही. भूतपूर्व भारतीय नेते जवाहरलाल नेहरू असे म्हणाले: “भांडवलशाही समाजाच्या सामर्थ्याकडे लक्ष दिले नाही तर श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्यास व गरिबांना आणखी गरीब करण्यास त्याचा कल जातो.” परंतु हालअपेष्टा आणि आवश्यक वस्तुंच्या अभावाव्यतिरिक्त, निरूपयोगीपणाची भावना एखाद्या गरिबाचे ओझे आणखी वाढवते. मानवी नेते दारिद्र्यांना निरूपयोगीपणा आणि आशाहीनतेच्या भावनांवर मात करण्यासाठी मदत करू शकतात का?
खरे पाहता, जे अत्यंत गरीब आहेत ते जणू आकाशाला भिडणारी चलनवाढ व बेकारी यासारख्या कठीण परिस्थितीत गरिबीचा सामना करावयास आणि कमी स्वाभिमानाच्या भावनांवर मात करण्यास शिकले आहेत. शिवाय, अन्नटंचाई, बेघरपणा आणि पीडांना पूर्णपणे मूळासकट निश्चित काढले जाईल. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटते का? “लवकरच कोणीही दरिद्री नसेल!,” हा आमचा पुढील लेख वाचण्याचे आम्ही आपणाला आमंत्रण देतो.