वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१५ पृ. २९-३१
  • तुम्ही यहोवाची स्तुती कराल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही यहोवाची स्तुती कराल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे देवाची स्तुती करा
  • मदत उपलब्ध
  • यहोवाची स्तुती करण्यासाठी मुलांना मदत करा
  • यहोवाबरोबरील अनंतकाळचा नातेसंबंध
  • विश्‍वभर आनंदी स्तुतीकर्ते होण्याकरता वेगळे केलेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • बालकांनो, यहोवाची स्तुती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१५ पृ. २९-३१

तुम्ही यहोवाची स्तुती कराल का?

“हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ति [स्तुती, NW] पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे.” हे शब्द कोरहाच्या मुलांच्या भविष्यवादित गीतातील आहेत. (स्तोत्र ४८:१०) आज, लाखोंचा समावेश असणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांचा प्रचंड समूह देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे देवाची स्तुती करत आहे आणि देवाचे नाव इतरांना कळवत आहे. तीनशे पेक्षा अधिक भाषेत २३२ देशांमध्ये आणि समुद्री बेटावर असे करण्याद्वारे ते अक्षरशः “पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात” आहेत.

विभिन्‍न संस्कृती, समाज आणि भाषा अशी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांना यहोवाची स्तुती करण्यासाठी कशाने प्रेरणा मिळते? देवाचे वचन म्हणजेच बायबलच्या अचूक ज्ञानाबद्दल त्यांची कृतज्ञता हे त्याचे प्रमुख कारण आहे. आध्यात्मिक सत्याने त्यांची अंधश्रद्धेपासून आणि चिरकालिक यातना यासारख्या जखडून ठेवणाऱ्‍या धार्मिक विश्‍वासापासून सुटका केली आहे. (योहान ८:३२) त्याचप्रमाणे प्रीती, सामर्थ्य, बुद्धी, न्याय, दया यासारख्या देवाच्या अद्‌भुत गुणांची गुणग्राहकता बाळगण्यासाठी देखील सत्य त्यांना मदत करते. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याला मानवजातीसाठी खंडणी बलिदान म्हणून अर्पण केले याची समज प्राप्त झाल्यानंतर प्रामाणिक लोक यहोवाची स्तुती आणि सेवा करण्यासाठी प्रवृत्त होतात.

बायबलच्या प्रकटीकरण या पुस्तकानुरुप स्वर्गीय समूह उद्‌गारतो, “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते सर्व झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:११) जबाबदारी आहे म्हणून ही स्तुती केली जात नाही. तर ही स्तुती यहोवाच्या आदरामुळे निर्माण होते.

सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे देवाची स्तुती करा

यहोवाची स्तुती करणारी व्यक्‍ती, देवाची उदाहरणीयरित्या स्तुती करणाऱ्‍या येशू ख्रिस्ताचे अनुकरण करते. येशूच्या पदचिन्हावर चालणे यामध्ये देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार कार्यात सहभाग घेण्याचा समावेश होतो. (मत्तय ४:१७, २३; २४:१४) देवाची स्तुती करण्यामध्ये प्रचार कार्य हा एक मोठा जागतिक भाग बनला आहे.

हे प्रचार कार्य इतके महत्त्वाचे आहे की, बायबल त्याचा संबंध स्पष्टपणे उद्धाराशी जोडते. रोमकर १०:१३-१५ मध्ये असे वाचण्यात येते, “‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’ तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!’ असा शास्त्रलेख आहे.”

केवळ मागील एका वर्षामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी एक अरब पेक्षा अधिक तास या प्रचार कार्यामध्ये खर्च केले. अशारीतीने देवाची स्तुती करण्याचा किती उत्तम परिणाम झाला! यहोवाला समर्पणाचे प्रतीक म्हणून सुमारे ३,१४,००० लोक पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेण्याद्वारे स्तुती करणाऱ्‍या या समूहाला येऊन मिळाले.

त्याचप्रमाणे १९९४ मध्ये, ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या १,२२,८८,९१७ लोकांबद्दल काय म्हटले जाऊ शकते? अशांपैकी ७०,००,००० असे होते ज्यांनी अद्याप सुवार्तेचा प्रचारक या नात्याने यहोवाची स्तुती केलेली नाही. तरी देखील या महत्त्वाच्या प्रसंगातील त्यांच्या उपस्थितीच्या परिणामामुळे स्तुती करणाऱ्‍यांच्या समुहामध्ये लाखोजनांची भर पडू शकते. यहोवाचे स्तुतीकर्ते होण्यास अशा आस्थेवाईकांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते?

मदत उपलब्ध

अनेक आस्थेवाईकांची यहोवाची स्तुती करण्याची इच्छा असेल परंतु त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गरजा ते पूर्ण करु शकणार नाहीत असे त्यांना वाटत असेल. त्यांच्यासाठी स्तोत्रकर्त्याचे शब्द आठवणे उत्तम होईल, “मी आपली दृष्टि पर्वतांकडे लावितो; मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्‍वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.” (स्तोत्र १२१:१, २) अर्थातच, यहोवाचे मंदिर तसेच ईश्‍वरशासित शासनाचे पार्थिव आसन असणाऱ्‍या जेरुसलेमच्या पर्वतांवर स्तोत्रकर्त्याने त्याची दृष्टी लावली होती. यावरून आपण या उचित समारोपास येऊ शकतो की, यहोवाची स्तुती आणि राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी आवश्‍यक मदत केवळ यहोवा आणि त्याची संघटना यापासूनच येते.—स्तोत्र ३:४; दानीएल ६:१०.

आज, यहोवाची स्तुती करण्याची मनीषा बाळगणारे त्याच्या पार्थिव संघटनेकडून प्रेमळ मदतीची अपेक्षा करू शकतात. उदाहरणार्थ, यहोवाचे साक्षीदार आस्थेवाईक लोकांचा मोफत गृह बायबल अभ्यास संचालित करण्याद्वारे त्यांना मदत करतात. या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये बायबलच्या केवळ सिद्धांतापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्याला तो जे शिकत आहे त्याबद्दल आणि यहोवाची साधनीभूत असणारी संघटना याबद्दल गुणग्राहकता विकसित करण्यास मदत करतो.

याच्या एकवाक्यतेत नवीनच मिळालेले सत्य, नवोदितांना केवळ समजण्याचीच नव्हे तर ते त्यांच्या अंतःकरणामध्ये पोहंचेल याची सुद्धा साक्षीदार बायबल अभ्यास संचालित करतेवेळी खबरदारी घेतात. यहोवा पृथ्वीवरील त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे त्याच्या संघटनेला उपयोगात आणत आहे, हे या विद्यार्थ्यांना दाखवण्याचे या शिक्षकांनी टाळता कामा नये. हे साध्य करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत हे माहितीपत्रक आणि जेहोवाज विटनेसेस—द ऑरगनायझेशन बिहाईंड द नेम ही व्हिडियो टेप बहुतेकवेळा मदतदायी ठरली आहे.

यहोवाच्या भावी स्तुतीकर्त्यांना मदत करण्यासाठी ख्रिस्ती सभा देखील प्रमुख भूमिका पार पाडतात. बायबल अभ्यासाच्या प्राथमिक स्थितीलाच विद्यार्थ्याला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले जाऊ शकते. कालांतराने, त्याला मंडळीच्या सर्व सभांना नियमितपणे उपस्थित राहण्याचे आणि त्यामध्ये सहभागिता करण्याचे महत्त्व पटेल. (इब्रीयांस १०:२४, २५) पर्यवेक्षक आध्यात्मिकरित्या उभारणीकारक आणि व्यावहारिक असणाऱ्‍या सभांची तयारी करण्याद्वारे समविश्‍वासूजणांना आणि यहोवाच्या भावी स्तुतीकर्त्यांना अमूल्य मदत देऊ शकतात.

यहोवाची स्तुती करण्यासाठी मुलांना मदत करा

नजीकच्या भवितव्यामध्ये सुवार्तेचे प्रचारक होणाऱ्‍या अनेकांमध्ये मुले देखील आहेत. विशेषतः, वडिलांचे हे बायबलमधील उत्तरदायित्त्व आहे की, त्यांनी त्यांच्या मुलांना ‘यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवावे.’ (इफिसकर ६:४) ईश्‍वरी पालकांद्वारे योग्यपणे प्रशिक्षित केल्यानंतर अगदी लहान मुले सुद्धा यहोवाची स्तुती करण्याची इच्छा विकसित करु शकतात.

अर्जेंटिना येथील एका लहान मुलीने राज्य प्रचारक होण्यास लायक होण्यासाठी मंडळीच्या वडिलांनी तिला मदत करावी म्हणून अनेक महिने त्यांच्या वारंवार भेटी घेतल्या. कालांतराने तिच्या पालकांनी आणि मंडळीच्या वडिलांनी तिला बाप्तिस्मा न झालेली प्रचारक होण्यास सहमती दर्शविली. ती प्रचारक होण्यापूर्वीच दारावर राज्य संदेश परिणामकारकपणे सादर करत होती. ही लहान मुलगी पाच वर्षांची आहे आणि तिला वाचता येत नाही, तरी देखील काही बायबल वचनांचे स्थान ती स्मरणात ठेवते. वचन सापडल्यानंतर ती घरमालकाला ते वाचण्यास सांगते आणि त्यानंतर स्पष्टीकरण करते.

यावरुन हे स्पष्ट होते की, पालक आणि मंडळीचे वडील यहोवाचे स्तुतीकर्ते होण्यासाठी प्रगती करणाऱ्‍यांना मदत करण्याद्वारे आणि त्यांना उत्तेजन देण्याद्वारे पुष्कळ काही साध्य करु शकतात.—नीतीसूत्रे ३:२७.

यहोवाबरोबरील अनंतकाळचा नातेसंबंध

तुम्ही काही काळापासून यहोवाच्या साक्षीदारांसह सहवास राखत असल्यास परंतु अजूनही त्यांच्या प्रचार कार्यामध्ये त्यांच्यासोबत सहभागी झाला नसल्यास काय? खालील प्रश्‍न स्वतःला विचारणे लाभदायक ठरेल: ‘सत्य मला सापडले आहे का आणि यहोवा देव खरा असल्याचा विश्‍वास मी बाळगतो का? मानवजातीच्या समस्यांवरील देवाचे राज्य हाच एकमेव उपाय आहे याची मला खात्री पटली आहे का? यहोवाला निराश करणाऱ्‍या सर्व खोट्या धर्मांचा त्याचप्रमाणे जगीक संस्कृती आणि प्रघात यांचा मी त्याग केला आहे का? देव आणि त्याचे धार्मिक स्तर यांच्याबद्दल मला सखोल प्रीती आहे का?’ (स्तोत्र ९७:१०) या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्ही प्रामाणिकपणे होय, अशी दिल्यास यहोवाची स्तुती करण्यास काय हरकत आहे?—पडताळा प्रेषितांची कृत्ये ८:३६.

यहोवाच्या स्तुतीमध्ये सुवार्तेचा प्रचार यापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. तुमच्याकडे अचूक ज्ञान असल्यास, तुमच्याकडे खरा विश्‍वास असल्यास आणि तुम्ही ईश्‍वरी गरजांनुरुप जीवन जगत असल्यास तुम्हाला देवासोबतचा व्यक्‍तिगत नातेसंबंध दृढ करण्याची गरज आहे. कशाप्रकारे? प्रार्थनेच्या माध्यमाने त्याला समर्पण करण्याद्वारे आणि त्याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याद्वारे. सार्वकालिक जीवन धोक्यात आहे. त्यामुळे आत्ताच येशूच्या सल्ल्याप्रमाणे कृती करा, “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.”—मत्तय ७:१३, १४.

सद्य व्यवस्थीकरण त्याच्या अचानकपणे होणाऱ्‍या नाशाच्या निगडित आहे आणि त्यामुळे कांकू करण्याची ही वेळ नाही. यहोवाबरोबरील अनंतकाळचा नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ पाऊले उचला. खरोखरच, तुम्ही यहोवाची स्तुती कराल का? या प्रश्‍नाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दर्शविण्याची हीच वेळ आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा