वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१५ पृ. ३१
  • यहोवा पृथ्वीचा बचाव करील

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा पृथ्वीचा बचाव करील
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१५ पृ. ३१

यहोवा पृथ्वीचा बचाव करील

मालदीव या द्वीपसमूहाच्या एका बेटावरील विमानतळ प्रत्येक दिवशी कित्येक तास बंद असते. का बरे? कारण भरतीमुळे विमानाच्या धावपट्टीवर पाणी साचते आणि त्यामुळे अशा धावपट्टीवर विमाने उतरविणे धोक्याचे ठरते. पुढील शतकामध्ये मालदीव बेटांच्या समुद्र पातळीमध्ये किमान एक मीटरपर्यंत वाढ होण्याची भीती काही शास्त्रज्ञांनी व्यक्‍त केली. हे प्रमाण अतिशय अल्प वाटत असले तरीही अशाप्रकारच्या समुद्र पातळीच्या वाढीमुळे सात द्वीप राष्ट्रांचे स्थान नकाशामधून पूर्णपणे नाहीसे होऊ शकते. खरोखरच, यू एन क्रॉनिकल याच्या मतानुसार समुद्र पातळीतील दोन मीटर वाढ १,२०० बेटांचा समावेश असणाऱ्‍या या संपूर्ण द्वीपसमूहाला गिळंकृत करु शकते!

समुद्र पातळीमध्ये वाढ होण्यास काय कारणीभूत आहे? संयुक्‍त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमानुसार पृथ्वीच्या वातावरणाला प्रदुषित करणारे “हरीतगृह वायू” यामुळे उष्ण प्रदेशातील समुद्रांची व्याप्ती वाढते, हिमनग तसेच हिमनद्या वितळतात आणि अशाप्रकारे समुद्र पातळीमध्ये वाढ घडून येते. लंडन येथील पॅनस इन्स्टिट्यूट म्हणते की, “पृथ्वीच्या हळूवारपणे होण्याऱ्‍या नाशास प्रदूषण कारणीभूत आहे आणि त्याचा परिणाम भूप्रदेश आणि समुद्र यांच्या प्रत्येक सरहद्दीपर्यंत होत आहे.”

पृथ्वीच्या तापमानातील वाढीची वास्तविकता अजूनही शास्त्रज्ञांच्या वादविषयाचा मुद्दा आहे. तथापि, आपण या बाबतीत निश्‍चिंत राहू शकतो की, पर्यावरण समस्या देवाच्या उद्देशाला पायबंद घालणार नाहीत. बायबल म्हणते, “जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळत नाही.” (१ इतिहास १६:३०) यहोवाचा पृथ्वीवरील पर्यावरणावर ताबा आहे व लवकरच तो पृथ्वीचा तसेच मानवजातीचा नाशापासून बचाव करील, यामुळे आपण आनंदित होऊ शकतो.—स्तोत्र २४:१, २; १३५:६; २ पेत्र ३:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा