वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१ पृ. २८-३०
  • मन्यतेद्वारे मानवी मूलभूत गरज पूर्ण करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मन्यतेद्वारे मानवी मूलभूत गरज पूर्ण करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मान्यता—एक मूलभूत गरज
  • मान्यता देण्यात यहोवाच्या नमुन्याचे अनुकरण करा
  • कौटुंबिक वर्तुळात मान्यता
  • ख्रिस्ती मंडळीत मान्यता
  • पात्र असलेली मान्यता देण्याचा व मिळवून घेण्याचा प्रयत्न करा
  • तुम्हाला कोणाची स्वीकृती मिळवायची आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे चाला
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • “अशांना प्रिय समजा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१ पृ. २८-३०

मन्यतेद्वारे मानवी मूलभूत गरज पूर्ण करणे

“शाब्बास!” “तुम्ही केलेल्या साध्यतेचा मला आनंद वाटतो!” किंवा “तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न पणास लावले; आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!” अशा काही प्रामाणिक अभिव्यक्‍ती तुम्ही ज्यांना आदर देता त्यांच्याकडून कदाचित तुम्हाला ऐकावयास मिळतात तेव्हा त्या एखाद्याच्या स्वाभिमानाला उत्तेजन देण्यास मदतदायक ठरतात. मानवांना जेव्हा अशाप्रकारची मान्यता मिळते तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो व ते आणखी वृद्धी करतात. त्यामुळे ते अधिक प्रगती करतात शिवाय आनंदी होतात. खरेच, शरीराला ज्याप्रकारे हितकारक अन्‍नाची गरज आहे त्याचप्रकारे मन आणि अंतःकरणाला योग्य मान्यतेची आवश्‍यकता आहे.

“विचार करणे किंवा लक्ष देण्यास पात्र असलेल्या एखाद्या व्यक्‍तीचा स्वीकार करणे,” तसेच “विशेष लक्ष किंवा ध्यान,” असा एका शब्दकोशानुसार मान्यतेचा अर्थ होतो. तो अर्थ, आदर, बहुमान याजशी जवळून निगडित आहे, जो दिल्याने एखाद्या व्यक्‍तीच्या तर्कयुक्‍त चांगल्या मताला किंवा मूल्यमापनाला तसेच ती व्यक्‍ती पात्र असलेल्या मान्यतेला सूचित करतो.

मान्यता—एक मूलभूत गरज

सन्मान जेथे दिला पाहिजे तेथे दिल्याने ते तर्कशुद्ध आणि न्याय्य आहे. येशूने याचे उदाहरण त्याच्या दाखल्यात मांडले. त्या दाखल्यात त्याने दाखवले, की काही दासांवर त्यांच्या धन्याने त्याची मालमत्ता सोपवली होती. त्याच्या मालमत्तेचा योग्य व्यवहार केल्याची कबुली देताना त्याने म्हटलेः “शाबास, भल्या व विश्‍वासू दासा!” (मत्तय २५:१९-२३) परंतु अनेक वेळा ह्‍या पात्र असलेल्या सभ्यतेकडे कानाडोळा केला जातो. मान्यता न दिल्यामुळे आवेश व पुढाकार दबून जातो. ईओन म्हणते की, “मान्यता मिळाल्यामुळे तुम्हाला असे वाटू लागते की तुमची गरज आहे, तुमची प्रशंसा केली जाते . . . ते तुम्हाला पुढाकार घेण्यास प्रवृत्त करते. तुमच्याकडे कानाडोळा केला तर तुम्हाला खिन्‍न व तुमचा त्याग केल्यासारखे वाटू लागते.” पॅट्रिक याला पुष्टी देत म्हणतो: “आणि मग एक उच्च दर्जा व उत्पन्‍न टिकवून ठेवण्यास कठीण जाते.” यास्तव, आम्ही मान्यता कशी व कधी द्यावी हे शिकून घेणे किती महत्त्वपूर्ण आहे. आमच्या आजूबाजूला असणारे लोक आमचा स्वीकार करतात हे जाणल्यावर प्रत्येकाला सुरक्षित वाटते आणि अशी सुरक्षितता मिळावी म्हणून सर्व उत्सुक असतात. ती एक मूलभूत मानवी गरज आहे.

प्रशंसेचा एखादा शब्द, आणखी एक जादा जबाबदारी, किंवा एखादी भौतिक देणगी, तुम्हाला होईल तितके सर्वात उत्तम करत राहण्यास उत्तेजित करते. मग तुम्ही कदाचित एक पालक, पती, पत्नी, बालक, मंडळीतील एक सदस्य, किंवा पर्यवेक्षक असला तरी ही गोष्ट खरी आहे. मार्ग्रेट म्हणते, “मला मान्यता मिळाल्यावर आनंद वाटतो, माझी कोणाला तरी गरज आहे असे वाटते, व आणखी चांगले करण्याची माझी इच्छा होते.” ॲन्ड्रुने असे म्हणून याला संमती दिली की “मला अत्यानंद होतो, अधिक कष्टाने काम करण्याची प्रेरणा मिळते.” परंतु, एखाद्याला मान्यता किंवा आदर देण्यासाठी लक्षपूर्वक विचार करण्याची व योग्य निर्णयशक्‍तीची गरज आहे.

मान्यता देण्यात यहोवाच्या नमुन्याचे अनुकरण करा

इतरांचे मूल्य जाणण्यात यहोवा देवाचे सर्वप्रथम उदाहरण आहे. मान्यतेच्या पात्रतेचे असणाऱ्‍या सर्वांना तो कबूल करतो. त्याने हाबेल, हनोख व नोहा यासारख्या पुरूषांची नोंद घेतली. (उत्पत्ती ४:४; ६:८; यहूदा १४) यहोवाने दाविदाला त्याच्या उल्लेखनीय विश्‍वासूपणामुळे कबुली दिली. (२ शमुवेल ७:१६) शमुवेलाने, संदेष्टा या नात्याने यहोवाचा अनेक वर्षे आदर केला व एकदा फिलीस्टाईन लोकांवर विजय प्राप्त करण्यासाठी शमुवेलाने जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेला लगेचच उत्तर देऊन देवानेही त्याच्या बदल्यात त्याचा आदर केला. (१ शमुवेल ७:७-१३) तुम्हालाही अशाप्रकारे ईश्‍वरी मान्यता मिळाल्यावर सन्मानित वाटणार नाही का?

कृतज्ञता व गुणग्राहकता ही दोन्ही मान्यतेशी अगदी जवळून संबंधित आहेत. बायबल आपल्याला ‘कृतज्ञ असण्यास’ व आमच्यासाठी जे काही केले जाते त्याबद्दल आभारी असण्यास आर्जविते. (कलस्सैकर ३:१५; १ थेस्सलनीकाकर ५:१८) हे विशेषकरून यहोवाला आभार प्रदर्शन करण्यासंबंधी लागू होत असल्यामुळे, जीवनाच्या दैनंदिन बाबींमध्येही ते खरे आहे. प्रेषित पौलाने ते ओळखले. त्याने फीबीला ‘पुष्कळ जणास साहाय्य करणारी’ व प्रिस्क आणि अक्विलाने त्याच्याकरता आणि इतरांकरता त्यांचा “जीव धोक्यात” घातला अशी मान्यता दिली. (रोमकर १६:१-४) अशाप्रकारे उघडपणे त्यांना कृतज्ञता व्यक्‍त केल्यावर त्यांना कसे वाटले असेल याची कल्पना करा. अशाप्रकारची मान्यता, आदर आणि उत्तेजन देण्याचा आनंद पौलाला लाभला. आम्ही देखील योग्य मान्यता देण्याच्या पात्रतेचे जे आहेत अशांना ती देऊन यहोवाचे आणि गुणग्रहण बाळगणाऱ्‍या त्याच्या उपासकांचे अनुकरण करू शकतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

कौटुंबिक वर्तुळात मान्यता

“थोडीशी मान्यता, जीवनाला आनंददायक बनवण्यास खूप उपयोगी पडते. यामुळे तुम्हाला जे मान्यता देतात त्यांच्यावर तुम्ही कदाचित चिरकालासाठी प्रीती करू लागता,” असे मिशेल नावाचे एक पती व ख्रिस्ती वडील म्हणतात. उदाहरणार्थ, एका ख्रिस्ती पतीकडे भारी जबाबदाऱ्‍या आहेत, आणि तो कौटुंबिक कल्याणात गोवलेले महत्त्वपूर्ण निर्णय घेतो. त्याला कुटुंबाच्या आध्यात्मिक, भौतिक आणि मानसिक गरजा पुरवणे अत्यावश्‍यक आहे. (१ तीमथ्य ५:८) कुटुंबाचा मस्तक या नात्याने त्याच्या या देव-प्रणित नेमणूकीला योग्य मान्यता दिली जाते व त्याची पत्नी त्याची ‘भीड राखते’ तेव्हा तो किती कृतज्ञ ठरतो!—इफिसकर ५:३३.

गृहिणीचे काम सर्वांदेखत केले जात नसले तरी आपल्याला तिच्या कामाकडे दुर्लक्ष करता येत नाही. आधुनिक शिकवणी अशाप्रकारच्या कामाला कमी लेखतील व त्याचा दर्जा आणि मूल्य हिरावून घेतील. तरीही ते देवाला आनंदविणारे आहे. (तीत २:४, ५) एक समजूतदार पती त्याच्या पत्नीची विशेषतः जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये ती जेथे श्रेष्ठ आहे तेथे प्रशंसा करतो, त्याच्या मस्तकपदाखाली तिला अशाप्रकारची मान्यता देतो तेव्हा ते किती तजेला देणारे ठरते! (नीतीसूत्रे ३१:२८) रोवीना तिच्या पतीबद्दल म्हणते, “मी जे काही करते त्याला ते संमती देतात तेव्हा मला त्यांच्या अधीन राहण्यास, त्यांना सन्मान आणि आदर देण्यास सोपे जाते.”

अमेरिकेचे एक शिक्षणतज्ज्ञ क्रिश्‍चन बोवी एकदा म्हणाले: “सूर्यप्रकाश फुलांच्या वाढीसाठी जसा चांगला असतो त्याचप्रमाणे तर्कशुद्ध प्रशंसा मुलांच्या उत्कर्षास जरूरीची आहे.” होय, लहान मुलाला देखील, तो कुटुंबाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे अशा निरंतर आश्‍वासनाची गरज असते. नव्या भावनिक व शारीरिक बदलांनी भरलेले त्याच्या वाढत्या किशोरावस्थेच्या वर्षांमध्ये, त्याला त्याच्या व्यक्‍तिगत स्वरूपाची वाढती आत्मजाणीव अधिक असते तसेच स्वातंत्र्य व मान्यता मिळवण्याचीही भूक असते. या किशोरावस्थेत असताना विशेषकरून, आपल्या पालकांनी आपल्यावर प्रेम करावे, त्यांनी आपल्याला समजून घेऊन आपल्याशी मानवी दयेने वागावे असे प्रत्येक किशोरवयीन युवकाला वाटते. वृद्ध पालक आणि आजोबा-आजी यांनाही, ते अजूनही उपयोगी आहेत व त्यांच्यावर प्रेम केले जाते, त्यांचा ‘उतारवयात त्याग’ केलेला नाही अशा आश्‍वासनाची गरज वाटते. (स्तोत्र ७१:९; लेवीय १९:३२; नीतीसूत्रे २३:२२) मान्यता मिळवण्याच्या इच्छेला योग्यप्रकारे पूर्ण केल्यामुळे कौटुंबिक वर्तुळात अधिक आनंद व यश प्राप्त होते.

ख्रिस्ती मंडळीत मान्यता

ख्रिस्ती मंडळीतील इतरांमध्ये प्रामाणिक आस्था विकसित करण्यात तसेच त्यांच्या कार्यांसाठी व प्रयत्नांसाठी उदार मनाने गुणग्राहकता व्यक्‍त करणे अतिशय मौल्यवान आहे. ख्रिस्ती वडिलांनी मंडळीतील इतरांच्या साध्यतेची व प्रयत्नांची प्रशंसा करून पुढाकार घेतला पाहिजे. मार्ग्रेट म्हणते, “उत्तेजन, समाधान व आनंदाच्या भाषेत सांगायचे तर मान्यतेच्या त्या काही शब्दांचा किती अर्थ होतो हे मला माझ्यासोबत मेंढपाळकत्वाच्या अनेक भेटी झाल्यावर कळले. सामान्यपणे मान्यता न दिल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीला त्याच्याकडून काही तरी हिरावून घेतल्यासारखे कशामुळे वाटते हे मला तेव्हा जाणवले.” होय, मंडळीतील सर्वांना प्रामाणिक, प्रेमळ व्यक्‍तिगत आस्था दाखवण्यासाठी हे किती योग्य कारण आहे! त्यांनी केलेली चांगली कामे ओळखून घ्या. मोकळेपणाने त्यांची प्रशंसा करा व त्यांना उत्तेजन द्या. अनेक मंडळ्यांमध्ये एक पालकीय कुटुंबे आहेत जे त्यांच्या मुलांमध्ये आध्यात्मिक मूल्ये बिंबवण्यासाठी कठीण परिश्रम करत असतात. अशा लोकांना खास प्रशंसा मिळालीच पाहिजे. नकारात्मक पैलूंऐवजी सकारात्मक पैलूंवर जोर द्या. तुम्हाला त्यांच्याबद्दल बंधूप्रीती आहे हे इतरांना पाहू द्या. तुम्हाला त्यांची काळजी आहे हेही त्यांना पाहू द्या. अशाप्रकारे, प्रेमळ पर्यवेक्षक मंडळीची उन्‍नती करण्यास झटत असतात. (२ करिंथकर १०:८) मंडळीचे सदस्य, याच्या मोबदल्यात त्यांच्या फायद्याकरता कठीण परिश्रम घेणाऱ्‍या विश्‍वासू जणांना पात्र असलेली मान्यता व आदर देतात.—१ तीमथ्य ५:१७; इब्रीयांस १३:१७.

परंतु या गोष्टीची आणखी एक बाजू किंवा दृष्टिकोन आहे. मान्यता मिळवण्याची भावना, अतिशय तीव्र असते. येशूच्या दिवसांमध्ये, धार्मिक पुढाऱ्‍यांमध्ये तो एकाग्रतेचा विषय बनला. येशूला या बाबतीत त्याच्या शिष्यांच्या चुकीच्या समजूतीला सुधारावे लागले. (मार्क ९:३३-३७; लूक २०:४६) ख्रिश्‍चनांनी समजूतदारपणा व समतोलपणा राखणे आवश्‍यक आहे. तिच्यावर निग्रह ठेवला नाही तर मान्यता मिळवण्याची भावना आध्यात्मिकरीत्या धोक्यात येऊ शकते. (याकोब ३:१४-१६) उदाहरणार्थ, जर एक वडील गर्विष्ठ झाले आणि इतरांनी त्यांच्या स्वतःच्या उच्च मताला स्वीकारावे अशी मागणी केली तर ती किती दुःखाची गोष्ट होऊ शकते!—रोमकर १२:३.

प्रेषित पौलाने रोममधील सहख्रिश्‍चनांना सुज्ञपणे सल्ला दिला: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) हे शब्द उल्लेखनीयरीत्या ख्रिस्ती वडिलांना लागू होतात ज्यांनी सर्व वेळेला ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे हे ओळखले पाहिजे. पवित्र आत्मा, बायबल तत्त्वे आणि “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांच्या नियमन मंडळाच्या नेतृत्वाद्वारे ख्रिस्ताच्या अधिकारयुक्‍त मार्गदर्शनाला अधिनता प्रकट होते.—मत्तय २४:४५-४७; पहा प्रकटीकरण १:१६, २०; २:१.

अशाप्रकारे, वडील एकत्र येतात व देवाच्या कळपाचे पालन करण्यासाठी यहोवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात तेव्हा ते शास्त्रवचनीयरीत्या योग्य निर्णय घेण्यास झटतील. ख्रिस्ती सभ्यता, लीनता आणि नम्रता कोणत्याही वडिलाला स्वतःस उंचावण्यापासून, त्याच्या बांधवांवर वर्चस्व गाजवण्यापासून, आणि या सभांमध्ये त्याचे मत त्यांच्यावर लादण्यापासून परावृत्त करील. (मत्तय २०:२५-२७; कलस्सैकर ३:१२) शक्य होईल तेव्हा, वडील वर्गाचे अध्यक्ष, सहवडिलांना त्यांचे विचार व्यक्‍त करण्याचे आगाऊ आमंत्रण देतील तसेच त्यांना एक कार्यक्रमसूची देखील आगाऊ देतील जेणेकरून ज्या विषयांवर बोलणी केली जाणार आहे त्यावर त्यांना काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक विचार करण्यास वेळ मिळेल. वडिलांच्या सभेदरम्यान, अध्यक्ष इतर वडिलांना बोलू न देता स्वतःच सर्व मते ठरवणार नाहीत तर, चर्चा केल्या जाणाऱ्‍या विषयावर ‘प्रशस्तपणे बोलण्याचे’ उत्तेजन देतील. (१ तीमथ्य ३:१३, NW) याऐवजी, सहवडिलांनी एकमेकांच्या अभिव्यक्‍ती लक्षपूर्वक ऐकाव्यात आणि ज्या वडिलांकडे पुष्कळ वर्षांचा ख्रिस्ती अनुभव आहे अशांकडून येणाऱ्‍या सूक्ष्मज्ञानाचा आनंदाने लाभ मिळवून घ्यावा.—निर्गम १८:२१, २२.

परंतु, पर्यवेक्षकांना हे पूर्णपणे माहीत आहे की ख्रिस्त, एखाद्या परिस्थितीचा सामना करण्यास किंवा एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावयास लागणारी बायबल तत्त्वे पुरवण्यासाठी वडील वर्गातील कोणाही वडिलाचा उपयोग करू शकतो. मंडळीच्या आध्यात्मिक हितांची काळजी घेण्यात प्रत्येक वडील जो हातभार लावतो त्याची योग्य मान्यता दिली तर वडील वर्गात सर्वत्र चांगली मनोवृत्ती आढळेल.—प्रेषितांची कृत्ये १५:६-१५; फिलिप्पैकर २:१९, २०.

पात्र असलेली मान्यता देण्याचा व मिळवून घेण्याचा प्रयत्न करा

मान्यता उभारणी करते. ती उत्तेजक व सर्वांना आवडणारी आहे. मेरी म्हणते, “आपण सर्वसामान्य व्यक्‍ती असलो तरी स्वतःच्या योग्यतेला उत्तेजनाची गरज आहे.” इतरांच्या दररोजच्या प्रयत्नांची प्रामाणिकपणे प्रशंसा करा. असे केल्याने त्यांचे जीवन अधिक मौल्यवान व सुखकारक होते. पालक, मुले, पर्यवेक्षक आणि ख्रिस्ती मंडळीचे सदस्य तुम्ही सर्वजण ज्याप्रकारे बोलता व कार्य करता त्यानुसार मान्यता मिळवू शकता. बायबल मेहनती, सभ्य, आणि नम्र व्यक्‍तींबद्दल अनुकूल अहवाल देते. (नीतीसूत्रे ११:२; २९:२३; इब्रीयांस ६:१-१२) इतरांच्या मूल्यांना आनंददायकपणे कबूल करण्यास शिका. तुम्ही इतरांबरोबर काम करत असताना त्यांच्या भावना समजून घ्या. प्रेषित पेत्राने असा सल्ला दिला: “तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा.” (१ पेत्र ३:८) ही गोष्ट, इतरांना मान्यता देण्यास सांगते व अशाप्रकारे एक मूलभूत मानवी गरज पूर्ण केली जाते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा